Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्या जेष्ठ नागरिक दिनानिमित्त, नेत्रपटलाच्या आजारांसह जगणा-या ज्येष्ठांसाठी उपयुक्त सूचना

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 20, 2022 | 01:44 PM
उद्या जेष्ठ नागरिक दिनानिमित्त, नेत्रपटलाच्या आजारांसह जगणा-या ज्येष्ठांसाठी उपयुक्त सूचना
Follow Us
Close
Follow Us:

वयोवृद्ध व्यक्तींमध्ये नजर अधू होण्याची समस्या सर्रास आढळून येते. जगभरात २५ कोटी लोक दृष्टीदोषाचा सामना करत असून त्यापैकी ८० टक्‍के लोक ५० वर्षांपुढील वयोगटातील आहेत. दृष्टी गमावण्याचा वयोवृद्ध व्यक्तींच्या जीवनमानाच्या दर्जावर विपरित परिणाम होतो व त्यातून मृत्यू संभवू शकतो. नेत्रपटलांच्या आजारांविषयी अर्थात रेटिनल डिझिजेसविषयी जागरुकतेचे प्रमाण अत्यल्प असल्याने आणि उपचारांच्या अभावामुळे नेत्रपटलाचे आजार असलेल्या वयोवृद्ध व्यक्तींना नैराश्य आणि चिंता अशा मनोविकारांचा धोका अधिक प्रमाणात असतो. रेटिनाच्या आजारांमुळे केवळ अस्वस्थता येत नाही, तर त्यामुळे एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीचे आयुष्य कायमचे आणि संपूर्णपणे थांबून जाण्याची शक्यता असते. म्हणूनच नजर गमावण्याचा धोका टाळण्यासाठी रेटिनाची योग्य देखभाल करणे आणि रेटिनाचे आरोग्य जपणे या गोष्टींकडे पहिल्यांदा लक्ष दिले पाहिजे.

  • वाढत्या वयानुसार उद्भवणाच्या डोळ्यांच्या सर्वसाधारण समस्या:

पुण्यातील इनसाइट व्हिजन फाउंडेशनचे मेडिकल डिरेक्टर डॉ. नीतिन प्रभुदेसाई सांगतात, “१० ते १५ टक्‍के ज्येष्ठ नागरिकांमध्ये रेटिनाशी निगडित समस्या उद्भवतात मात्र त्यांची तीव्रता वेगवेगळी असते. यामध्ये एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन, डायबेटिक मॅक्युरल एडेमा, व्हॅस्क्युलर ऑक्लुजन्स, रेटिनल डिटॅचमेंट या समस्या सरसकट आढळून येतात. म्हणूनच आजाराचे सुरुवातीच्या टप्प्यावरच निदान होण्यासाठी व तो बळावू नये यासाठी वर्षातून एकदा डोळे आणि रेटिनाची तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. वयोवृद्ध व्यक्तींची काळजी घेणा-या व्यक्तींनीही त्यांच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवायला हवे. त्यांच्या दृष्टीमध्ये काही बदल आढळून आल्यास ताबडतोब नेत्रविकारतज्ज्ञांकडून त्यांची तपासणी करून घेतली पाहिजे.” वाढत्या वयामध्ये नजर चांगली राखण्याचे काही खात्रीचे उपाय

वयोवृद्ध व्यक्तींच्या बाबतीत नजर कमकुवत होण्याची समस्या ही वाढत्या वयाचा अटळ भाग म्हणून दुर्लक्षली जाते. पण जागरुकता, उपचार आणि शिस्त यांच्या मदतीने या समस्यांचे योग्य व्यवस्थापन करता येते. वयोवृद्ध व्यक्तींची दृष्टी जपण्यासाठीचे काही खात्रीचे उपाय पुढीलप्रमाणे:

● नेत्रतपासणी टाळू नका
आपल्या डोळ्यांच्या तपासणीसाठी दृष्टीमितिज्ञ अर्थात ऑप्टोमेट्रिस्ट किंवा नेत्रविकारतज्ज्ञ अर्थात ऑप्थॅल्मोलॉजिस्ट यांना नियमितपणे भेट देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. समस्येचे निदान लवकर झाले तर तुमच्या डोळ्यांना संरक्षण तर मिळेलच पण दृष्टी गमावण्याचा धोका टाळण्यासही मदत होईल. खरेतर कॉन्टॅक्ट लेन्स किंवा चष्मा न घालणा-या, नजर चांगली असलेल्या ज्येष्ठांनीही नियमितपणे नेत्रतपासणी करून घ्यायला हवी. यामुळे संसर्गास प्रतिबंध होऊ शकेल तसेच कालपरत्वे बळावत जाणा-या आजारांचे सुरुवातीच्या टप्प्यावरच निदान होऊ शकेल.

