Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रसाळ, नरम अन् तोंडात टाकताच विरघळणारा रसगुल्ला पण साखरेचा नाही तर गुळाचा… नोट करा रेसिपी

Jaggery Recipe : गुळाचे रसगुल्ले ही एक पारंपरिक मिठाईला दिलेली आरोग्यदायी आणि स्वादिष्ट देसी ट्विस्ट आहे. हे रसगुल्ले जेवणानंतर सर्व्ह केल्यास मन तर खुश होईलच शिवाय मनात कोणता अनहेल्दी खाल्ल्याचा गिल्टही राहणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 13, 2025 | 03:40 PM
रसाळ, नरम अन् तोंडात टाकताच विरघळणारा रसगुल्ला पण साखरेचा नाही तर गुळाचा... नोट करा रेसिपी

रसाळ, नरम अन् तोंडात टाकताच विरघळणारा रसगुल्ला पण साखरेचा नाही तर गुळाचा... नोट करा रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:
  • साखरेचे रसगुल्ले तर बऱ्याचदा आपण खाल्ले आहेत
  • साखरेऐवजी गुळापासूनही गोडसर आणि रसाळ रसगुल्ले तयार करता येतात
  • हे रसगुल्ले फार कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीत तयार होतात

रसगुल्ला म्हटलं की आपल्याला लगेच बंगाली मिठाईची आठवण होते, पांढऱ्या, रसाने भरलेल्या, नरम आणि रसाळ गोळ्या ज्या तोंडात टाकताच विरघळतात. पण पारंपरिक साखरेऐवजी जर आपण या रसगुल्ल्यांना गुळाच्या पाकात तयार केलं, तर त्यांना एक वेगळाच देसी आणि पौष्टिक स्वाद मिळतो. गुळामध्ये लोखंड, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे ही मिठाई केवळ स्वादिष्टच नाही, तर आरोग्यदायीही आहे. थंडीच्या दिवसांत गुळाचे पदार्थ शरीराला उष्णता देतात, त्यामुळे हा गुळाचा रसगुल्ला एकदम परफेक्ट डेसर्ट ठरतो.

Winter Special : मुळ्याची भाजी खायला आवडत नाही? मग नाश्त्याला बनवा खमंग पराठा; याची चव सर्वांनाच करेल खुश

गुळाचे रसगुल्ले बनवताना साखरेचा वापर टाळल्यामुळे ही मिठाई नैसर्गिक गोडीने भरलेली असते. घरच्या घरी कमी साहित्य वापरून तयार केलेली ही रेसिपी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीमध्ये तयार करता येते. चला तर मग गुळाचे रसगुल्ले तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती नोट करून घेऊयात.

साहित्य:

रसगुल्ल्यासाठी –

  • दूध – १ लिटर
  • लिंबाचा रस किंवा व्हिनेगर – २ चमचे (दूध फाडण्यासाठी)
  • पाणी – १ कप (छेना मळण्यासाठी)

गुळाच्या पाकासाठी –

  • गूळ – १ कप
  • पाणी – २ कप
  • वेलची पूड – ¼ चमचा
  • थोडी केशर किंवा गुलाबपाणी (ऑप्शनल)

१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा Cheese Garlic Bread, घरातील सगळ्यांचं आवडेल चविष्ट पदार्थ

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम एका जाड बुडाच्या भांड्यात दूध उकळा. उकळल्यावर गॅस मंद करा आणि लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालून हळूहळू दूध फाडा. पाणी आणि पनीर वेगळे झाले की गॅस बंद करा.
  • फाटलेले दूध मलमलच्या कापडात गाळून घ्या. नंतर थंड पाण्याने नीट धुवा म्हणजे लिंबाचा स्वाद निघून जाईल.
  • हा छेना २०-२५ मिनिटांसाठी टांगून ठेवा जेणेकरून त्यातील अतिरिक्त पाणी निघून जाईल.
  • नंतर छेना एका ताटात घेऊन हाताने ८-१० मिनिटे मऊ आणि गुळगुळीत होईपर्यंत मळा. मग त्याचे छोटे छोटे गोळे बनवा.
  • दरम्यान, दुसऱ्या भांड्यात गूळ आणि पाणी घालून उकळा. गूळ पूर्णपणे विरघळला की पाक थोडा घट्ट होऊ द्या. त्यात वेलची पूड घाला.
  • पाक उकळत असताना त्यात तयार केलेले रसगुल्ल्याचे गोळे सावकाश सोडा. झाकण ठेवा आणि मध्यम आचेवर १५ मिनिटे शिजवा.
  • रसगुल्ले फुगले की गॅस बंद करा. थोडं थंड झाल्यावर त्यांना पाकासह फ्रिजमध्ये ठेवा. थंड गुळाचे रसगुल्ले सर्व्ह करा.
  • छेना जास्त कोरडा झाला तर रसगुल्ले कडक होतात. त्यामुळे थोडं ओलसर राहू द्या.
  • गूळाचा पाक जास्त घट्ट नको, नाहीतर रसगुल्ले नीट शिजणार नाहीत.
  • वेलची आणि केशरामुळे चव आणि सुगंध वाढतो.

Web Title: Jaggery rasgulla recipe do you know you can aslo make soft juicy and sweet rasgulla without sugar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • marathi recipe
  • sweet dish
  • tasty food

संबंधित बातम्या

Winter Special : मुळ्याची भाजी खायला आवडत नाही? मग नाश्त्याला बनवा खमंग पराठा; याची चव सर्वांनाच करेल खुश
1

Winter Special : मुळ्याची भाजी खायला आवडत नाही? मग नाश्त्याला बनवा खमंग पराठा; याची चव सर्वांनाच करेल खुश

hummus Recipe : घरीच मार्केटसारखा क्रिमी ‘हमस’ बनवायचा आहे? मग ही सिंपल रेसिपी फाॅलो करा
2

hummus Recipe : घरीच मार्केटसारखा क्रिमी ‘हमस’ बनवायचा आहे? मग ही सिंपल रेसिपी फाॅलो करा

Recipe : काबुली चण्यापासून बनवा पौष्टिक आणि कुरकुरीत फलाफल; एकदा खाल तर पुन्हा बनवाल
3

Recipe : काबुली चण्यापासून बनवा पौष्टिक आणि कुरकुरीत फलाफल; एकदा खाल तर पुन्हा बनवाल

सकाळचा नाश्त्यासाठी बनवा अमीर खानची फेव्हरेट डिश ‘Scarambled Egg’, अभिनेत्याने शेअर केलीये रेसिपी
4

सकाळचा नाश्त्यासाठी बनवा अमीर खानची फेव्हरेट डिश ‘Scarambled Egg’, अभिनेत्याने शेअर केलीये रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.