
हार्ट डिसीजमुळे भारतात दरवर्षी होतोय 28.6 लोकांचा मृत्यू, हृदयाला सुरक्षित ठेवण्यासाठी आजच करा 'हे' 5 बदल
मागील काही काळापासून संसर्गजन्य रोगांहून अधिक हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा जीव घेतला आहे. अशा परिस्थितीत वेगाने वाढत चाललेल्या या आजाराविषयी वेळीच जनजागृती निर्माण करणे फार गरजेचे ठरते. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजने एक अहवाल सादर केला आहे ज्यानुसार भारतात हृदयविकारामुळे २८.६ लाख लोकांचा मृत्यू होत असल्याचे स्पष्ट झाले. ही आकडेवारी फारच चिंताजनक असून हे दर्शवते की, हृदयाचे आरोग्य हे पूर्वीपेक्षा अधिक खराब होऊ लागले आहे. हृदयविकाराचा झटका आणि हृदयक्रिया बंद पडणे हे आता केवळ वृद्धांपुरते मर्यादित राहिलेले नाही तर याचा परिणाम लहानांवर आणि तरुणांवरही होऊ लागला आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, या अहवालावरुन तुम्ही अधिक चिंता घेण्याची गरज नाही. कारण आपल्या जीवनशैलीत काही चांगले बदल करुन आपण हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी कमी करु शकतो. चला हे कसे करायचे ते जाणून घेऊया.
आहारात सुधारणा करणे
हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी आहरात महत्त्वपूर्ण बदल करणे फार महत्त्वाचे ठरते. आपल्या आहारात वेळीच जास्त मीठाचे आणि साखरेचे प्रमाण कमी करा. जमेल तितक्या मर्यादित प्रमाणात याचे सेवन करा. याचबरोबर आहारात ट्रान्स फॅटयुक्त पदार्थांचे सेवन टाळा, यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होई लागतो. याऐवजी तुम्ही आपल्या आहारात ओट्स, संपूर्ण धान्य, कडधान्ये आणि हिरव्या पालेभाज्या मोसमी फळे आणि सुक्या मेव्याचाही हेल्दी समावेश करु शकता.
नियमित व्यायाम
व्यायाम आपल्या निरोगी आरोग्यासाठी फार गरजेचा आहे. दररोज डेस्कवर बसून केलेले काम हृदयरोगाच्या समस्यांना आमंत्रण देते. यामुळे हृदयाचे स्नायू कमकुवत होऊ लागतात. आपल्या स्नायुंना आतून बळकट बनवण्यासाठी किमान ३० मिनिटे वेगाने चालण्याचा प्रयत्न करा. श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि योगाभ्यास देखील फायदेशीर आहेत.
धूम्रपान आणि मद्यपान टाळा
धूम्रुपान आणि मद्यपानाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. निकोटीनमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. मद्यपानामुळे हृदय निकामी होण्याचा धोकाही वाढतो .
ताणतणाव कमी करा
रोजच्या जीवनात अनेकदा रोजच्या रुटीनचा कंटाळा येऊ लागतो ज्यामुळे कोणत्याच गोष्टीत आपले मन लागत नाही आणि परिणामी तणाव अधिकच वाढू लागतो. वाढत्या तणावामुळे कॉर्टिसोल या हार्मोनची पातळी वाढते, ज्याचा थेट परिणाम हृदयावर होतो. तणाव कमी करण्यासाठी आपल्या आवडीच्या गोष्टीत मन रमवा आणि पुरेशी झोप घ्या.
हेल्थ चेकअप
अनेकदा आजारांचा धोका गंभीर परिस्थितीपर्यंत पोहचल्यानंतर रुग्णालय गाठले जाते ज्यामुळे उपचार प्रक्रियेत विलंब होतो. जो आजार सहज दूर केला जाऊ शकत होता तो उशीर केल्याने आणखीन गंभीर स्वरूप घेतो. त्यामुळेच आजारांच्या लक्षणांची वाट पाहू नका आणि रेगुलर आपला हेल्थ चेकअप करत रहा. हृदयविकार टाळण्यासाठी, तुमचे कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि साखरेची पातळी नियमितपणे तपासून घेऊ शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.