Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

International Stuttering Awareness Day: ‘नीट बोल’चा दबाव तोतरेपणाची भीती वाढवतो! शाळेत जाणाऱ्या ५ टक्के मुलांमध्ये आढळतो तोतरेपणा

International Stuttering Awareness Day: २२ ऑक्टोबर रोजी जगभरात तोतरेपणा जनजागृती दिन साजरा केला जातो. जगभरातील कोट्यवधी लोकांना तोतरेपणाचा किंवा बोलताना अडखळण्याचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी वेगवेगळ्या स्पीच थेरपीसुद्धा केल्या जातात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 22, 2026 | 11:45 AM
International Stuttering Awareness Day: 'नीट बोल'चा दबाव तोतरेपणाची भीती वाढवतो! शाळेत जाणाऱ्या ५ टक्के मुलांमध्ये आढळतो तोतरेपणा

International Stuttering Awareness Day: 'नीट बोल'चा दबाव तोतरेपणाची भीती वाढवतो! शाळेत जाणाऱ्या ५ टक्के मुलांमध्ये आढळतो तोतरेपणा

Follow Us
Follow Us:

International Stuttering Awareness Day: नीट बोल’, ‘अडखळू नकोस’, ‘काय बोलतोयस ते व्यवस्थित सांग’ मुलांना सहजपणे सांगितले जाणारे हे शब्द कधीकधी त्यांच्या मनात बोलण्याचीच भीती निर्माण करू शकतात. एखादे मूल भाषा शिकताना अडखळत असेल, तर त्याला सतत बोलण्यावरून टोकणे, चिडवणे किंवा ओरडणे यामुळे त्याचा आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो. पुढे बोलताना आपण पुन्हा अडखळू का, या विचाराने त्याचे बोलणे आणखी अडखळू शकते. त्यामुळे तोतरेपणाकडे बोलण्यातील दोष म्हणून नव्हे, तर व्यक्तीच्या आत्मविश्वासाशी जोडलेली केवळ समस्या म्हणून पाहणे गरजेचे आहे.(फोटो सौजन्य – istock)

Urinary Incontinence: खोकताना, शिंकताना लघवीचे थेंब पडतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका

तोतरेपणा जनजागृती दिन का साजरा केला जातो?

२२ ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय तोतरेपणा जनजागृती दिनानिमित्त हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. तोतरेपणा म्हणजे बोलताना शब्दांची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती होणे, आवाज लांबवणे अथवा बोलताना अडथळे येणे. लहान मुलांमध्ये भाषा शिकण्याच्या टप्प्यावर अडखळणे दिसू शकते; मात्र प्रत्येक वेळी ते तोतरेपणाचे लक्षण असेलच असे नाही. अडखळण्याचे स्वरूप, त्याचा कालावधी आणि त्याचा संवादावर होणारा परिणाम यांचे तज्ज्ञांकडून मूल्यमापन होणे महत्त्वाचे आहे.

नायर रुग्णालयाच्या ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती माहिते यांच्या म्हणण्यानुसार, बोलताना श्वास, आवाज आणि उच्चार यांच्यात योग्य समन्वय असणे आवश्यक असते. या प्रक्रियेत अडथळे आल्यास बोलण्यात अडखळणे दिसू शकते. त्यातच एखादा वाईट अनुभव, लोकांसमोर बोलण्याची भीती किंवा पूर्वी झालेली चेष्टा यांमुळे मानसिक दडपण वाढू शकते. काही जणांना अनोळखी व्यक्तींसमोर बोलताना अडचण जाणवते, तर काहींना परिचित व्यक्तींसमोरही बोलताना ताण येतो.

नायरमध्ये दररोज ५० ते ६० रुग्णांना थेरपी

तोतरेपणासह विविध प्रकारच्या बोलण्याच्या अडचणींवर स्पीच थेरपीद्वारे काम केले जाते. नायर रुग्णालयात दररोज स्पीच थेरपीची ओपीडी चालते. येथे किमान ५० ते ६० रुग्णांना थेरपी दिली जाते. नियमित उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांसोबत नवीन रुग्णही दाखल होतात. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेऊनही अपेक्षित मदत न मिळाल्यानंतर नायरमध्ये येणाऱ्या रुग्णांचाही त्यात समावेश असतो. केवळ तोतरेपणाच नव्हे, तर लकवा आल्यामुळे बोलण्यात अडचण निर्माण झालेले रुग्ण, ओठ फाटलेले असल्याने बोलण्यावर परिणाम झालेले रुग्ण आणि इतर संवादविषयक समस्या असलेल्यांनाही स्पीच थेरपीची गरज भासते. त्यामुळे या उपचारांचे महत्त्व केवळ स्पष्ट बोलण्यापुरते मर्यादित नसून, व्यक्तीला पुन्हा संवाद साधता यावा आणि दैनंदिन जीवनात आत्मविश्वासाने सहभागी होता यावे, यासाठीही आहे.

