
Urinary Incontinence: खोकताना, शिंकताना लघवीचे थेंब पडतात? शरीरसंबंधित असू शकतो 'या' गंभीर आजारांचा धोका
Urinary Incontinence: जीवनशैलीत सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा मोठ्याने हसताना, खोकताना, शिंकताना किंवा कोणतीही जड वस्तू उचलल्यामुळे लघवीचे थेंब अचानक बाहेर पडतात. ही समस्या महिलांसह पुरुषांमध्ये सुद्धा दिसून येते. वय वाढणे, प्रसूतीनंतर किंवा मूत्राशय कमकुवत झाल्यामुळे लाघवीसंबंधित विविध समस्या उद्भवू लागतात. सर्वच महिला कामाच्या धावपळीमध्ये शरीराची काळजी घेणे पूर्णपणे विसरून जातात. शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. असे न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. पोटाच्या आतील दाब अचानक वाढवणाऱ्या हालचालींमुळे लघवीमध्ये गळती होते, याला वैद्यकीय स्थितीमध्ये स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिनन्स असे म्हणतात.(फोटो सौजन्य – istock)
लघवीमध्ये गळती होणे ही समस्या महिला आणि पुरुषांमध्ये दिसून येते. गरोदरपण आणि बाळंतपणामुळे पेल्विक फ्लोअरवर प्रचंड तणाव येतो. नैसर्गिक प्रसूती, वारंवार होणारे गरोदरपण, कंबरेच्या भागातील शस्त्रक्रिया आणि मेनोपॉज, शरीरात सतत होणारे हार्मोनल बदल, वाढते वय, लठ्ठपणा, स्नायू कमकुवत होणे इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे लघवीसंबंधित समस्या उद्भवू लागतात.
पुरुषांमध्ये प्रामुख्याने प्रोस्टेटची शस्त्रक्रिया किंवा प्रोस्टेटसंबंधित उपचारानंतर लघवीसंबंधित बदल शरीरात दिसून येतात. पेल्विक भागातील शस्त्रक्रिया, चेतासंस्थेचे आजार, स्फिंक्टर कमकुवत होणे इत्यादी कारणांमुळे लघवी गळण्याची जास्त शक्यता असते. बऱ्याचदा पुरुष या समस्येवर बोलणे टाळतात किंवा मनात संकोच निर्माण होतो. पण असे केल्यामुळे आजार वाढण्याची जास्त शक्यता असते.
वारंवार लघवीला जावे लागणे.
लघवी करताना तीव्र जळजळ होणे.
अचानक लघवीमधून रक्त पडणे
वारंवार युरिन इन्फेक्शन.
मूत्राशय पूर्ण रिकामे न होणे, इत्यादी लक्षणे वारंवार दिसत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे.
पेल्विक फ्लोअर स्नायूंचे व्यायाम स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिनन्ससाठी अतिशय प्रभावी ठरतात. याशिवाय कीगेल व्यायाम प्रकार केल्यास लघवीच्या समस्या कमी होतात. व्यायाम केल्यामुळे लघवीचा प्रवाह सुधारतो, स्नायूंना आकुंचित आणि शिथिल केले जाते. पण हा व्यायाम प्रकार योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. लक्षणे वाढू लागल्यास वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. पेल्विक फ्लोअर फिजियोथेरपिस्ट आणि डॉक्टरांचे योग्य मार्गदर्शन घेतल्यास गंभीर आजारावर सुद्धा मात करता येईल. तसेच वजन नियंत्रणात ठेवणे, पुरेशी झोप, पोषक आहार इत्यादी गोष्टी सुद्धा तितक्याच आवश्यक आहे.
Ans: मूत्र असंयम म्हणजे जेव्हा व्यक्तीचे मूत्राशयावर किंवा लघवीच्या प्रवासावर नियंत्रण राहत नाही आणि नकळत लघवी बाहेर पडते.
Ans: हसताना, खोकताना, शिंकताना किंवा जड वस्तू उचलताना मूत्राशयावर दाब येऊन लघवी गळणे.
Ans: डॉक्टरांकडून रुग्णाचा जुनाट आजारांचा इतिहास तपासला जातो.