Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaslok Hospital: 50 वर्षांनंतर नियतीने पुन्हा आणले समोरासमोर! कधीकाळच्या रुग्ण डॉक्टरांनीच केली डॉ. जोहारींची तपासणी

Jaslok Hospital Mumbai Dr A.C. Johari : मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये ५० वर्षांपूर्वी ज्यांच्यावर सायनसची सर्जरी केली होती, त्याच डॉ. दिव्य प्रभात यांनी आता १०० वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ ENT सर्जन डॉ. ए. सी. जोहारी यांची तपासणी केली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 03, 2026 | 06:43 PM
Jaslok Hospital Mumbai

Jaslok Hospital Mumbai

Follow Us
Follow Us:
  • ज्यांनी उपचार केले तेच आज रुग्ण
  • ५० वर्षांनी घडला अनोखा योगायोग
  • ५० वर्षांनी पुन्हा भेटले डॉक्टर आणि रुग्ण

मुंबई: वैद्यकीय क्षेत्रात विश्वास, परंपरा आणि योगायोगाचे अनेक प्रसंग पाहायला मिळतात, पण जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये नुकतीच घडलेली घटना ही अत्यंत दुर्मीळ आणि भावनिक आहे. १०० वर्षांहून अधिक वय असलेले ज्येष्ठ ईएनटी (नाक, कान, घसा) सर्जन डॉ. ए. सी. जोहारी यांनी नुकतेच स्वतःच्या घशाच्या त्रासावर जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. गेल्या सहा दशकांपासून मुंबईत वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या डॉ. जोहारी यांनी आयुष्यात हजारो रुग्णांचे प्राण वाचवले आणि उपचार केले, परंतु यावेळी ते स्वतः रुग्णाच्या भूमिकेत होते.

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

डॉ. जोहारी यांना घशात सतत जळजळ होणे, काहीतरी अडकल्यासारखे वाटणे आणि अन्न गिळण्यास प्रचंड त्रास होणे यांसारखी लक्षणे जाणवत होती. त्यांचे वय आणि लक्षणे पाहता, घशात काही गंभीर आजार तर नाही ना, याबद्दल चिंता वाटणे स्वाभाविक होते. यासाठी जसलोक हॉस्पिटलच्या ईएनटी ओपीडीमध्ये त्यांची व्हिडिओ लॅरिंन्गोस्कोपी करण्यात आली. तपासणीत घशाच्या भागात लहान पिशवीसारखी रचना दिसून आली, जी एक सामान्य (नॉर्मल) स्थिती असून त्यात कोणत्याही गंभीर किंवा धोकादायक आजाराची चिन्हे आढळली नाहीत. या निष्कर्षांमुळे डॉ. जोहारी आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.

पाच दशकांपूर्वीचा अद्भुत योगायोग

या वैद्यकीय प्रसंगात एक अत्यंत दुर्मिळ योगायोग घडून आला. तब्बल ५० वर्षांपूर्वी (५ दशकांपूर्वी) डॉ. जोहारी यांनी डॉ. दिव्य प्रभात नावाच्या एका लहान मुलीवर सायनसची यशस्वी सर्जरी केली होती. काळाच्या ओघात त्या मुलीने स्वतः ईएनटी सर्जन बनून वैद्यकीय क्षेत्रात नाव कमावले. आज अनेक दशकांनंतर, जेव्हा डॉ. जोहारी रुग्ण म्हणून जसलोक हॉस्पिटलमध्ये (Jaslok Hospital)आले, तेव्हा त्यांच्यावर व्हिडिओ लॅरिंन्गोस्कोपीची तपासणी करणाऱ्या दुसऱ्या कोणी नसून जसलोक हॉस्पिटलच्या ईएनटी सर्जरी कन्सल्टंट डॉ. दिव्य प्रभात याच होत्या.

