अनेकांना चलताना टाच दुखते, काही वेळा चमक देखील मारते. हि समस्या सगळ्या होते, त्यासाठी काही खास उपाय सांगणार आहोत. दुखणे हळूहळू वाढते आणि कालांतराने ते अधिक जाणवू लागते. चालताना टाचांवर भार टाकला तर ती कळ वाढते. याची नेमकी कारणे कोणती आहेत हे जाणून घेतल्यास तुम्ही या समस्येपासून वेळेत पिच्छा सोडवू शकता.
याशिवाय बराच वेळा चालल्यानंतरही टाच दुखायला लागते. त्यामुळे बरेच लोक टाचांवर भार देण्याचे टाळतात. कॅल्शियम कमी असणे, अंगात लठ्ठपणा असणे किंवा अधिक व्यायाम करणे ही टाचदुखीची काही मुख्य कारणे असू शकतात.
टाचेला वेदना होणे ही समस्या अनेकांना सतावत असते. जो पट्टा पायांची बोटे टाचांना जोडतो. यामुळे पायाचे काही झटके शोषूण घेण्यास मदत करत असतो. परंतु चालताना किंवा धावताना वारंवार दबाव आल्याने टाचांना सूज येते. एखाज्या वेळेस पटकन उठताना, बसताना किंवा उभे राहिल्यानंतर या वेदना जाणवतात.
तुमच्या शरीराचा सर्वात मोठा भाग, अकिलीस टेंडन तुमच्या टाचांच्या हाडांशी जोडलेला असतो. चालणे आणि धावणे यांसारख्या क्रियामुळे हा बदल होत असतो. टाचांचे घट्ट स्नायूही हा तणाव वाढवू शकतात. त्यामुळे तुम्हाला तीव्र वेदना होत असतील तर तुम्ही डॉक्टरांना भेट देऊ शकता.