सूर्यकुमार यादव मुंबईचा कर्णधार (फोटो- सोशल मिडिया)
या स्पर्धेच्या निमित्त सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. दुखापती आणि त्यामुळे विश्रांती घेणाऱ्या सूर्यकुमार यादवला आता नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव 2026 मध्ये आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसला आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे.
Syed Mushtaq Ali Trophy : महाराष्ट्राचा संघ जाहीर; गायकवाड-पृथ्वी शॉवर असणार अनेकांच्या नजरा
या स्पर्धेत मुंबईचा संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणार आहे. टी 20 फॉर्मटमध्ये सूर्यकुमार यादवचा फॉर्म हा शानदार असल्याचे पाहायला मिळते. त्याच्या अनुभवाचा फायदा मुंबईच्या युवा खेळाडूंना निश्चितच होणार आहे. भारतीय संघाला आपल्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक २०२६ चे विजेतेपद मिळवून देणारा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव आता पुन्हा एकदा मैदानावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. आता तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६’ साठी मुंबई संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे.
मुंबईच्या संघात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळणारे भारताचे अनेक खेळाडूंचा सहभाग करण्यात आला आहे. मुंबई आपला पहिला सामना हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. शिवम् दुबे, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सरफराज खान, अंगकृष रघुवंशी, हार्दिक तामोरे आणि मॅक्सवेल स्वामीनाथन या खेळाडूंचा सहभाग मुंबईच्या संघात करण्यात आला आहे. चालू हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई संघाचे नेतृत्व करणाऱ्या सिद्धेश लाडला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. मुंबईचा संघ यंदाच्या स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. आगामी १४ नोव्हेंबर रोजी हैदराबादविरुद्ध मुंबईचा संघ आपला पहिला सामना खेळणार आहे.
IND Vs NZ: गिलची सेना किवींना ‘किल’ करण्यासाठी सज्ज! सिरीज जिंकण्याची संधी तर, Playing 11 मध्ये…
मुंबईचा संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अंगकृष रघुवंशी, दिव्यांश सक्सेना, सुवेद पारकर, मुशीर खान, सरफराज खान, शिवम दुबे, अथर्व अंकोलेकर, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, मॅक्सवेल स्वामीनाथन, मोहित अवस्थी, हार्दिक तामोरे, सिल्वेस्टर डिसूझा
Ans: सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीत मुंबई आपला पहिला सामना हैदराबादविरुद्ध खेळणार आहे.
Ans: सूर्यकुमार यादवला मुंबईच्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.






