पोटाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी 'हे' उपाय ठरतील प्रभावी
भारतीय स्वयंपाक घरात नेहमीच पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. जेवणात नेहमीच डाळ, भात आणि चपाती, भाजीसह इतर अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जेवणाच्या ताटातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे डाळ भात. जेवणात डाळभात नसेल तर जेवण जेवल्यासारखेच वाटत नाही. मुगडाळ, तूरडाळ, मसूरडाळ इत्यादी अनेक वेगवेगळ्या डाळींचा वापर करून तिखट फोडणीची डाळ बनवली जाते. डाळीमध्ये फायबर, प्रथिने, लोह, झिंक, फोलेट आणि मॅग्नेशियम इत्यादी शरीरासाठी आवश्यक असलेले सर्वच घटक आढळून येतात. शाहाकारी लोक आहारात डाळीचे सेवन मोठ्या प्रमाणावर करतात. निरोगी आरोग्यासाठी आहारात डाळींचे सेवन करणे अतिशय फायद्याचे मानले जाते.(फोटो सौजन्य – istock)
फुफ्फुस कमजोर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीर होईल निकामी
जेवणातील पदार्थांमध्ये सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे डाळ. पण काही वेळा डाळ खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. अनेक लोकांमध्ये पोट फुगणे, जड वाटणे, जळजळ होणे किंवा वारंवार ढेकर येण्याची समस्या उद्भवू लागते. डाळीचे सेवन केल्यामुळे बऱ्याचदा अपचनाच्या समस्या उद्भवतात. यामागील प्रमुख कारण म्हणजे डाळ व्यवस्थित न शिजवणे, शिळ्या डाळीचे सेवन, अतिरिक्त मसाल्यांचा वापर केल्यामुळे पदार्थाची गुणवत्ता अतिशय खराब होऊन जाते, ज्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डाळ खाल्यामुळे अपचनाच्या समस्या का उद्भवतात? यावर कोणते उपाय करावेत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
डाळींमध्ये फायबरचे अधिक असते. त्यामुळे ज्यांच्या शरीरात फायबरचे प्रमाण कमी असते, त्यांना डाळ खाल्ल्यानंतर लगेच अपचनाची समस्या उद्भवू लागते. डाळ खाल्ल्यानंतर पोट फुगणे किंवा गॅस किंवा बद्धकोष्ठतेसारख्या अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय डाळींमध्ये FODMAPs नावाचे साखरयुक्त घटक आढळून येतात. त्यामुळे फायबर कमी असलेल्या लोकांच्या शरीरात लगेच गॅस किंवा पित्ताची समस्या उद्भवते. त्यामुळे शरीरात फायबर असणे आवश्यक आहे.
डाळ बनवताना प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने डाळ बनवली जाते. काही डाळ फोडणी देऊन खातात तर कधी लोक फोडणी न देता शिजवलेल्या डाळीचे भातासोबत सेवन करतात. चुकीच्या पद्धतीने डाळ शिजवल्यास अपचनाच्या अनेक समस्या उद्भवतात. तसेच पोटात ऍसिडिटी, गॅस आणि बद्धकोष्ठता वाढू लागते.
ऍसिडिटीची समस्या टाळण्यासाठी डाळ शिजवताना हिंगाचा वापर करावा. हिंगाच्या वापरामुळे पचनक्रिया सुधारते आणि पचनाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. डाळीमध्ये हिंग घातल्यास कार्बोहायड्रेट्सचे विघटन होते, ज्यामुळे पोटात गॅस तयार होत नाही. हिंगाची फोडणी देऊन बनवलेली डाळ सहज पचन होते आणि पचनाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत.
पावसाळ्यातही वाढतोय डिहायड्रेशनचा धोका, होतोय अवयवांवर दुष्परिणाम; तज्ज्ञांनी दिला सतर्कतेचा इशारा
डाळ सहज पचन होण्यासाठी डाळीला फोडणी देताना त्यात मोहरी,जिरं, लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी द्यावी.यामुळे पचनाची समस्या उद्भवत नाही. गॅस, पोट फुगणे किंवा जडपणा इत्यादींपासून आराम मिळवण्यासाठी डाळीला तुपाची फोडणी द्यावी.
डाळमुळे पोटफुगी का होते?
डाळीमध्ये ऑलिगोसॅकराइड्स भरपूर प्रमाणात असतात, ही एक प्रकारची साखर आहे जी मानवी शरीर पूर्णपणे पचवू शकत नाही. या साखर मोठ्या आतड्यात जातात जिथे बॅक्टेरिया त्यांना आंबवतात आणि उप-उत्पादन म्हणून वायू तयार करतात.
डाळ खाल्ल्यानंतर पोटफुगी कमी करण्यासाठी टिप्स:
डाळ शिजवण्यापूर्वी काही तास भिजवल्याने ऑलिगोसॅकराइड्सचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते आणि ते पचण्यास सोपे होते. टेम्पेह सारखे आंबवलेले शेंगदाणे पचण्यास सोपे असतात कारण आंबवण फुगण्यास कारणीभूत असलेल्या काही संयुगांचे विघटन करते.