Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्करोगापासून होणार सुटका? इस्त्रायल संशोधकांनी शोधला ‘हा’ प्रभावी मार्ग

इस्त्रायल संशोधकांनी कर्करोगाच्या उपचारात एक महत्त्वाची क्रांती उघडकीस आणली आहे. इस्त्रायल संशोधकांनी एक प्रोटीन शोधून काढला आहे जो शरीराच्या प्रतिकारशक्तीला ट्यूमरवर आक्रमण करण्यापासून थांबवतो.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 05, 2024 | 01:12 PM
कर्करोगापासून होणार सुटका? इस्त्रायल संशोधकांनी शोधला 'हा' प्रभावी मार्ग

कर्करोगापासून होणार सुटका? इस्त्रायल संशोधकांनी शोधला 'हा' प्रभावी मार्ग

Follow Us
Close
Follow Us:

जेरूसेलम: इस्त्रायल संशोधकांनी कर्करोगाच्या उपचारात एक महत्त्वाची क्रांती उघडकीस आणली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेल अवीव विद्यापीठातील इस्त्रायल संशोधकांनी एक असा प्रोटीन शोधून काढला आहे. हा प्रोटीन शरीराच्या प्रतिकारशक्तीली ट्यूमरवर आक्रमण करण्यापासून थांबवतो असे या संशोधकांचे म्हणणे आहे. याबबत एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

तेल अवीव विद्यापीठातील संशोधकांनी शोध लावला

या अहवालानुसार, या प्रोटीनच्या कार्यप्रणालीमध्ये बदल करून त्यांनी प्रतिकारशक्तीला कर्करोगी पेशींवर हल्ला करण्यास सक्षम केले आहे. या शोधामुळे प्रतिकारशक्तीच्या उपचारांना प्रतिसाद न देणाऱ्या कर्करोगाच्या प्रकारांवरही उपचारांची नवी दिशा मिळू शकते असे संशोधकांचे म्हणणे आहे. हा शोध तेल अवीव विद्यापीठातील प्रोहा संशोधन प्रकल्प प्रो. कार्मिट लेव्ही, प्रो. यारोन कार्मी आणि MD, PhD विद्यार्थी अविशाई मालिया यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

हे देखील वाचा- इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे होणार मोठे युद्ध? पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे

मिळालेल्या माहितीनुसार, हा शोध Nature Communications या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. या अहवालानुसार, प्रो. लेव्ही यांच्या प्रयोगशाळेत कर्करोग आणि त्वचेवर अल्ट्राव्हायलेट (UV) किरणांचा परिणाम यावर संशोधन सुरू असताना हा शोध लागला. या शोधानुसार, UV किरणे त्वचेवरील प्रतिकारशक्तीला कमी करतात. परंतु यामगचे कारण स्पष्ट संशोधकांना स्पष्ट नव्हते.

Ly6a चे प्रमाण वाढलेले आढळले

लेव्ही यांच्या मते, UV किरणांचा प्रतिकारशक्तीवर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास करताना, Ly6a नावाच्या प्रोटीनची उपस्थिती आढळली. या प्रोटीनच्या उपस्थितीमुळे प्रतिकारशक्तीवर ब्रेक लागतो. प्राथमिक प्रयोगात, UV किरणांमुळे त्वचेतील T पेशींवर Ly6a प्रोटीन वाढलेले दिसले. या प्रोटीनमुळे प्रतिकारशक्ती कमी कार्यरत होत असल्याचे निरीक्षण झाले. मालिया यांनी UV किरणांच्या संपर्कात आलेल्या माऊस मॉडेलवर प्रयोग केले. त्यांना Ly6a चे प्रमाण वाढलेले आढळले.

जगभरातील कर्करोग रुग्णांसाठी नवी आशा

संशोधकांना प्रोटीनच्या वाढत्या प्रमाणावर अँटीबॉडीने उपचार करताच, कर्करोगी पेशींमध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले. यामुळे  रुग्णांना PD1 आधारित उपचारांचा फायदा होत नाही. संशोधकांनी सांगितले की, हे संशोधन मानवांवर वापरण्यासाठी आणखी चाचण्या आवश्यक आहेत. त्यावर आधारित औषध तयार करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. यामुळे, प्रतिकारशक्तीच्या वापरावर आधारित एक नवीन उपचारपद्धती विकसित होऊ शकते, यामुळे उपचारात आलेल्या मर्यादा ओलांडून, जगभरातील कर्करोग रुग्णांसाठी नव्या आशा निर्माण होऊ शकतील.

हे देखील वाचा- US Election 2024: भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण; अमेरिकेत बॅलेट पेपरवर दिसणार ‘ही’ भारतीय भाषा

Web Title: Israeli researchers identify protein that stops immune cells from attacking tumors nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 12:58 PM

Topics:  

  • Israel

संबंधित बातम्या

लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू
1

लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध
2

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.