●डोळ्यांचा कोरडेपणा, अश्रूपिंडांमध्ये अडथळा निर्माण होणे किंवा एएमडी आणि डीएमई सारखे कालपरत्वे बळावणारे आजार यापैकी कोणत्या समस्येवरील उपचारांची तुम्हाला गरज आहे हे विशेषज्ज्ञ ठरवतात. एएमडीच्या समस्येवर औषधांच्या व लेझर थेरपीच्या मदतीने प्रभावी उपचार शक्य आहेत आणि रुग्णांना दैनंदिन वापरासाठी कमी लो व्हिजन एड्स अर्थात अधू नजरेला आधार देणा-या उपकरणांचा वापरही करता येईल.

● आपला रक्तदाब, ग्लुकोजची पातळी आणि कॉलेस्ट्रॉल यांच्यावर नियमितपणे देखरेख ठेवा. रक्तदाब आणि कॉलेस्ट्रॉल या फक्त हृदय आणि रक्तवाहिन्यांशी निगडित समस्या वाटतात, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्यातून तुमच्या डोळ्यांसह इतर महत्त्वाच्या इंद्रियांची हानी होऊ शकते. वयोवृद्ध व्यक्तींमध्ये मधुमेह हा मूकपणे रेटिनाची हानी घडवून आणत असतो. असे असले तरीही आज रक्तातील ग्लुकोजची पातळी सातत्याने तपासण्यासाठी सेन्सर यंत्रणा बसविलेली कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरींग उपकरणे उपलब्ध आहेत. या उपकरणांमुळे ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राखता येऊ शकते. आपला रक्तदाब, कॉलेस्ट्रॉल आणि ग्लुकोज निरोगी पातळीवर राखल्यास रेटिनाच्या आरोग्याचीही हमी मिळेल.

●तुम्हाला फोटोसेन्सिटिव्हिटी म्हणजे प्रकाशाचा त्रास होण्याची समस्या नसली तरीही आपले डोळे सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट (यूव्‍ही) किरणोत्सर्गाच्या संपर्कात येऊ नयेत यासाठी उघड्या डोळ्यांनी सूर्यप्रकाशाकडे पाहणे टाळायला हवे. यूव्‍ही किरणांमुळे रेटिनाची हानी होते आणि बहुतांश लोकांना खूप उशीर होईपर्यंत ही गोष्ट लक्षात येत नाही. तेव्हा घराबाहेर यूव्‍ही प्रतिबंधक कोटिंग असलेले सनग्लासेस वापरा किंवा तुम्ही आधीच रेटिना किंवा डोळ्यांवरील उपचार घेत असाल तर तुमच्या विशेषज्ज्ञांनी सांगितलेला चष्मा वापरा.

●तुम्हाला रेटिनाशी निगडित काही विशिष्ट आजारांची लागण आधीच झाली असेल तर तुम्ही धूम्रपान आवर्जून टाळले पाहिजे. धूम्रपानामुळे नेत्रविकार जडतात तसेच अधिक वेगाने दृष्टीहीनता येते. तुमच्या रेटिनाचे आरोग्य जपण्यामध्ये तुमच्या आहाराची महत्त्वाची भूमिका असते. अँटिऑक्सिडंट्स आणि अत्यावश्यक खनिजे असणा-या अन्नपदार्थांचा आहरात समावेश करा, जे रेटिनाला हानी पोहोचवणा-या फ्री रॅडिकल्सशी लढा देऊ शकतील. फळे आणि पालेभाज्या अंडी, रेड मीट आणि कवच असलेले मासे खा. अक्रोड, थंड पाण्यातील मासे आणि अळशीच्या बिया हे ओमेगा

Web Title: In honor of senior citizens day tomorrow here are some helpful tips for seniors living with eye diseases nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2022 | 01:44 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • navrashtra news
  • update news

संबंधित बातम्या

Shardiya Navratri 2025 : काळरात्री देवीचा जागर म्हणजे काय? मुंबईच्या कुशीत दडलाय गुढ रहस्याचा थरार
1

Shardiya Navratri 2025 : काळरात्री देवीचा जागर म्हणजे काय? मुंबईच्या कुशीत दडलाय गुढ रहस्याचा थरार

Sharadiya Navratri 2025 : तिसऱ्या माळेचा रंग निळा; पुरणानुसार ‘असं’ आहे देवी काळरात्रीचं महात्म्य
2

Sharadiya Navratri 2025 : तिसऱ्या माळेचा रंग निळा; पुरणानुसार ‘असं’ आहे देवी काळरात्रीचं महात्म्य

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना
3

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना

Pratap Sarnaik : अंजली दमानिया प्रकरणावरून प्रताप सरनाईकांचा रोहित पवारांना टोला
4

Pratap Sarnaik : अंजली दमानिया प्रकरणावरून प्रताप सरनाईकांचा रोहित पवारांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.