या भावूक प्रसंगाबद्दल बोलताना जसलोक हॉस्पिटलच्या ईएनटी सर्जरी कन्सल्टंट डॉ. दिव्य प्रभात म्हणाल्या, “डॉ. जोहारी यांच्यासारख्या अनुभवी ईएनटी सर्जनला अशा प्रकारची लक्षणे दिसतात, तेव्हा गंभीर आजाराची चिंता वाटणे स्वाभाविक असते. व्हिडिओ लॅरिंन्गोस्कोपीमुळे तात्काळ स्पष्टता मिळाली आणि स्थिती सामान्य असल्याचे समजताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहणे माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक होते. ज्या डॉक्टरांनी ५० वर्षांपूर्वी माझ्यावर उपचार केले होते, आज त्यांच्या उपचारात मदत करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत भाग्याचा आणि विलक्षण अनुभव आहे.”

आपला अनुभव सांगताना ज्येष्ठ ईएनटी सर्जन डॉ. ए. सी. जोहारी म्हणाले, “माझे संपूर्ण आयुष्य रुग्णांच्या सेवेत घालवल्यानंतर जेव्हा मला स्वतःला ही लक्षणे जाणवू लागली, तेव्हा मलाही नक्की काय घडत आहे हे जाणून घ्यायचे होते. लॅरिंन्गोस्कोपीमुळे कोणताही गंभीर आजार नसल्याची खात्री पटली. मी ५ दशकांपूर्वी ज्यांच्यावर उपचार केले होते, त्याच डॉक्टरांकडून माझी तपासणी होणे हा एक अद्भुत अनुभव होता. वैद्यकीय क्षेत्र आपल्याला अनपेक्षित मार्गाने अशा योगायोगांच्या टप्प्यावर आणून उभे करते.”

वेळेवर तपासणी आणि विश्वासाचे महत्त्व: या दिलासादायक निष्कर्षांनंतर डॉ. जोहारी यांना केवळ औषधोपचारांचा सल्ला देण्यात आला आहे. घशात जळजळ होणे किंवा गिळण्यास त्रास होणे ही लक्षणे नेहमीच गंभीर आजाराची असतात असे नाही, ती सामान्य कारणांमुळेही असू शकतात. त्यामुळे वेळेवर केलेली ईएनटी तपासणी योग्य कारण शोधून रुग्णाला मोठा मानसिक आधार देते, हेच या घटनेतून अधोरेखित होते.

जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे सीईओ श्री. जितेंद्र हरियाण म्हणाले, “आरोग्यसेवा ही विश्वासावर आधारित असते. ज्या डॉक्टरांनी आपले संपूर्ण आयुष्य रुग्णांच्या सेवेत व्यतीत केले, त्यांनी त्याच प्रकारचा विश्वास आमच्या डॉक्टरांवर ठेवणे ही विशेष सन्मानाची बाब आहे. डॉ. जोहारी यांचा प्रवास त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीला एक प्रकारे पूर्णत्व देतो. डॉक्टर म्हणून आपण कितीही अनुभवी असलो, तरी रुग्ण म्हणून उपचारांमधील स्पष्टता, सहानुभूती आणि विश्वास या गोष्टींनाच आपण प्राधान्य देतो, याची आठवण हा प्रसंग करून देतो.”

शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर

Web Title: Jaslok hospital dr ac johari dr divya prabhat 50 years medical coincidence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 06:43 PM

Topics:  

  • Doctors News
  • Jaslok Hospital

संबंधित बातम्या

Crime News: दोन इंजेक्शन्स दिली अन् काही वेळातच चिमुकलीच्या नाक-तोंडातून रक्त; वसईत धक्कादायक घटना
1

Crime News: दोन इंजेक्शन्स दिली अन् काही वेळातच चिमुकलीच्या नाक-तोंडातून रक्त; वसईत धक्कादायक घटना

Pune Crime: पुण्यात बिग बॉस फेम रीलस्टारला अटक; डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, ५ लाखांची मागणी
2

Pune Crime: पुण्यात बिग बॉस फेम रीलस्टारला अटक; डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, ५ लाखांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.