Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flydubai: दुबई-तेल अवीव विमानाकडून आला हायजॅक अलर्ट, सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग; नेतान्याहूंनी बोलावली आपत्कालीन बैठकी

Flydubai : अपहरणाच्या धोक्यानंतर दुबईहून तेल अवीवला जाणारे विमान सौदी अरेबियाकडे वळवण्यात आले. विमानात १५० प्रवासी होते आणि इस्रायलमध्ये एक सुरक्षा बैठक घेण्यात आली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 30, 2026 | 01:28 PM
Flydubai flight hijack alert Dubai to Tel Aviv flight diverted

Flydubai flight hijack alert Dubai to Tel Aviv flight diverted

Follow Us
Follow Us:
  • हायजॅकचा आपत्कालीन इशारा
  • सौदी अरेबियात इमर्जन्सी लँडिंग
  • इस्रायलमध्ये उच्च सतर्कता

मध्यपूर्वेत तणावपूर्ण वातावरण असतानाच आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रातून एक अत्यंत थरारक आणि गंभीर बातमी समोर आली आहे. संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) दुबई शहरातून इस्रायलची राजधानी तेल अवीवकडे उड्डाण केलेल्या एका प्रवासी विमानात अचानक अपहरणाचा (Hijack) इशारा मिळाल्याने संपूर्ण आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली. सुमारे १५० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या फ्लायदुबईच्या (Flydubai) या बोईंग ७३७ विमानाचा अचानक संपर्क तुटल्याने आणि आपत्कालीन संकेत मिळाल्याने इस्रायलसह आशियाई देशांत प्रचंड खळबळ उडाली आहे.

सौदी हवाई हद्दीत आपत्कालीन कोड आणि ट्रान्सपॉन्डर बंद

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फ्लायदुबईचे बोईंग ७३७ विमान दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तेल अवीवच्या दिशेने नियमित उड्डाणावर होते. विमानाने सौदी अरेबियाची हवाई हद्द ओलांडत असताना अचानक असामान्य हालचाली दर्शवण्यास सुरुवात केली. विमानातून सर्वप्रथम सार्वत्रिक आपत्कालीन परिस्थिती दर्शवणारा ‘कोड ७७००’ (Squawk 7700) पाठवण्यात आला. परंतु, काहीच वेळात विमानातील ट्रान्सपॉन्डरवरून आंतरराष्ट्रीय हवाई सुरक्षेत ‘विमानाचे बेकायदेशीर अपहरण’ किंवा ‘हायजॅकिंग’ दर्शवणारा ‘कोड ७५००’ (Squawk 7500) प्रसारित झाला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

अपहरणाचा हा सांकेतिक कोड मिळताच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षात (ATC) प्रचंड घबराट पसरली. त्यानंतर लगेचच विमानातील कर्मचाऱ्यांशी संपर्क तुटला आणि विमानाचा ट्रान्सपॉन्डर पूर्णपणे बंद झाला, ज्यामुळे उड्डाण ट्रॅकिंग रडारवरून हे विमान काही काळासाठी अचानक गायब झाले.

#FZ1073 from Dubai to Tel Aviv squawking 7700 en route to Tel Aviv.https://t.co/BI5p7bTPrw pic.twitter.com/7fUP8XwwP3 — Flightradar24 (@flightradar24) September 30, 2026

credit – social media and Twitter

इस्रायली हवाई दलाची धाव आणि पंतप्रधान नेतान्याहूंची तातडीची बैठक

विमानात १५० हून अधिक इस्रायली नागरिक असल्याची माहिती मिळताच इस्रायलमध्ये सुरक्षेचा सर्वोच्च इशारा (High Alert) जारी करण्यात आला. कोणत्याही संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी इस्रायली हवाई दलाने (IAF) आपली लढाऊ विमाने (Fighter Jets) तातडीने हवेत रवाना केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) आणि संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ (Israel Katz) यांनी देशातील वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची तातडीची आपत्कालीन बैठक बोलावली.

JUST IN: 🇦🇪🇮🇱 Flydubai passenger airplane from Dubai to Tel Aviv declares emergency due to onboard fight. • Israeli fighter jets were scrambled. • Its transponder was shut off, disappearing from flight tracking. • The plane made an emergency landing in Saudi Arabia. — BRICS News (@BRICSinfo) September 30, 2026

credit – social media and Twitter

दरम्यान, तेल अवीवकडे जाणारे हे विमान इस्रायली हवाई हद्दीत प्रवेश करण्यापूर्वीच विमानाचा मार्ग अचानक बदलण्यात आला. विमानाने यू-टर्न घेतला आणि ते सौदी अरेबियातील तबूक (Tabuk) विमानतळाच्या दिशेने वळवले गेले. सुदैवाने, वैमानिकाने योग्य वेळी निर्णय घेत विमान तबूक विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : International Podcast Day: ऑडिओ कंटेंट निर्मितीतील क्रांती म्हणजे पॉडकास्ट; वाचा कसा होता ‘या’ माध्यमाचा रंजक प्रवास?

कॉकपिटमधील वैमानिकांचा वाद की तांत्रिक बिघाड?

विमान सौदीत सुरक्षित उतरल्यानंतर सुरक्षेचा निश्वास सोडण्यात आला असला, तरी अपहरणाचा कोड ७५०० का पाठवण्यात आला होता, याबद्दल विविध दावे केले जात आहेत. काहींच्या मते कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये अचानक वाद किंवा वैयक्तिक संघर्ष झाला, ज्यामुळे हा आपत्कालीन मेसेज गेला असावा. मात्र, संबंधित एअरलाइन किंवा सौदी/इस्रायली सुरक्षा यंत्रणांकडून विमानाच्या अपहरणाचा अधिकृत दुजोरा अद्याप देण्यात आलेला नाही.

हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, ७५०० आणि ७७०० हे कोड उड्डाणादरम्यान घडलेल्या अत्यंत गंभीर घटनेकडे स्पष्ट निर्देश करतात. सध्या सौदी अरेबियातील अधिकारी आणि फ्लायदुबई एअरलाइन या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत असून विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Web Title: Dubai tel aviv flydubai flight hijack alert diverted saudi arabia emergency landing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Dubai
  • Flights
  • Israel
  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

Israel-Gaza : ‘आणखी मदत नाही’; अमेरिकन डेमोक्रॅटिक उमेदवारांचा इस्रायलविरोधात कठोर पवित्रा
2

Israel-Gaza : ‘आणखी मदत नाही’; अमेरिकन डेमोक्रॅटिक उमेदवारांचा इस्रायलविरोधात कठोर पवित्रा

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू
3

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव
4

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.