(फोटो सौजन्य: istock)
Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे
आपल्या शरीराला मॅग्नेशियमची नितांत गरज असते. अशात शरीरातील मॅग्नेशियमची कमतरता भरुन काढण्यासाठी तुम्ही आहारात काही हेल्दी पदार्थांचा समावेश करायला हवा. लक्षात घ्या, मॅग्नेशियम आपल्या शरीरात स्नायू आणि मज्जातंतूंच्या योग्य कार्यात, हृदयाच्या आरोग्यात आणि ऊर्जा निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. आजकालची धावपळीची जीवनशैली, अनहेल्दी फूड हॅबिट्स आणि शरीराला आवश्यक पोषक घटक मिळवून देत नाहीत ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात. यावर उपाय औषधे नसून योग्य आहार हा आहे. चला शरीरात मॅग्नेशियमची कमतरता भरुन काढण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो ते जाणून घेऊया.
हिरव्या भाज्या
पालक, मेथी, शेपू अशा हिरव्या भाज्या शरीरात मॅग्नेशियमची पातळी वाढवण्यास मदत करतात. यात ‘क्लोरोफिल’ देखील आढळते जे शरीराला आतून स्वच्छ करण्यास म्हणजेच शरीरातील घाण बाहेर काढण्यास मदत करते. या भाज्यांचे सेवन शरीरात फक्त पोषकतत्वांचे प्रमाण वाढवत नाही तर पचनाच्या समस्याही दूर करण्यास मदत करते.
केळी
केळी हे फळ एक असे फळ आहे जे तुम्हाला वर्षाच्या ३६५ दिवस बाजारात उपलब्ध मिळेल. केळी खाण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात आणि यातीलच एक म्हणजे मॅग्नेशियमची कमतरता भरुन काढणे. यामध्ये पोटॅशियमचेही भरपूर प्रमाण आढळते. आपल्याला स्नायूंना बळकटी मिळवून देण्यासाठी आणि शरीरात उर्जा वाढवण्यासाठी केळीचे सेवन केले जाऊ शकते.
सुकामेवा आणि बिया
बदाम, काजू, अक्रोड आणि यासोबतच भोपळ्याच्या आणि सूर्यफूलाच्या बिया शरीरात मॅग्नेशियमची कमतरता भरुन काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यामुळे शरीरातील हेल्दी फॅट्स, प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण तसेच हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. तुम्ही रोज एक मूठभर सुकामेवा आणि बियांचे सेवन करु शकता. याचे सेवन शरीरातील थकवा दूर करण्यात चांगलेच फायदेशीर ठरेल.






