Kareena Kapoor: करिना कपूर कधीही आपल्या चाहत्यांना नाराज करत नाही आणि हे तिने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. डिझाईनर अनामिका खन्नाद्वारे डिझाईन करण्यात आलेल्या कस्टम कपड्यात आणि Bvlgari दागिन्यांमध्ये सजून सौंदर्याची व्याख्या पुन्हा एकदा करिनाने रेखाटली असल्याचे दिसतंय. कोण म्हणतं 40 व्या वर्षानंतर महिला सुंदर दिसत नाहीत? करिनाने वयालाच एकप्रकारे मागे टाकलं असल्याचं दिसून येत आहे. करिनाची ही स्टाईल कमालीची क्लासी असून तिचा हा लुक आपण डिकोड करूया (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
करिना कपूर आणि फॅशन स्टाईल हे उत्तम समीकरण आहे. नुकतेच दुबईतील एका कार्यक्रमासाठी तिने केलेला लुक व्हायरल होतोय. अनामिका खन्नाने डिझाईन केलेला आणि रिहा कपूरने स्टाईल केलेला हा ड्रेस करिनावर कमालीचा आकर्षक दिसतोय
पिंक ब्लश फिगर फिटेड ऑफशोल्डर ड्रेस करिनाने घातला असून त्यासह क्लास आणि ग्रेस दाखवणारे कलरफुल असे गोल्डन एम्ब्रोयडेड फ्लोरल असे जमिनीपर्यंत घोळ असणारे असे जॅकेट तिने स्वतःभोवती लपेटले आहे आणि ज्यात ती एखाद्या रॉयल राजकुमारीसारखी दिसतेय
या पिंक ब्लश ड्रेससह करिनाने हेअरस्टाईल करताना जास्त त्रास घेतलेला नाही. तिने स्टायलिश बन अर्थात अंबाडा बांधत यावर स्टाईल केली आहे आणि ती अत्यंत सुंदर आणि रॉयल दिसत आहे
करिनाच्या या लुकवर सेलिब्रिटीही फिदा झाले आहेत, तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव करत तिच्या लुकचे आणि सौंदर्याचे भरभरून कौतुक केल्याचे दिसून येत आहे आणि करिनाने नेहमीप्रमाणे फॅशनमध्ये सर्वांचे मन जिंकले आहे
करिनाने गळ्यात Bvlgari कट वर्क डायमंड्सचा नेकलेस घातला असून यासह मॅचिंग असणारे कानातले घातले आहेत आणि या क्लासी हिऱ्यांच्या दागिन्यांनी तिच्या सौंदर्यात भर घातली असल्याचे दिसून येत आहे
या पिंक ब्लश ड्रेससह करिनाने पिंक ह्यू स्मोकी आईज, डार्क आयब्रो, शिमरी बॉडी, हायलायटर, काजळ आणि ओठांवर ग्लॉसी पिंक लिपस्टिकचा वापर करून आपल्या स्टाईलमध्ये भर टाकली आहे आणि सौंदर्याला चारचाँद लावले आहेत