Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डेस्टिनेशन वेडिंग सोडा आता सुरू आहे ‘डीवाईन वेडिंग’चा ट्रेंड, भारतातील प्राचीन मंदिरं तुमच्या विवाहसोहळ्याची शान वाढवतील

भारतामध्ये जोडपी आता गोंगाटापेक्षा शांत, पवित्र आणि अध्यात्मिक मंदिरांमध्ये विवाह करण्यास अधिक आकर्षित होत आहेत. विविध राज्यांतील प्राचीन मंदिरे दिव्यता, निसर्ग आणि संस्कृतीच्या संगमात अविस्मरणीय वेडिंग अनुभव देतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 07, 2025 | 08:14 AM
डेस्टिनेशन वेडिंग सोडा आता सुरू आहे 'डीवाईन वेडिंग'चा ट्रेंड, भारतातील प्राचीन मंदिरं तुमच्या विवाहसोहळ्याची शान वाढवतील

डेस्टिनेशन वेडिंग सोडा आता सुरू आहे 'डीवाईन वेडिंग'चा ट्रेंड, भारतातील प्राचीन मंदिरं तुमच्या विवाहसोहळ्याची शान वाढवतील

Follow Us
Close
Follow Us:
  • आजकाल मंदिरांमध्ये लग्नाचा घाट घालण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे
  • मंदिरातील शांत आणि सुंदर वातावरणात लोक आपले लग्न करू पाहत आहेत
  • भारतातील काही प्रमुख मंदिरे यासाठी खास लोकप्रिय ठरत आहेत
अलीकडच्या काळात जोडपी गोंगाटमय डेस्टिनेशन वेडिंग्सऐवजी शांत, पवित्र आणि अध्यात्मिक ऊर्जा असलेल्या मंदिरांमध्ये विवाह करण्याकडे अधिक आकर्षित होत आहेत. नुकतेच दक्षिण भारतीय अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू हिने ईशा योग केंद्रातील लिंग भैरवी मंदिरात विवाह केल्याच्या छायाचित्रांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. जर तुम्हालाही आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात पवित्र आणि शांत वातावरणात करायची असेल, तर भारतातील अनेक प्राचीन मंदिरे तुमच्या स्वप्नातील वेडिंगसाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. या मंदिरांची दिव्यता, नैसर्गिक सौंदर्य आणि अध्यात्मिक स्पंदने तुमच्या लग्नाला अविस्मरणीय बनवतील.

आंध्र प्रदेश

भव्यतेने नटलेली दक्षिण भारतीय देवस्थाने… दक्षिण भारतातील तिरुमाला-तिरुपती येथील गोविंदराजा स्वामी कल्याण मंडपम येथे विवाह अत्यंत शुभ मानला जातो. तसेच श्रीकालहस्ती मंदिर, सिंहाचलम मंदिर आणि विजयवाडा येथील कनकदुर्गा मंदिर हे त्यांच्या धार्मिक उर्जेमुळे वेडिंग डेस्टिनेशन म्हणून विशेष ओळखले जातात.

लोकांमध्ये वाढतोय धार्मिक पर्यटनाचा ट्रेंड, या तीर्थक्षेत्राला अधिक मागणी; टूर ऑपरेटरचे नवीन पॅकेज लाँच

आसाम

निसर्ग आणि अध्यात्माचा अनोखा मिलाफ. असममधील कामाख्या देवी शक्तीपीठ हे विवाहासाठी अत्यंत पवित्र मानले जाते. ब्रह्मपुत्रेच्या मध्यभागी वसलेले उमानंदा मंदिर हे शांत, अनोखे आणि अविस्मरणीय वेडिंग लोकेशन आहे. तसेच हयग्रीव माधव मंदिर आणि शिवडोल हेही सुंदर आणि मनःशांती देणारे स्थळे आहेत.

महाराष्ट्र आणि गुजरात

परंपरा आणि संस्कृतीचे मजबूत आधारस्तंभ असलेल्या महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर (नाशिक), भीमाशंकर, गणपतिपुळे, जेजुरी खंडोबा, तसेच कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर विवाहासाठी पवित्र आणि लोकप्रिय आहेत. गुजरातमध्ये सोमनाथ, द्वारकाधीश, अंबाजी आणि भव्य वास्तुकलेसाठी प्रसिद्ध मोढेरा सूर्य मंदिर हे शांत, पौराणिक आणि वेगळा अनुभव देणारे वेडिंग स्पॉट आहेत.

