(फोटो सौजन्य: Pinterest)
IRCTC घेऊन आला जपान टूर पॅकेज, टोक्योपासून हिरोशिमपर्यंतची मजेदार सफर… जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
अनोखा मंदिर
निसर्गाच्या सानिध्यात कर्नाटकातील मूडुगल्लू (Moodugallu) परिसरात हे मंदिर वसले आहे. जर तुम्हाला साहसी पर्यटन आवडत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हे मंदिर मुकांबिका राखीव वनात घनदाट जंगलाच्या मधोमध वसलेले आहे. चारही बाजूने हिरवळ, शांत वातावरण आणि वाहणाऱ्या पाण्याचा मधुर ध्वनी हे सर्वच तुमच्या पर्यटनाला रोमांचक बनवून जाते. हे कोणत्या सामान्य मंदिरासारखे नाहीये तर नैसर्गिक गुफेत ते बांधण्यात आले आहे. इथे येताच तुम्हाला असं वाटेल की तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात भगवान शंकराचे दर्शन घेत आहात.
गुफेच्या आत आहे शिवलिंग
या गुफेत भगवान शंकराचे एक नाही तर दोन शिवलिंग उपस्थित आहेत. यातील एक शिवलिंग हे भक्तांद्वारे तयार करण्यात आले आहे तर दुसरे शिवलिंग हे स्वयंभू नैसर्गिकरित्या तयार झाल्याचे मानले जाते. हे स्वयंभू शिवलिंग स्वच्छ पाण्याच्या मध्यभागी वसलेले आहे. या ठिकाणाविषयी मान्यता आहे की, हे ठिकाण विशेषरित्या भगवान शिवाच्या कृपाने तयार झाले आहे. शांतता आणि सकारात्मक उर्जेचा इथे वास आहे ज्यामुळे ठिकाणाला भेट देताच मानसिक तणाव दूर ठेवण्यास मदत होते. गुफेतील मुख्य गर्भगृहापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला थंड पाण्यातून पुढे जावे लागेल. हा अनुभव भितीदायक नव्हे तर शांततेने भरलेला एक सुखद अनुभव ठरतो.
Independence Day 2026 : 15 ऑगस्टला लाँग वीकेंडला प्लॅन करताय? मग मुंबईतील या ५ ठिकाणांना भेट द्या
मंदिरापर्यंत कसं पोहचायचं?
मुंबईहून मंदिराला भेट देत असाल तर रेल्वे मार्ग तुमच्यासाठी वेगवान आणि स्वस्त पर्याय ठरेल. मुंबईवरून कुंडापूर (KUDA) किंवा उडुपी (UDPI) जाण्यासाठी थेट रेल्वे उपलब्ध आहेत. इथून मंदिर ७५ किलोमीटर अंतरावर आहे. इथून तुम्हाला केरडी आणि मुदगल गावासाठी टॅक्सी करावी लागेल. गावापासून साधारण ४-५ किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर तुम्ही केशवनाथेश्वर मंदिरापर्यंत पोहचाल.






