Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणत्याही कस्टर्ड पावडर किंवा साखरेचे वापर न करता घरीच बनवा गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलेड, डाएट करणाऱ्यांना नक्कीच आवडेल

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी उपलब्ध असते. त्यामुळे स्ट्रॉबेरीपासून तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये गुलाबी सॅलड बनवू शकता. हे सॅलड बनवताना साखरेचा वापर अजिबात करू नये.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 03, 2026 | 10:26 AM
कोणत्या कस्टर्ड पावडर किंवा साखरेचे वापर न करता घरीच बनवा गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलेड

कोणत्या कस्टर्ड पावडर किंवा साखरेचे वापर न करता घरीच बनवा गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलेड

Follow Us
Follow Us:

कायमच फ्रेश आणि ताजेतवाने राहण्यासाठी आहारात फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येक ऋतूमध्ये बाजारात वेगवेगळी फळे उपलब्ध असतात. फळांच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते. चेहऱ्यावर तेज येते, हाडांचे आरोग्य सुधारते इत्यादी भरमसाट फायदे होतात. प्रत्येक फळांमध्ये अनेक वेगवेगळे गुणकारी घटक आढळून येतात. विटामिन सी आणि फायबर असलेल्या फळांचे नियमित सेवन केल्यास कधीच अपचनाचा त्रास होणार नाही. शरीरातील विषारी घटक सहज बाहेर पडून जातील. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे फळ म्हणजे स्ट्रॉबेरी. आंबट गोड चवीची स्ट्रॉबेरी लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात. यामध्ये विटामिन सी, अँटी ऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळून येते. फ्रुट सॅलड बनवताना वेगवेगळ्या फळांचा वापर केला जातो. यासोबतच त्यात कस्टर्ड पावडर आणि साखर सुद्धा वापरली जाते. पण आज आम्ही तुम्हाला साखर आणि कोणत्याही पावडरचा वापर न करता गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होईल. साखरेचा वापर केल्यामुळे फळांमधील नैसर्गिक गोडवा कमी होऊन जातो. त्यामुळे फळांपासून पदार्थ बनवताना साखर अजिबात वापरू नये.(फोटो सौजन्य – istock)

संध्याकाळच्या चहासोबत काही तरी खास हवं आहे मग झटपट बनवा गुजरातची प्रसिद्ध दाबेली, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • स्ट्रॉबेरी
  • मखाणा
  • केळी
  • काजू
  • बदाम
  • दूध
  • मध
  • सफरचंद
  • डाळिंबाचे दाणे
हिवाळ्यात लुटा गरमागरम नाश्त्याची खास मजा; घरी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट ‘बटाटा पुरी’

कृती:

  • गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये मखाणा घ्या. त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या स्ट्रॉबेरीचे तुकडे टाका.
  • त्यानंतर त्यात काजू, बदाम टाकून मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात दोन वाट्या थंड दूध टाकावे.
  • १५ ते २० मिनिटं होईपर्यंत मखाणा दुधात भिजू द्या. यामुळे मिश्रण हलकेसे मऊ होईल.
  • केळीची साल काढून गोलाकार तुकडे करून घ्या. त्यानंतर त्यात स्ट्रॉबेरी, सफरचंद आणि डाळिंबाचे दाणे टाकून मिक्स करा.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले मिश्रण टाकून बारीक पेस्ट करा. पेस्ट तयार करताना त्यात अजिबात दूध किंवा पाणी घालू नये.
  • तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर मध आणि बारीक तुकडे केलेली फळे टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी सजावटीसाठी डाळिंबाचे दाणे टाकून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रुट सॅलड.

Web Title: Homemade pink strawberry fruit salad without any custard powder or sugar is sure to be loved by dieters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

पावसाळ्यात करा गरमागरम बेत! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे पौष्टिक सूप, नोट करून घ्या रेसिपी
1

पावसाळ्यात करा गरमागरम बेत! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे पौष्टिक सूप, नोट करून घ्या रेसिपी

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’
2

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

Moog Cutlet:  स्नॅक्समध्ये काहीतरी चटपटीत खायचंय? मग घरच्या घरी बनवा हेल्दी अन् टेस्टी मूग डाळ कटलेट, वाचा रेसिपी
3

Moog Cutlet: स्नॅक्समध्ये काहीतरी चटपटीत खायचंय? मग घरच्या घरी बनवा हेल्दी अन् टेस्टी मूग डाळ कटलेट, वाचा रेसिपी

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी
4

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.