पंजाब आणि राजस्थान

राजेशाही सौंदर्य आणि अध्यात्म दोन्हींची जोड पंजाबमध्ये अमृतसरचे दुर्गियाना मंदिर, अनेक ISKCON मंदिरे, श्री देवी तालाब मंदिर, श्री राम तीर्थ, तसेच पटियाला काली माता मंदिर लोकप्रिय आहेत. राजस्थानमध्ये जयपूरचे बिरला मंदिर, पुष्करचे ब्रह्मा मंदिर, उदयपुरचे एकलिंगजी, बीकानेरचे करणी माता मंदिर आणि अनेक प्राचीन अंबिका माता मंदिर टेंपल वेडिंगसाठी उत्तम मानले जातात.

Hidden Gems Of Mumbai : गर्दीपासून दूर मुंबईजवळ लपलेली सुंदर ठिकाणे, विकेंडला नक्की फिरून या 

कर्नाटक आणि ओडिशा 

निसर्गरम्य परिसरातील दैवी स्थळे कर्नाटकात अनुभवायला मिळतील.  कर्नाटकातील मुरुदेश्वर, उडुपी श्रीकृष्ण मंदिर, धर्मस्थळ, शांत समुद्रकिनाऱ्यांमधील गोकर्णा, तसेच श्रृंगेरी विद्याशंकर मंदिर हे दैवी वातावरणामुळे लग्नासाठी आकर्षक पर्याय आहेत. ओडिशातील लिंगराज मंदिर, पुरी श्रीजगन्नाथ मंदिर, आणि भव्यतेचे प्रतीक कोनार्क सूर्य मंदिर (प्रतिनिधिक विधींसाठी) हीही उत्तम धार्मिक ठिकाणे आहेत.

उत्तराखंड आणि हिमाचल

दिव्यता आणि निसर्गाचा सुंदर संगम. उत्तराखंडला ‘देवभूमी’ म्हणून ओळखले जाते. येथील त्रियुगीनारायण मंदिर (रुद्रप्रयाग) हे सर्वात खास मानले जाते, कारण पुराणकथेनुसार येथेच भगवान शिव-पार्वतीचा विवाह झाला होता. त्यामुळे येथे विवाह करणे म्हणजे दैवी आशीर्वाद प्राप्त केल्यासारखे मानले जाते. याशिवाय केदारनाथ, बद्रीनाथ, तसेच शांत वनराईत वसलेले जागेश्वर धाम, नीलकंठ महादेव (ऋषिकेश), दक्षिणेश्वर महादेव (हरिद्वार) आणि कल्पेश्वर (चमोली) हेही टेंपल वेडिंगसाठी उत्तम ठिकाणे आहेत. हिमाचल प्रदेशात ज्वाला देवी, चिंतपूर्णी, नैना देवी आणि मनालीतील प्रसिद्ध हिडिंबा देवी मंदिर लग्नासाठी लोकप्रिय पर्याय आहेत.

जर तुमच्या स्वप्नातील विवाहात शांतता, अध्यात्म, संस्कृती आणि पवित्रतेचा संगम हवा असेल, तर भारतातील ही मंदिरं तुमच्या वेडिंगला अनोखी आणि आयुष्यभर लक्षात राहील अशी दिव्यता देऊ शकतात.

Web Title: Indian temples that are now trending for wedding destination travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 08:09 AM

Topics:  

  • temple
  • travel news
  • Wedding Season

संबंधित बातम्या

Hidden Gems Of Mumbai : गर्दीपासून दूर मुंबईजवळ लपलेली सुंदर ठिकाणे, विकेंडला नक्की फिरून या 
1

Hidden Gems Of Mumbai : गर्दीपासून दूर मुंबईजवळ लपलेली सुंदर ठिकाणे, विकेंडला नक्की फिरून या 

लोकांमध्ये वाढतोय धार्मिक पर्यटनाचा ट्रेंड, या तीर्थक्षेत्राला अधिक मागणी; टूर ऑपरेटरचे नवीन पॅकेज लाँच
2

लोकांमध्ये वाढतोय धार्मिक पर्यटनाचा ट्रेंड, या तीर्थक्षेत्राला अधिक मागणी; टूर ऑपरेटरचे नवीन पॅकेज लाँच

‘व्हाइट मार्बल सिटी’ च्या नावाने ओळखलं जातं हे शहर, बिल्डिंगपासून गाड्यांपर्यंत इथे सर्वांचाच रंग दिसेल पांढरा
3

‘व्हाइट मार्बल सिटी’ च्या नावाने ओळखलं जातं हे शहर, बिल्डिंगपासून गाड्यांपर्यंत इथे सर्वांचाच रंग दिसेल पांढरा

Thane : दीडशे वर्षे जुन्या दत्त मंदिरात भक्तांची अलोट गर्दी
4

Thane : दीडशे वर्षे जुन्या दत्त मंदिरात भक्तांची अलोट गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.