Sudden Memory Loss Case : अशक्तपणा नाही, ना बोलण्यात अडचण; तरी अचानक स्मरणशक्ती गेली, ६० वर्षीय व्यक्तीला दुर्मिळ स्ट्रोकचा फटका

‘स्पीच थेरपी बाबत माहिती नसल्याने उशिरा उपचार करण्यास येणारे अधिक आहे. थेरपीत काही तंत्र दिली जातात आणि सत्रातून सराव करवून घेतला जातो. नायर हे ६० वर्षांपूर्वी स्थापन झालेले स्पीच थेरपी केंद्र असून आग्नेय आशियातील हे आद्य केंद्र आहे. स्पीच थेरपी शिकविणारी केंद्र देखील कमी असल्याचे नोंद प्रशासनाने घ्यावी. राज्यात नायर, आलियावर जंग आणि भारती विद्यापीठ अशी तीनच केंद्र आहेत. कुटुंबात अडखळत बोलणारा कोणी असल्यास त्यावर थेरपीचे सातत्य ठेवल्यास व्यक्ती न अडखळता बोलू शकतो प्रशासन आणि पालक दोन्हीकडे जागरूकता हवी, अशी माहिती डॉ. ज्योती मोहिते, ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी विभाग प्रमुख, नायर रुग्णालय यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: तोतरेपणा जनजागृती दिन का साजरा केला जातो?

    Ans: तोतरे बोलणाऱ्या व्यक्तींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे आणि त्यांच्याविरुद्ध होणारा भेदभाव किंवा चेष्टा थांबवणे.

  • Que: हा दिवस साजरा करण्याची सुरुवात कधी झाली?

    Ans: या दिवसाची सुरुवात १९९८ मध्ये झाली. 'इंटरनॅशनल स्टटरिंग असोसिएशन' (ISA), 'इंटरनॅशनल फ्लुएन्सी असोसिएशन' (IFA) आणि 'युरोपियन लीग ऑफ स्टटरिंग असोसिएशन्स' (ELSA) या संस्थांनी मिळून हा दिवस सुरू केला.

  • Que: तोतरेपणा येण्याचे मुख्य कारण काय आहे?

    Ans: जर कुटुंबात आधी कोणाला तोतरेपणा असेल, तर मुलांमध्ये हा त्रास होण्याची शक्यता वाढते.

Web Title: International stuttering awareness day the pressure to speak properly increases the fear of stuttering sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • day history
  • Health Care Tips
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Caps Lock Day: तंत्रज्ञानप्रेमींसाठी विनोदाची पर्वणी; जाणून घ्या ‘कॅप्स लॉक’ बटणाची इंटरनेट संस्कृतीतील भन्नाट आणि रंजक गोष्ट
1

Caps Lock Day: तंत्रज्ञानप्रेमींसाठी विनोदाची पर्वणी; जाणून घ्या ‘कॅप्स लॉक’ बटणाची इंटरनेट संस्कृतीतील भन्नाट आणि रंजक गोष्ट

National Nut Day: आरोग्याचा नैसर्गिक पॉवरहाऊस! ‘राष्ट्रीय सुकामेवा दिनानिमित्त जाणून घ्या काय आहेत त्याचे वैज्ञानिक फायदे?
2

National Nut Day: आरोग्याचा नैसर्गिक पॉवरहाऊस! ‘राष्ट्रीय सुकामेवा दिनानिमित्त जाणून घ्या काय आहेत त्याचे वैज्ञानिक फायदे?

Dinvishesh 22 October: आज जेष्ठ साहित्यकार नारायण सीताराम फडके यांचा स्मृतीदिन: जाणून घ्या २२ ऑक्टोबरचा इतिहास..
3

Dinvishesh 22 October: आज जेष्ठ साहित्यकार नारायण सीताराम फडके यांचा स्मृतीदिन: जाणून घ्या २२ ऑक्टोबरचा इतिहास..

Urinary Incontinence: खोकताना, शिंकताना लघवीचे थेंब पडतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका
4

Urinary Incontinence: खोकताना, शिंकताना लघवीचे थेंब पडतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.