Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वेचे नाईट रूल्स माहिती आहेत का? रात्री 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ट्रेनमध्ये या गोष्टी करण्यास आहे मनाई

लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये रात्रीचा प्रवास करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते. प्रवाशांची झोप आणि शांतता लक्षात घेऊन रात्रीच्या वेळेस काही गोष्टींवर रेल्वेकडून निर्बंध घालण्यात आले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 09, 2026 | 09:01 AM
रेल्वेचे नाईट रूल्स माहिती आहेत का? रात्री 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ट्रेनमध्ये या गोष्टी करण्यास आहे मनाई

रेल्वेचे नाईट रूल्स माहिती आहेत का? रात्री 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ट्रेनमध्ये या गोष्टी करण्यास आहे मनाई

Follow Us
Follow Us:
  • रात्रीच्या प्रवासासाठी रेल्वेने काही खास नियम निश्चित केले आहेत.
  • या नियमांचा उद्देश प्रवाशांना आरामदायी आणि शांत प्रवासाचा अनुभव देणे आहे.
  • नियम मोडल्यास प्रवाशांना तक्रार करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
भारतीय रेल्वेतून दररोज लाखो लोक प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये रात्र काढणे ही एक सामान्य गोष्ट आहे, पण कल्पना करा की तुम्ही दिवसभराच्या थकव्यानंतर गाढ झोपेत आहात आणि तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती मोठ्या आवाजात गाणं किंवा रिल्स पाहत आहेत तर यावर तुमची काय प्रतिक्रिया येईल? खरंतर अशाच समस्यांपासून प्रवाशांना सुरक्षित करण्यासाठी रेल्वेत रात्री १० वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खास ‘नाइट जर्नीू रुल्स’ लागू करण्यात आले आहेत. प्रत्येक रेल्वे प्रवाशाला या नियमांची माहिती असायलाच हवी. चला या लेखात याविषयीची काही सविस्तर माहिती जाणून घेऊया.

गुफेच्या आत विराजमान आहेत भगवान शंकर, श्री केशवनाथेश्वर मंदिराची खासियत जाणून घ्या

आरडा-ओरड करण्याची परवानगी नाही

रात्री १० वाजता ट्रेनमध्ये शांततामय वातावरण राखणे हा मुख्य नियम आहे. यावेळी मोबाईलवरही तुम्ही मोठ्यामोठ्या आवाजात बोलू शकत नाही. यासोबत तुम्ही मोठ्या आवाजात मोबाईलवर रिल्स किंवा व्हिडिओ देखील पाहू शकत नाही. यासाठी तुम्हाला इयरफोनची मदत घ्यावी लागले. मित्रांसोबत मोठ्या आवाजात गप्पा मारणे किंवा मोठमोठ्याने हसण्यास देखील मनाई असते. इतर प्रवाशांना या गोष्टीमुळे त्रास होऊ शकतो किंवा त्यांची झोप खराब होऊ शकते आणि म्हणूनच हे नियम तयार करण्यात आले आहेत.

मेन लाईट बंद करणे अनिवार्य

अनेकदा असं होत की, कोणत्या ना कोणत्या प्रवाशाला उशीरा रात्रीपर्यंत पुस्तर वाचण्याची सवय असते. यासाठी संपूर्ण केबिनची मोठी लाईट तो चालू ठेवतो पण यामुळे इतर प्रवाशांना त्रास होऊ शकते. लाईटच्या प्रकाशात नीट झोप लागत नाही ज्यामुळे रेल्वे नियम तुम्हाला लाईट स्विच ऑफ करण्याची परवानगी देते. रात्री १० वाजल्यानंतर मेन लाईट बंद करावी लागते. रात्रीच्या वेळी फक्त नाईट बल्ब सुरु असतात. जर एखाद्या व्यक्तीला रात्री काही वाचायचे असेल तर तो सीटजवळील पर्सनल रीडिंग लाइट ऑन करुन ठेवू शकतो.

रात्री तिकिट चेकिंगसाठी झोपेतून उठवले जाऊ शकत नाही

प्रवाशांच्या चांगल्या झोपेचा विचार करता रेल्वेने आपल्या तिकिट चेकिंग स्टाफला निर्देश दिले आहेत की रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत तिकिटासाठी कुणालाही झोपेतून उठवले जाऊ शकत नाही. टीटीईला आपले हे काम उर्वरित वेळेत पूर्ण करावे लागेल. तथापि, जो प्रवासी रात्री १० वाजल्यानंतर रेल्वेत चढतो त्याचे त्याच वेळी तिकिट चेक केले जाऊ शकते.

वेंडर मोठ्याने ओरडू शकत नाही

रेल्वेत जेवण-पाणी विकण्यासाठी येणारे हाॅकर्स किंवा वेंडर देखील रात्री १० वाजल्यानंतर मोठमोठ्याने ओरडून सामान विकू शकत नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय आणि झोपमोड होऊ शकते. तथापि, प्रवाशाने ई-केटरिंगद्वारे जर जेवण आधीच बुक केले असेल, तर ते जेवण रात्रीच्या वेळेतही तुमच्या सीटपर्यंत डिलिव्हर केले जाऊ शकते.

IRCTC घेऊन आला जपान टूर पॅकेज, टोक्योपासून हिरोशिमपर्यंतची मजेदार सफर… जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

कुणी नियमांचे उल्लंघन केले तर लगेच तक्रार करा

जर कुणी रात्री १० वाजल्यानंतर या नियमांचे पालन करत नसेल तर तुम्हाला त्याच्याशी भांडण करण्याची गरज नाही. तुम्ही लगेच ट्रेनमध्ये उपस्थित आरपीएफ, टीटीई किंवा कोच अटेंडेंसला तक्रार करु शकता. याशिवाय रेल्वेची अधिकृत वेबसाईट ‘RailMadad’ किंवा १३९ हेल्पलाईनवर तक्रार दाखल करुन तुम्ही मदत मागू शकता. रेल्वे नियमांचे पालन न केल्यास तुम्हाला दंडही आकारला जाऊ शकतो.

 

Web Title: Indian railways night journey rules passengers must know before traveling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • indian rail way
  • Local Trains
  • travel news

संबंधित बातम्या

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून
1

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट
2

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…
3

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?
4

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.