अलीकडच्या काळात “व्हेज दूध” आणि “नॉनव्हेज दूध” या संकल्पनांवर तीव्र चर्चा सुरू आहे. भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक असून, येथे दूध केवळ आहाराचा भाग नाही, तर धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही त्याला महत्त्व आहे. अमेरिका भारतीय बाजारपेठेत आपले दूध विकण्यास इच्छुक आहे. मात्र भारताने स्पष्ट भूमिका घेतली आहे. अशा गायींचे दूध भारतात विकले जाणार नाही, ज्या गायींना मांस, मासे किंवा इतर मांसाहारी अन्न खाऊ घातले जाते. कारण भारतीय लोकसंख्येच्या मोठ्या वर्गासाठी दूध हे शुद्ध आणि सात्त्विक मानले जाते. ते फक्त पिण्यासाठीच नव्हे, तर पूजा, यज्ञ व इतर धार्मिक विधींमध्ये वापरले जाते. भारत सरकारने या संदर्भात स्पष्ट केले आहे की, अमेरिकेला भारतीय बाजारपेठेत प्रवेश हवा असेल, तर त्यांनी अशा गोमाता किंवा जनावरांपासून दूध मिळते आहे की नाही याची खातरजमा करावी लागेल, ज्यांना मांसाहारी आहार दिला जात नाही. हे धोरण भारतासाठी नॉन-नेगोशियेबल, म्हणजेच कोणत्याही स्थितीत बदल न करता येणारे आहे.
नॉनव्हेज दूध म्हणजे अशा गायी किंवा म्हशींकडून मिळालेले दूध, ज्यांना मांसाहारी अन्न – जसे की मासे, जनावरांचे अवशेष, रक्तमिश्रित खाद्य, वगैरे खाऊ घातले जाते. अनेक पशुखाद्य उत्पादक देशांमध्ये, विशेषतः अमेरिका, ब्राझील, युरोपमध्ये, जनावरांच्या आहारात प्रथिनांची वाढ करण्यासाठी अशा पदार्थांचा समावेश केला जातो.
‘उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भविष्यात एकत्र येतील’; शिवसेनेच्या मंत्र्याचं मोठं विधान
अमेरिका, ब्राझील, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया यांसारख्या अनेक देशांमध्ये अशा प्रकारचे दूध सहज उपलब्ध असते आणि त्याचा वापर दुग्धजन्य पदार्थांमध्ये केला जातो. मात्र, धार्मिक आस्थांमुळे किंवा शाकाहारी जीवनशैलीमुळे भारतात अशा दूधाला विरोध आहे.भारतात गायी, म्हशी किंवा बकरी यांसारखे दुग्धजन्य प्राणी शाकाहारी आहार घेतात. विशेषतः गायीला भारतात धार्मिक महत्त्व आहे. ती मातृवत पूजली जाते आणि तिच्या दुधाला शुद्ध, सात्त्विक आणि शाकाहारी मानले जाते. त्यामुळे येथे गायींना मांसाहारी आहार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
मात्र, अमेरिकेसारख्या देशांमध्ये परिस्थिती वेगळी आहे. तेथे अनेक वेळा गायींना अधिक दूध देण्यासाठी तयार केलेल्या प्रथिनयुक्त चाऱ्यात — मृत प्राण्यांच्या हाडांची पूड, चरबी, रक्त किंवा मांसजन्य पदार्थ वापरले जातात. त्यामुळे अशा गायींकडून मिळणारे दूध भारतात शुद्ध शाकाहारी मानले जात नाही. म्हणूनच भारत अशा दुधाला विरोध करतो.
मांसाहारी चाऱ्यावर आधारित दूध फक्त अमेरिकेतच नाही, तर खालील देशांमध्येही मोठ्या प्रमाणावर वापरले जाते:
युरोपमधील अनेक देश
मेक्सिको
रशिया
फिलीपिन्स
थायलंड
ब्राझील
ऑस्ट्रेलिया
जपान आणि जर्मनी
या देशांमध्ये पशुधनासाठी प्रथिनयुक्त चारा तयार करताना मांसाहारी घटक वापरणे सामान्य मानले जाते.