Is Alcohol Veg or Nonveg: भारत असो वा परदेश मद्यप्रेमींची कुठेच कमी नाही, भारतासह जगभरात अनेक प्रकारची वेगवेगळी मद्ये मिळतात. त्यातही रम, व्हिस्की आणि बिअर, हे सर्व पेये लोकांची विशेष आवडीची आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ही पेये शाकाहारी आहेत की मांसाहारी? खरंतर, कधीकधी या पेयांमध्ये अशा काही गोष्टी वापरल्या जातात ज्यामुळे ती पेये मांसाहारी बनतात. अशा परिस्थितीत, तुम्ही जे पेये पीता ती शाकाहारी आहेत की मांसाहारी हे कसे ओळखायचे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर तुम्हाला काही गोष्टी आवर्जून पाहाव्या लागतील.
रम बनवण्यासाठी सहसा उसाचा रस किंवा गुळ, पाणी आणि यीस्टचा वापर केला जातो. त्याची किण्वन आणि ऊर्धपातन प्रक्रिया पूर्णपणे शाकाहारी आहे. ते बनवण्यासाठी, उसाच्या रसात यीस्ट घालून आंबवले जाते, नंतर डिस्टिलेशनद्वारे रम तयार केली जाते. यात प्राण्यांपासून बनवलेले कोणतेही घटक नाहीत.
Shravan 2025 : श्रावण महिन्यात कसा असावा आहार? काय सांगतं आयुर्वेद ?
व्हिस्की धान्यांपासून (जसे की बार्ली, कॉर्न, राई किंवा गहू), पाणी आणि यीस्टपासून बनवली जाते. व्हिस्कीसाठीही देखील किण्वन आणि ऊर्धपातन प्रक्रिया केली जाते. यासाठी धान्याला माल्ट केले जाते, नंतर आंबवले जाते आणि डिस्टिल्ड केले जाते. सहसा त्यात कोणतेही प्राणीजन्य पदार्थ नसतात.
धान्य भिजवून, अंकुरित करून आणि नंतर वाळवून माल्ट बनवले जाते. या प्रक्रियेमुळे धान्यातील स्टार्च साखरेत रूपांतरित होते, ज्यामुळे ते यीस्टसाठी आंबण्यायोग्य बनते. माल्टचा वापर बिअर, व्हिस्की, माल्टेड मिल्कशेक आणि इतर पदार्थ आणि पेयांमध्ये केला जातो.
बिअर प्रामुख्याने बार्ली, हॉप्स, पाणी आणि यीस्टपासून बनवली जाते. ते बनवण्यासाठी, बार्लीला माल्ट करून आंबवले जाते, नंतर हॉप्स घालून बिअर तयार केली जाते. तर काही बिअर ब्रँड फिश ब्लॅडरमधून मिळवलेले आइसिंग्लास किंवा जिलेटिन फिल्टर करण्यासाठी वापरतात. म्हणून जर तुमच्या बिअरमध्ये आयसिंग्लास वापरला गेला असेल तर ती बिअर मांसाहारी आहे.
काही ब्रँड त्यांच्या उत्पादनांवर व्हेगन दर्जाचा उल्लेख करतात. बाटलीवरील लेबल काळजीपूर्वक वाचा. जर लेबलमध्ये कोणतीही माहिती नसेल, तर ब्रँडच्या वेबसाइटला किंवा कस्टमर केअरला विचारा.
द्राक्षांचा रस आंबवून वाइन तयार केली जाते. या प्रक्रियेला किण्वन म्हणतात, ज्यात यीस्ट (सांध्यजीवाणू) द्राक्षांतील साखर अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइडमध्ये रूपांतरित करतो. वाइन बनवताना द्राक्षे निवडली जातात, कुस्करली जातात आणि नंतर आंबण्यासाठी ठेवली जातात. किण्वनाचा कालावधी, तापमान, द्राक्षांची जात आणि उत्पादन पद्धती यांच्या आधारे वाइनची चव आणि प्रकार ठरतो.
बहुतांश वाइन शाकाहारी वाटतात, पण प्रत्यक्षात काही वाइन मांसाहारी असू शकतात. याचे कारण म्हणजे वाइन बनवताना वापरली जाणारी “फायनिंग” ही प्रक्रिया. फायनिंगमध्ये वाइनमधील गढूळपणा, कण, आणि अनावश्यक घटक वेगळे करण्यासाठी काही पदार्थ वापरले जातात — हेच पदार्थ कधी कधी प्राण्यांपासून बनवलेले असतात:
जिलेटिन: प्राण्यांच्या हाडांपासून तयार होते
आइसिंग्लास: माशांच्या मूत्राशयापासून
अंड्याचा पांढरा भाग किंवा दूधातील केसिन
या कारणांमुळे अशा वाइनला शुद्ध शाकाहारी किंवा व्हेगन म्हणता येत नाही.
(टीप-ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया कोणतेही पिण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ही पेये घेण्यासाठी नवराष्ट्र वृत्तवाहिनी प्रोत्साहन देत नाही)