Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: दुष्काळावर मात करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार; पेणच्या पाबळ खोऱ्यात उभारले ६० ते ७० फुटांचे बंधारे

सरकारी योजनांची वाट न पाहता ग्रामस्थ आता सरसावले आहेत. पेणच्या पाबळ खोऱ्यात गावकऱ्यांनी ६० ते ७० फुटांचे बंधारे उभारले आहेत. पाणीटंचाई रोखण्यासाठी साकव संस्थेने पुढाकार घेतला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 14, 2026 | 02:30 PM
Raigad News: दुष्काळावर मात करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार; पेणच्या पाबळ खोऱ्यात उभारले ६० ते ७० फुटांचे बंधारे

Raigad News: दुष्काळावर मात करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार; पेणच्या पाबळ खोऱ्यात उभारले ६० ते ७० फुटांचे बंधारे

Follow Us
Follow Us:
  • सिमेंट गोणींचा वापर करून नदी पात्रात बंधारे बांधण्याचा निर्णय
  • बंधारे बांधण्याचे काम जोरदार सुरू
  • चाफेगणी येथे सुमारे ६० ते ७० फूट लांबीचे मजबूत बंधारे बांधून पाणी अडविले
पेण: पेण तालुक्यातील पाबळ खोरे हे नदी नाले व डोंगर खोऱ्याने वेढलेला परिसर आहे असून येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी व कुणबी समाज परंपरागत राहत आलेला आहे. या खोऱ्यात वाघेरा तसेच काकण कोंड व मोहाडीच्या पायथ्यापासून वाहत येणारी नदी असून या तीन नद्या पुढे निगडा नदीच्या स्वरूपात अंबा नदीला म्हणजेच धरमतर खाडीला मिळतात.

Chandrapur News: पतंग उडवताना सावधान! नायलॉन मांजा वापरल्यास २५ हजारांचा दंड; चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात दुष्काळाचे सावट

सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात दुष्काळाचे मोठे सावट आहे. शासनाने पाणी जपून वापरण्याबरोबर पाणी आडवा पाणी जिरवा हे आवाहन केले आहे, या आवाहनाला प्रतिसाद देत साकव संस्थेने येथील गाववाड्यांमध्ये अरुण शिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका घेऊन वाहत येणाऱ्या मोठ्या नाले व नद्यांचे पात्र सिमेंट गोणींचा वापर करून नदी पात्रात बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचे साकव संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग तुरे यांनी सांगितले.

संपूर्ण खोऱ्यामध्ये पाणीच पाणी

पूर्वी शासनाची रोजगार हमी योजना कार्यान्वित होती तसेच नव्याने आलेल्या रामजी योजनेत मध्येदेखील हे काम अंतर्भूत नसल्याने आदिवासींचे शिष्टमंडळ ज्ञानेश्वर शिर्के, सुभाष मांडवकर, काशिनाथ पारधी व खूमा दोरे तसेच उमेश दौरे यांच्या नेतृत्वाखाली जे एस डब्ल्यू कंपनीचे सीएसआर प्रमुख तेलंग यांना भेटले व त्यांनी त्यांच्यापुढे बंधारे बांधण्याची योजना ठेवली त्यांनी त्याचा योग्य विचार करून ही योजना मंजूर करून घेतली. त्यानुसार बंधारे बांधण्याचे काम जोरदार सुरू असून पूर्ण खो-यामध्ये पाणीच पाणी झालेले आहे.

कामाची पाहणी होणार

या कामाची माहिती जिल्हा परिषद कृषी सभापती वैकुंठ शेठ पाटील त्याचबरोबर माजी खासदार धैर्यशील दादा पाटील तसेच उपविभागीय अधिकारी मा. प्रवीण पवार व तहसीलदार मा शेजळ साहेब व तालुका कृषी अधिकारी वाडकर यांना कळविले आहे. लवकरच या प्रतिनिधींचा दौरा पाबळ खोऱ्यातील साकव संस्थेने साकार केलेल्या बंधारे बांचा व या दृष्टीकोन निवारणासाठी केलेल्या कामाची पाहणी करणार आहेत.

Mumbai Local case: महिलांचा रेल्वे प्रवास सुरक्षित कधी होणार? नायगावच्या घटनेनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

६० ते ७० फूट लांबीचे मजबूत बंधारे बांधून पाणी अडविले

त्याप्रमाणे वरप ग्रामपंचायत क्षेत्रातील धायरवाडी, बोरीचा माळ, पाहिरमाळ, चिचदाडी व पाबळ ग्रामपंचायत क्षेत्रातील जांबोशी, कोंडवी, बरडावाडी, पाबळ व जीर्ण खोऱ्यातील चाफेगणी येथे सुमारे ६० ते ७० फूट लांबीचे मजबूत बंधारे बांधून पाणी अडविले आहे, दुसऱ्या टप्यात झापडी मोहाडी गवळवाडी उसर कुरनाड येथे बंधारे बांधले जाणार आहेत त्याप्रमाणे जोरदार तयारी सुरू असल्याचे उमेश दोरे व गजानन भोईर या कार्यकत्यांनी सांगितले. निर्धारित योजनेला प्रत्येक गावच्या वाड्यांच्या प्रमुखांनी व ग्रामस्थांनी चांगली साथ दिली आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Villagers take initiative for water conservation in pabal valley of pen strong check dams built to store water hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Exclusive Interview: शिवसेना का फुटली? उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? अरविंद सावंत यांनी सांगितली पडद्यामागची कहाणी!
1

Exclusive Interview: शिवसेना का फुटली? उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? अरविंद सावंत यांनी सांगितली पडद्यामागची कहाणी!

Kolhapur Sindhudurg Fort: कोल्हापुरात दिवाळीनिमित्त साकारला ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला; हुबेहूब प्रतिकृती पाहून व्हाल थक्क!
2

Kolhapur Sindhudurg Fort: कोल्हापुरात दिवाळीनिमित्त साकारला ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला; हुबेहूब प्रतिकृती पाहून व्हाल थक्क!

Chandrapur News: पतंग उडवताना सावधान! नायलॉन मांजा वापरल्यास २५ हजारांचा दंड; चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
3

Chandrapur News: पतंग उडवताना सावधान! नायलॉन मांजा वापरल्यास २५ हजारांचा दंड; चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Children’s Day: बालदिनानिमित्त पुन्हा द्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा! AI Prompts वापरून तयार करा खास फोटो
4

Children’s Day: बालदिनानिमित्त पुन्हा द्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा! AI Prompts वापरून तयार करा खास फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.