फोटो सौजन्य सोशल मिडिया
जर तुमच्या कचऱ्याच्या डब्यातून घाण वास येत असेल तर या साठी बेकिंग सोडा वापरणे नेहमी उत्तम, बेकिंग सोडा तुमच्या कचऱ्याच्या डब्यातिल दुर्गंधी शोषून घेतो. कचऱ्याचे डस्टबिन साफ केल्यानंतर आणि त्यात नवीन कचऱ्याची पिशवी टाकण्या आधी डब्याच्या तळाशी 1ते 2 चमचा बेकिंग सोडा टाका तो डब्याखाली पसरवून टाका. तुम्ही कचऱ्याच्या पिशवीच्या आत मध्ये थोडा बेकिंग सोडा टाकू शकता. यामुळे ओल्या कचऱ्यामुळे येणारा वास लगेच कमी होतो.
कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
जर तुमच्या घरात बेकिंग सोडा नसेल, तर तुम्ही या पर्यायी म्हणून कडु लिंबाची साल किंवा कडुनिंबाची पाने वापरू शकता. तुमच्या किंचन मधल्या डस्टबिनच्या तळाशी लिंबाची सुकलेली सालं किंवा कडुनिंबाची पाने टाका.कडु लिंबाच्या सालाने किंवा कडुनिंबाच्या पानाने कचऱ्याच्या डब्यातिल जंतू मरतील या मुळे तुमच्या किंचन मधल्या डस्टबिनला दुर्गंधी येणार नाही.
वर्तमानपत्राचा वापर – आपल्या घरात वर्तमान पत्र हमखास उपलब्ध असते, वर्तमानपत्राचा वापरतुम्ही करू शकता. कचऱ्याची पिशवी डब्यात घालण्यापूर्वी डब्याच्या तळाशी वर्तमानपत्राचा कागद ठेवा. हा कागद ओल्या कचऱ्यातून निघणारे पाणी शोषून घेईल ज्यामुळे डस्टबिनला वास येणार नाही.
घरातील पाळीव प्राणी आणि कॅट लिटरचा वापर – जर तुमच्या घरात पाळीव प्राणी असेल आणि कॅट लिटर उपलब्ध असेल, तर ते डब्याच्या तळाशी टाका. ते ओलावा आणि दुर्गंधी दोन्ही उत्तम प्रकारे शोषून घेते.अॅपल सायडर व्हिनेगर आठवड्यातून एकदा डबा धुताना पाण्यात थोडे व्हिनेगर टाकून स्वच्छ करा. यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात.
आपल्या किंचनमधला ओला कचरा आणि सुका कचरा नेहमी वेगळा ठेवा, डस्टबिनला घट्ट झाकण असेल याची खात्री करुन घ्या, कचऱ्याचा डबा आठवड्यातून साबणाने आणि गरम पाण्याने साफ धुवून घ्या, आम्ही सांगितलेल्या टिप्स फाॅलो करा.आपल्या घरातील कचऱ्याचा वास येऊ नये या साठी या वरील घरगुती टिप्सचा वापर करा.






