Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नवरदेवाने माप ओलांडायचे, आणि नवरीने भरायचे..’ अशीही होती पूर्वी जोडप्याच्या गृह्प्रवेशाची परंपरा!

महाराष्ट्रातील काही भागांमध्ये, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागात १९८०-९० च्या दशकापर्यंत (आणि काही ठिकाणी आजही) "माप ओलांडणे" या विधीचे वेगवेगळे प्रकार प्रचलित होते. आज सर्वसाधारणपणे नववधू सासरी प्रवेश करताना तांदळाने भरलेले माप ओलांडते;  असे असले तरी पूर्वी काही कुटुंबांत नवरदेवानेही माप ओलांडण्याची प्रथा होती.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 12, 2026 | 09:01 PM
‘नवरदेवाने माप ओलांडायचे, आणि नवरीने भरायचे..’ अशीही होती पूर्वी जोडप्याच्या गृह्प्रवेशाची परंपरा!
Follow Us
Follow Us:

भारत हा विविध परंपरांनी नटलेला देश आहे. वेगवेगळे सण, लग्नकार्य, विधी, रूढी-परंपरा भारताच्या वेगवेगळ्या भागात विविध पद्धतींनी साजर्या केल्या जातात. महाराष्ट्रातही अशा बऱ्याच परंपरा आहेत, ज्या महाराष्ट्रातीलचं वेगवेगळ्या भागात नाविन्यपूर्ण रीतीने पूर्ण केल्या जातात. लग्नकार्यामध्ये अशा बऱ्याच विधी असतात, ज्या त्या त्या भागाच्या आलेल्या चालीरीतींप्रमाणे पार पडल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे नवीन जोडप्याच्या गृह्प्रवेशावेळेची ‘माप ओलांडण्याची’ परंपरा.

महाराष्ट्रातील काही भागांमध्ये, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागात १९८०-९० च्या दशकापर्यंत (आणि काही ठिकाणी आजही) “माप ओलांडणे” या विधीचे वेगवेगळे प्रकार प्रचलित होते. आज सर्वसाधारणपणे नववधू सासरी प्रवेश करताना तांदळाने भरलेले माप ओलांडते;  असे असले तरी पूर्वी काही कुटुंबांत नवरदेवानेही माप ओलांडण्याची प्रथा होती. या प्रथेमागील विचार आज आपण समजून घेऊयात,

Delay In Marriage Remedies: लग्नाला का होतोय उशीर? ज्योतिषांनी दिले कारण, उपाय करून पहाच

यामागील संकल्पना थोडी वेगळी होती. विवाहानंतर नवरीला घेऊन जेव्हा वर प्रथमच आपल्या घरी येत असे, तेव्हा घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले धान्याने भरलेले माप वराने प्रथम ओलांडावे आणि त्यानंतर वधूने ते सांडलेले माप भरावे आणि प्रवेश करावा, अशी पद्धत काही ठिकाणी होती. धान्याने भरलेले माप हे घरातील समृद्धी, अन्नसंपन्नता आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाई. वराने,नवरदेवाने ते ओलांडणे म्हणजे घराच्या जबाबदाऱ्या स्वीकारणे, कुटुंबाचे पालनपोषण करण्याची तयारी आणि गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याचे प्रतीक मानले जायचे.

ही प्रथा विशेषतः त्या काळात अधिक दिसत असायची जेव्हा संयुक्त कुटुंब पद्धती जास्त होती. नवरा मुलगा हा कुटुंबाचा भावी कर्ता पुरुष मानला जात असल्याने त्याच्या गृहप्रवेशालाही धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व दिल जायचं. नंतरच्या काळात विवाहसंस्कार वेगवेगळ्या बाजूंनी प्रभावित होत गेले आणि नववधूच्या गृहप्रवेशातील “माप ओलांडणे” हा भागच अधिक प्रसिद्ध झाला.

Redi Ganpati: कोकणातील दोन भुजा असलेला रेडीचा गणपती, काय आहेत या मूर्तीची वैशिष्ट्ये जाणून घ्या

लोकसाहित्य आणि कौटुंबिक परंपरांमध्ये माप ओलांडणे हे केवळ गृहप्रवेशाचे कृत्य नसून समृद्धी, शुभारंभ आणि नव्या आयुष्याच्या स्वीकाराचे प्रतीक मानले गेले आहे. त्यामुळे काही जुन्या छायाचित्रांमध्ये किंवा १९८०-९० च्या दशकातील लग्नांच्या अल्बममध्ये नवरदेव माप ओलांडतानाचे दृश्य आजही बघायला मिळतील. ही प्रथा संपूर्ण महाराष्ट्रात सारखी नव्हती. प्रत्येक भागातील रितीरिवाज, कुटुंबाच्या परंपरा आणि स्थानिक संस्कृतीनुसार तिच्या पद्धती बदलत असत.

Web Title: Indian wedding rituals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 08:53 PM

Topics:  

  • Wedding

संबंधित बातम्या

Samay Raina: समय रैना लवकरच चढणार बोहल्यावर? ‘12th Fail’ फेम अभिनेत्रीच्या नावाची जोरदार चर्चा; म्हणाला, ‘दोन महिन्यांनंतर तर…’
1

Samay Raina: समय रैना लवकरच चढणार बोहल्यावर? ‘12th Fail’ फेम अभिनेत्रीच्या नावाची जोरदार चर्चा; म्हणाला, ‘दोन महिन्यांनंतर तर…’

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
2

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.