करिना कपूरचा क्लासी लुक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
करिना कपूर ही एक फॅशन आयकॉन आहे आणि यामध्ये कोणाचंही दुमत नसणार. अनेक जणांना करिना आवडते तर ती काही जणांना ओव्हररेटेड वाटते. पण करिनाचा अभिनय आणि फॅशन या दोन्हीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. करिना नेहमीच क्लासी आणि बोल्ड फॅशन करताना दिसते. वयाच्या ४५ व्या वर्षीही करिनाचा जलवा कायम आहे आणि तिच्या चेहऱ्यावरील नूरही कमालीचा आहे. आजही तिच्या चाहत्यांमध्ये वाढ होताना दिसतेय.
करिनाने नुकतेच एका कार्यक्रमासाठी फोटोशूट केले असून तिने अॅनिमल प्रिंट साडी नेसली आहे आणि तिची ही फॅशन आणि लुक चाहत्यांच्या हृदयाचा वेध घेत आहे. करिनाचा हा लुक चाहत्यांना खूपच आवडला असून कमेंट्सचादेखील अक्षरशः वर्षाव झालेला दिसून येत आहे. करिनाच्या या अॅनिमल प्रिंट साडीचा लुक आपण डिकोड करूया
बेगम करिनाच्या साडीचे वैशिष्ट्य
करिनाची साडी नक्की कोणती आहे
सैफ अली खानची बेगम करिना टायगर प्रिंट साडीत बोल्डनेस आणि क्लासिक पॅटर्नमध्ये दिसतेय, जो लुक एक फॅन्सी आणि एलिगंट स्टाईल देत आहे. फ्लोइंग दुपट्टा आणि पदराच्या स्टाईलमध्ये या साडीचा लुक अधिक बोल्ड करण्यात आलाय. करिनाच्या डोळ्यांसह ही साडी इतकी परफेक्ट दिसतेय की एखाद्या वाघिणीसारखीच भासतेय.
डीपनेक ब्लाऊज
डीपनेक ब्लाऊज फॅशन
बेबोने या साडीसह अॅनिमल प्रिंट डीप-नेक ब्लाउज परिधान केलाय आणि याशिवाय तिने डीप बिकिनी ब्लाउजसह लांब जॅकेट जोडले आहे. जे दिसायला अत्यंत रॉयल दिसत आहे आणि ज्यामुळे एक फ्लोइंग लुक निर्माण झाला आहे. करिनाची ही साडी प्रसिद्ध डिझाईनर सब्यसाचीने डिझाइन केली आहे, तर स्टायलिंग अनिल कपूरची मुलगी रिहा कपूरने केले आहे.
भव्यदिव्य कुंदन आणि पाचूचे दागिने
पाचू, मोती आणि कुंदनजडीत दागिने
या लुकमध्ये करीनाने जड आणि भव्य दागिन्यांचा वापर केला. पाचू, कुंदन आणि मोत्याचे सुंदर मिश्रण असलेल्या या बहुस्तरीय नेकपीसने तिच्या लुकला एक शाही टच दिला. यासह मॅचिंग कानातले आणि अंगठ्यांनी तिचा लुक पूर्ण केलाय. या साडीला परफेक्ट मॅच होणारे दागिने करिनाने परिधान केले असून रेड कार्पेटला साजेसा लुक दिसून येत आहे.
हेअर स्टाईल
हेअर स्टाईलसह ग्लॅम लुक
करिनाने यासह साधी आणि सरळ हेअरस्टाईल ठेवली असून केस मोकळे सोडले आहेत आणि तिच्या काळ्याभोर केसांमध्ये चाहते स्वतःला विसरले आहेत. करिनाने यासह वेगवेगळ्या अदांमध्ये फोटोशूट केले असून तिचा हा लुक इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय
ग्लॉसी मेकअप
करिनाचा ग्लॉसी आणि क्लासी लुक
करिनाने या साडीसह अत्यंत क्लासी आणि ग्लॉसी असा मेकअप केलाय. संपूर्णतः ब्राऊन शेडमध्ये हा लुक क्रिएट करण्यात आलाय. करिनाने फाऊंडेशन, डार्क ब्राऊन आयशॅडो, लायनर, गडद काजळ, डार्क हायलायटर आणि डार्क ब्राऊन शेड लिपस्टिक लावत लुक पूर्ण केलाय. अॅनिमल प्रिंट साडीसह हा लुक परफेक्ट मॅच होत असून कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात वा ऑफिस पार्टीसाठी तुम्ही करिनासारखा लुक करू शकता. तुमच्या अंतर्मनातील ‘पू’ नक्कीच तुम्ही क्रिएट करू शकता.