१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा Cheese Garlic Bread
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चीज खायला खूप जास्त आवडते. चीज खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. घरात पिझ्झा, पास्ता किंवा सँडविच बनवल्यानंतर त्यात चीज टाकले जाते. चीज टाकल्यामुळे पदार्थाची चव वाढते. सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा आणि पराठा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये चीज गार्लिक ब्रेड बनवू शकता. बाजारात चीज गार्लिक ब्रेड हा पदार्थ किमतीने अतिशय महाग असतो. याशिवाय विकत मिळणाऱ्या पदार्थांमध्ये काहीवेळा भेसळ युक्त चीज किंवा इतर पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे कायमच घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. पोटभर नाश्ता केल्यास दुपारच्या वेळी लवकर भूक लागणार नाही आणि शरीराला तात्काळ ऊर्जा मिळेल. चला तर जाणून घेऊया चीज गार्लिक ब्रेड बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)
hummus Recipe : घरीच मार्केटसारखा क्रिमी ‘हमस’ बनवायचा आहे? मग ही सिंपल रेसिपी फाॅलो करा






