
नशीब नाही, ट्रेनमध्ये 'या' फॉर्मुल्याने मिळते विंडो सीट! रेल्वेचा हा नियम बहुतेकांना ठाऊकच नाही
Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित
स्लीपर-एसीमध्ये खिडकीशेजारील सीट मिळणे हा कुणाचा हक्क आहे?
जर तुम्ही चेअर कारमधून प्रवास करत असाल तर टेंशन घेण्याची गरज नाही. कारण आपल्या रेल्वे तिकिटावर स्पष्टपणे नमूद केलेले असते की तुम्हाला खिडकीशेजारील सीट मिळाली आहे की नाही. खर कन्फ्यूजन हे स्लीपर आणि एसी कोचमध्ये होते. कारण त्यात विंडो सीटची कोणतीही माहिती नमूद केलेली नसते. तथापि, दिवसा लोक सामंजस्याने जागा वाटून घेतात आणि मिळून-मिसळून प्रवास करतात.
रेल्वेच्या नजरेत लोअर बर्थचा खरा हक्क कुणाला?
आता प्रश्न असा पडतो की, जर लोअर बर्थच्या लोकांना विंडो सीट मिळते तर खालची जागा कोणाला दिली जाते? सोय लक्षात घेऊन, रेल्वेने ही जागा काही विशिष्ट व्यक्तींसाठी राखीव ठेवली जाते. यात खालीलप्रमाणे समावेश असतो:
वृद्ध माणसं
६० वर्षे किंवा त्याहून जास्त वय असणाऱ्या वरिष्ठ लोकांना सर्वात प्रथम प्राधान्य दिले जाते.
महिला वर्ग
जर कोणती महिला यात्रेकरु ४५ वर्षे किंवा त्याहून जास्त वयाची असेल तर त्यांच्यासाठी खालच्या बर्थचा कोटा निश्चित करण्यात येतो.
दिव्यांग यात्रेकरु
शारिरिकरित्या दुर्बळ किंवा दिव्यांग प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणताही त्रास होऊ नये यासाठी त्यांना लोअर बर्थ अलाॅट केला जातो.
रात्री १० नंतर कोणताही डिस्टरबंस नाही
जर तुम्ही विचार करत असाल की लोअर बर्थ काय आहे तर जाणून घ्या की, दिवसा या सीटवर बसून प्रवास केला जातो. रात्री १० वाजल्यानंतर हे नियम पूर्णपणे बदलतात. रात्री १० वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंतची वेळ फक्त शांततेत झोपण्यासाठी असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यादरम्यान रेल्वेत कोणता टीटीई देखील तिकिट चेक करण्यासाठी येऊ शकत नाही. यामुळेच जेव्हाही तुम्ही प्रवासाला निघाल तेव्हा या नियमांना नेहमी ध्यानात ठेवा.