
प्रवासापूर्वी आवश्यक आरोग्य तपासणी आणि संसर्गाविषयी चाचण्या
तुम्ही एखाद्या सहलीचे नियोजन आखताय? मग प्रवासापूर्वी आवश्यक आरोग्य तपासणी आणि संसर्गाविषयी चाचण्या करायला विसरु नका. या चाचण्या तुम्हाला सुरक्षित आणि निरोगी राहण्यास मदत करू शकतात. तुम्हाला सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या चाचण्यांविषयीची माहिती डॉ. पुष्कर शिकारखाने, इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट, लीलावती हॉस्पिटल, मुंबई यांनी या लेखाच्या माध्यमातून दिली आहे.
हल्ली नवीन विषाणू, संक्रमण आणि आरोग्य समस्या उद्भवल्यामुळे एखाद्याच्या एकूण आरोग्याविषयी अनेक चिंता वाढल्या आहेत. हे संक्रमण एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात आणि अनेक जीवघेण्या रोगांचा धोका वाढवतात, विशेषत: तुम्ही प्रवास करत असताना. जेव्हा तुम्ही नवीन ठिकाणी भेट देता तेव्हा वातावरणामुळे विविध जीवाणू आणि विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
आरोग्य तपासणी
प्रवासापूर्वी आरोग्य तपासणी आणि आवश्यक निदान तपासणी करणे महत्त्वाचे ठरते. या चाचण्या तुमच्या सध्याच्या आरोग्य स्थितीबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी देऊ शकतात. हे आरोग्यविषयक माहिती देते जेणेकरुन प्रवासाच्या योजना आखण्यास आणि तुमच्या आहारातील निवडीबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करू शकते. तुमचे शारीरिक आरोग्य समजून घेऊन तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त रहावे व प्रवासाचा सुखद अनुभव घेण्यासाठी लसीकरण करणे आणि तुमची औषधे वेळेवर घेणे यासारखी आवश्यक खबरदारी घेऊ शकता.
लसीकरण करा
सहलीपूर्वी योग्य लसीकरण झाले की नाही तपासा
लसीकरणाबाबत तुम्हाला विविध प्राणघातक संसर्ग आणि आरोग्याच्या समस्यांचा धोका टाळता येऊ शकतो जो तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. यामध्ये इन्फ्लूएंझा व्हायरस, टायफॉइड आणि यल्लो फिवर यांसारख्या रोगांवरील लसीकरणाचा समावेश असू शकतो. तुम्ही न चुकता फ्लूची लस घ्या. हे लसीकरण सामान्यतः सुरक्षित असतात आणि आजारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
हेदेखील वाचा – 38 टक्के भारतीय पॅकेटबंद फूड खाऊन भरतायत पोट, धक्कादायक दुष्परिणाम
रक्तदाब तपासणी
आपले ब्लड प्रेशर योग्य आहे की नाही तपासा
जर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी कोणतेही आजार असतील तर प्रवास सुरू करण्यापूर्वी तुमच्या रक्तदाब पातळीचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. रक्तदाबाची पातळी वाढल्याने विविध आरोग्यविषयक गुंतागुंत होण्याचा धोका वाढू शकतो. म्हणूनच सुरक्षित प्रवासासाठी रक्तदाबाची निरोगी पातळी व्यवस्थापित करणे गरजेचे आहे.
रक्तातील साखरेचे निरीक्षण
ज्यांना मधुमेह आहे किंवा भविष्यात ही स्थिती विकसित होण्याचा धोका अधिक आहे त्यांनी प्रवास करण्यापूर्वी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी तपासली पाहिजे. रक्तातील साखरेच्या पातळीमधील चढ-उतार अनेक आरोग्यविषयक गुंतागुंतींना कारणीभूत ठरू शकते, विशेषत: अनोळखी ठिकाणी प्रवास करताना यामुळे धोका उद्भवू शकतो.
हेदेखील वाचा – जेवल्यावर त्वरीत वाढतेय Blood Sugar? 30 मिनिट्स आधी करा असे काम की राहील नियंत्रणात
श्वसन संक्रमण चाचणी
श्वसनाचा आजार असल्यास तपासणी करा
श्वासोच्छवासासंबंधी वैद्यकीय इतिहास असलेल्या लोकांची श्वसन संक्रमणाची चाचणी करावी, विशेषत: जर जे हवेची गुणवत्ता खराब असलेल्या किंवा प्रदूषणा असलेल्या ठिकाणी प्रवास करतात. इन्फ्लूएंझा व्हायरस किंवा रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस (RSV) सारख्या परिस्थितींसाठी विशेष चाचणी संभाव्य आरोग्य धोके ओळखण्यात मदत करू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार न्यूमोकोकल लस घ्या. लांबच्या प्रवासादरम्यान सुरक्षित आणि निरोगी राहा आणि कोणत्याही प्रकारचे संक्रमण आणि ऍलर्जी टाळण्यासाठी सर्व आवश्यक गोष्टी आणि औषधे सोबत ठेवण्याची खात्री करा.
वेळोवळी हात स्वच्छ धुणे, खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर हात किंवा रुमाल धरा आणि उघड्या, असुरक्षित ठिकाणी अस्वच्छ पाणी आणि अन्नाचे सेवन टाळा. प्रत्येकाने ही खबरदारी घेणे गरजेचे आहे.