Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रीच्या वेळी लवकर झोप येत नाही? अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यासंबंधित उद्भवू शकतात ‘हे’ गंभीर आजार,

अपुऱ्या झोपेमुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडू लागते. आज आम्ही तुम्हाला अपुऱ्या झोपेमुळे कोणते आजार होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 20, 2025 | 05:30 AM
अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यासंबंधित उद्भवू शकतात 'हे' गंभीर आजार

अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यासंबंधित उद्भवू शकतात 'हे' गंभीर आजार

Follow Us
Close
Follow Us:

शारीरिक आणि मानसिक आरोग्य कायमच निरोगी ठेवण्यासाठी आहारासोबतच शांत झोप घेणेसुद्धा आवश्यक आहे. शांत आणि चांगली झोप घेतल्यामुळे आरोग्य, त्वचा आणि केसांच्या आरोग्य निरोगी राहते. नियमित ७ ते ८ तासांची शांत आणि गाढ झोप घेतल्यास संपूर्ण दिवस आनंद, उत्साहामध्ये जातो. दिवसभर काम करून थकल्यानंतर शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते. विश्रांती घेतल्यामुळे शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. नियमित शांत झोप घेतल्यामुळे हृदयरोगांचा आणि रक्ताभिसरण रोगांचा धोका कमी होऊन आरोग्य सुधारते. पण बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेक लोक रात्रीच्या वेळी उशिरा झोपतात. तर मानसिक तणावामुळे रात्री लवकर झोपच येत नाही. रात्री उशिरा झोपून सकाळी लवकर उठल्यामुळे आरोग्य बिघडते.(फोटो सौजन्य – istock)

सावधान! कबुतरांच्या विष्ठेमुळे उद्भवू शकतात आरोग्यासंबंधित ‘हे’ गंभीर आजार, दुर्लक्ष केल्यास गमवावा लागेल जीव

धावपळीची जीवनशैली, कामाचा तणाव आणि रात्री उशिरा झोपल्यामुळे शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू लागतात. मानसिक तणाव वाढल्यानंतर कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. तसेच शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अपुऱ्या झोपेमुळे शरीराला कोणत्या आजारांची लागण होण्याची शक्यता असते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे आजार झाल्यानंतर शरीर कमकुवत होऊन शरीरात सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो.

अपुऱ्या झोपेमुळे शरीराला होते ‘या’ गंभीर आजारांची लागण:

मधुमेह:

मधुमेह हा आरोग्यासंबंधित अतिशय गंभीर आजार आहे. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर वारंवार चक्कर येणे, थकवा जाणवणे, शरीरावर जखमा होणे इत्यादी लक्षणे शरीरात दिसून येतात. मधुमेह झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे शरीरातील इतर अवयवांना इजा होते. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.

लठ्ठपणा:

शरीरात झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात लठ्ठपणा वाढू लागतो. शरीराच्या अवयवांवर अनावश्यक चरबी वाढू लागते. तसेच भूक वाढवणारे हार्मोन्स शरीरात वाढतात आणि जास्त खाण्याची इच्छा होते, ज्यामुळे वजन वाढून लठ्ठपणा वाढतो.

उच्च रक्तदाब:

झोपेच्या कमतरतेमुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. अनेक लोक रक्तदाब वाढल्यानंतर दुर्लक्ष करतात. पण दुर्लक्ष केल्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची जास्त शक्यता असते.

जेवणात डाळ खाल्ल्यानंतर लगेच अ‍ॅसिडिटी होते? पोटाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ पद्धतीने शिजवा डाळ

रोगप्रतिकारशक्ती कमी होते:

शरीरात झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. यासोबतच शरीराला कोणत्याही संसर्गजन्य आजारांची लागण लगेच होऊ शकते. तसेच त्वचेच्या समस्या, केसांच्या समस्या, स्मृतिभ्रंश इत्यादी समस्या उद्भवू लागतात.

FAQs (संबंधित प्रश्न)

कमी झोपण्याचे दुष्परिणाम?

कमी झोपल्याने दिवसभर थकवा जाणवतो आणि ऊर्जा कमी लागते.कामात किंवा अभ्यासात लक्ष केंद्रित करणे कठीण होते.कमी झोपेमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि आजार होण्याची शक्यता वाढते.

झोपेच्या समस्यांसाठी उपाय?

दररोज एकाच वेळी झोपणे आणि उठणे आरोग्यासाठी चांगले असते. मोबाईल आणि इतर गॅजेट्समधून बाहेर पडणाऱ्या निळ्या रंगाच्या प्रकाशामुळे झोप येण्यास त्रास होतो. दिवसा शारीरिक हालचाली केल्याने रात्री चांगली झोप लागते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Inadequate sleep can lead to serious health problems side effects of sleep deprivation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • side effect
  • sleep problems
  • Sleeping at Night

संबंधित बातम्या

बटाट्यासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन! आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक, उद्भवेल पचनाची समस्या
1

बटाट्यासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन! आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक, उद्भवेल पचनाची समस्या

Naked Sleeping: रात्री कपड्यांशिवाय झोपताय का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान
2

Naked Sleeping: रात्री कपड्यांशिवाय झोपताय का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

Copper Water: ‘या’ लोकांनी चुकूनही करू नका तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन! आरोग्यासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या
3

Copper Water: ‘या’ लोकांनी चुकूनही करू नका तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन! आरोग्यासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

६ तासांपेक्षा कमी वेळ झोपल्यामुळे आरोग्यावर दिसून येतात ‘हे’ गंभीर परिणाम, मेंदूच्या कार्यात होईल बिघाड
4

६ तासांपेक्षा कमी वेळ झोपल्यामुळे आरोग्यावर दिसून येतात ‘हे’ गंभीर परिणाम, मेंदूच्या कार्यात होईल बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.