Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात शरीराची कमी झालेली ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा आहारात समावेश, कायमच राहाल हेल्दी

थंडीत रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे शरीराला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. यामुळे श्वसनाच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू नये म्हणून आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 02, 2025 | 11:35 AM
हिवाळ्यात शरीराची कमी झालेली ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

हिवाळ्यात शरीराची कमी झालेली ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Follow Us
Close
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये आहारात कोणते पदार्थ खावेत ?
थंडीत रक्तवाहिन्यांना इजा का पोहचते?
ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. थंड वातावरणात शरीराच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. याशिवाय वेगवेगळ्या साथीच्या आजारांमुळे सर्दी, खोकला, ताप इत्यादी आजारांची लागण होते. साथीचे आजार झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा वाढू लागतो. या दिवसांमध्ये वातावरणात वाढलेल्या गारव्याचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. ज्यामुळे त्वचा कोरडी पडणे, डिहायड्रेशन आणि इतरही समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – istock)

Superfoods For Diabetes: औषधांवर नका उधळू पैसे, शुगर नियंत्रणात आणतील 13 गोष्टी; Ayurved मध्ये सांगितली यादी

हिवाळ्यात हवेची गुणवत्ता अत्यंत खराब होते. यामुळे हृदय आणि फुफ्फुसावर याचा वाईट परिणाम होतो. त्यातच हवेतील विषारी प्रदूषणामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागते. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शरीरात ऑक्सिजनची कमतरता असल्याने शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल कमी झाल्यास प्रथम ओठांचा रंग बदलतो. छातीत अचानक दुखू लागणे, सतत खोकला येणे, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे जर ही लक्षणे तुमच्या शरीरात दिसत असतील तर ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी या टिप्स अवश्य फॉलो करा.हिवाळ्यात विविध आजार बळावतात. त्यातच सण समारंभानिमित्ताने लोकांचे एकत्र येण्याचे प्रमाण वाढते, यामुळे हवेतील विषाणू तसेच बॅक्टेरियांचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक विकारांना निमंत्रण मिळते, असे तज्ज्ञ सांगतात.

थंडीच्या दिवसांतील विकार:

  • श्वसनलिकेच्या विकारांना आमंत्रण देणारे विषाणू, जीवाणू तसेच न्यूमोकोकिसच्या संक्रमणामुळे श्वसनासंबंधीच्या विकारांमध्ये या काळात वाढ होते.
  • सर्दी, खोकला, घसा खवखवणे, छातीचा जंतूसंसर्ग आणि दम्याचे प्रमाण वाढते. नौरो नावाच्या विषाणूमुळे जुलाब, उलट्या सुरू होतात. उल्ट्या आणि जुलाबांमुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायडेशन होऊ शकते.
  • थंडीत त्वचा कोरडी पडत असल्याने त्वचेचा जंतूसंसर्ग तसंच त्वचेशी संबंधित इतर विकार उचल खातात. हृदयविकार तसेच श्वसनाशी संबंधत विकार असलेल्या व्यक्तींनी अतिथंडीत घराबाहेर पडणे टाळायला हवे. थंडीत गरम कपडे घातल्याने न्यूमोनिया, सदर्दी, पलू, आदी विकारांना दूर ठेवणे शक्य होते.
भरपूर पाणी प्या:

शरीरातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी दररोज पुरेसे पाणी प्यावे असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात. यासाठी दररोज किमान 3 लिटर पाणी प्यावे. पुरेसे पाणी प्यायल्याने ऑक्सिजन पेशींपर्यंत पोहोचतो.

पौष्टिक खजूरचे सेवन:

खजूर आरोग्यासाठी औषधाप्रमाणे काम करतो. त्यात सेलेनियम, तांबे, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. याच्या सेवनाने शरीरातील ऑक्सिजनची कमतरता दूर होते.

दारूचे सेवन न करता आतून कुजलेले लिव्हर स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, लघवीतून वाहून जाईल घाण

श्वासोच्छवासाचे व्यायाम करा:

शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी कॉर्ड ब्रीदिंग एक्सरसाइज दररोज करा. हा व्यायाम बसूनही करता येतो. त्यामुळे कोणीही श्वासोच्छवासाचे व्यायाम करू शकतो. हा व्यायाम केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. याव्यतिरिक्त, श्वसन प्रणाली मजबूत होते. याशिवाय शरीरातील ऑक्सिजनची पातळीही वाढते.

ताडासन करा:

ताडासन केल्याने श्वसन प्रक्रिया सुधारते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. यामुळे शरीराची मुद्राही सुधारते. फुफ्फुसाचा वरचा भाग सक्रिय करण्यास देखील मदत करते. डॉक्टर अस्थमाच्या रुग्णांना ताडासन करण्याचा सल्ला देतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Include these things in your diet to boost your bodys depleted oxygen levels during winters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • health issue
  • winter health tips

संबंधित बातम्या

तोंडाचा कर्करोग होण्यास जनुकीय घटक जबाबदार! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
1

तोंडाचा कर्करोग होण्यास जनुकीय घटक जबाबदार! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

कोरडा खोकला होईल कायमचा नष्ट! एक ग्लास दुधात मिक्स करून प्या ‘हा’ पदार्थ, घशाच्या समस्यांपासून मिळेल आराम
2

कोरडा खोकला होईल कायमचा नष्ट! एक ग्लास दुधात मिक्स करून प्या ‘हा’ पदार्थ, घशाच्या समस्यांपासून मिळेल आराम

थंडीत हाडांना आलेली सूज आणि वेदना कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘हा’ पिवळा पदार्थ ठरेल प्रभावी, सांध्यांमधील वेदना होतील गायब
3

थंडीत हाडांना आलेली सूज आणि वेदना कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘हा’ पिवळा पदार्थ ठरेल प्रभावी, सांध्यांमधील वेदना होतील गायब

Winter Health Problem: हिवाळ्यातील गुडघेदुखी काय आहेत कारणं, लक्षणं आणि उपचार
4

Winter Health Problem: हिवाळ्यातील गुडघेदुखी काय आहेत कारणं, लक्षणं आणि उपचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.