सोरायसिस म्हणजे काय
सोरायसिसमुळे व्यक्तीच्या जीवन गुणवत्तेवर लक्षणीय विपरीत परिणाम होतात. आपल्या शरीराविषयी घृणा वाटणे, आत्मविश्वास खचणे, कलंक, स्वतःच्या दिसण्याविषयी लाज, संकोच वाटणे अशा अनेक समस्यांना सोरायसिस रुग्णांना सामोरे जावे लागते. सोरायसिस सहज लक्षात येतो आणि बहुतांश रुग्णांच्या बाबतीत काही सध्या टॉपिकल औषधांनी व जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणून तो नियंत्रणात ठेवता येतो.
डॉ. रेश्मा विश्नानी, कन्सल्टन्ट डर्मेटोलॉजिस्ट, त्रिकोलॉजिस्ट आणि एस्थेटिक डर्मेटोलॉजिस्ट, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती देत जागरूकतेचा प्रयत्न केलाय. प्रत्येकाला बेसिक लक्षणे आणि उपचाराबाबत योग्य माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे (फोटो सौजन्य – iStock)
कसे आहेत उपाय

सोसायसिस असल्यास काय करावे
सोरायसिसवरील उपचारांमध्ये तोंडावाटे घेण्याचे स्टिरॉइड्स क्वचितच दिले जातात आणि ते देखील फक्त काही दिवसांसाठी व फक्त काही दुर्मिळ केसेसमध्येच दिले जातात, त्यामुळे तुम्हाला जी औषधे देण्यात आली आहेत त्याची नीट माहिती करून घ्या. तोंडावाटे घेण्याची स्टिरॉइड्स फक्त काही दुर्मिळ केसेसमध्येच दिली जातात पण स्टिरॉइड्सचे टॉपिकल क्रीम ऍप्लिकेशन हा सोरायसिसवरील प्रमुख उपचार असतो, पण हा उपचार देखील सुरुवातीचे काही महिनेच केला जातो. यासाठी तज्ज्ञ आणि पात्र डॉक्टरकडूनच उपचार करून घ्या.
हेदेखील वाचा – सोरायसिस लक्षणे आणि कारणे काय ते जाणून घ्या
नेमके कारण काय?
सोरायसिसचे नेमके कारण जरी अद्याप समजलेले नसले तरी असे अनेक घटक आहेत ज्यामुळे सोरायसिस वाढू शकतो, त्यांना प्रतिबंध केला जाऊ शकतो.
हेदेखील वाचा – सोरायसिस आणि मानसिक आरोग्य : तज्ज्ञांचा प्रभावी व्यवस्थापनासंदर्भात सल्ला
काय करावे आणि काय टाळावे

काय करणे टाळावे आणि कशा पद्धतीने काळजी घ्यावी
सोरायसिसवरील उपचारांमध्ये अनेक टॉपिकल आणि तोंडावाटे घेण्याची औषधे असतात पण मॉइश्चरायजर्स खूप महत्त्वाची असतात, रुग्णांनी माईल्ड क्लिंजर किंवा साबण वापरावा आणि दिवसातून दोनदा त्वचा मॉइश्चराइज करणे आवश्यक आहे. शरीरावर कोणताही स्क्रब किंवा लुफा वापरू नये. केसांसाठी नारळाचे तेल लावावे, केस धुण्याच्या एक तास आधी तेल लावावे. कोल टार बेस्ड शाम्पू वापरावा. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केस धुवावेत. या उत्पादनांची निवड करण्याच्या आधी डर्मेटोलॉजिस्टचा सल्ला अवश्य घ्या.






