Wheat roti Benefits: आजकाल प्रत्येकाचे जीवन हे धावपळीचे बनले आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण कामच करत असतो. आपल्या कामाच्या वेळा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे बऱ्याचदा आपले जेवण वेळेत होत नाही. त्यामुळे कमी वयातच अनेकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. अनेकांना हृदयरोग आणि मधुमेहाचा त्रास झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे धावपळीच्या जीवनात पौष्टीक आणि सकस आहार असणे आवशयक आहे. वरण-भातासोबत पोळी भाजीचा देखील समावेश असणे आवश्यक आहे.
आपण रोजी पोळी भाजी खातो. बहुतांश घरांमध्ये गव्हाच्या पिठाची पोळी खाल्ली जाते. पोळी खाणे सर्वानांच आवडते. काही जण भाकरी किंवा अन्य पदार्थांचे सेवन करतात. आज आपण गव्हाची पोळी खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. चला तर मग आपल्या शरीराला गव्हाच्या पोळीचे काय-काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात.
साधारणतः आपल्या रोजच्या जेवणात पोळी भाजी, वरण भाताचा समावेश असतो. ताटात असणारी पोळी ही गव्हाची असते. यामध्ये भरपूर पोषण असते. गव्हाची पोळीचे सेवन केल्यास आपण आपल्या शरीराला गंभीर आजारांपासून बचाव करते, तसेच गव्हाच्या पोळीतून आपल्याला ऊर्जा देखील मिळते, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने सांगितलेले पोळीचे फायदे आपण जाणून घेऊयात.
अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने सांगितल्यानुसार, पोळी खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यातील ग्लायसेमिक इंडेक्स भातापेक्षा कमी असतो. पोळी खाल्ल्याने ब्लड शुगर हळू-हळू वाढते, ज्यामुळे डायबिटीज असणाऱ्या रूग्णांना ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
काय आहेत गव्हाच्या पोळीचे फायदे?
१. हृदयाच्या आरोग्यासाठी गव्हाची पोळी खाणे फायदेशीर असते. पोळी कमी तेल किंवा तुपावर भाजली तर ती अधिक फायदेशीर ठरते. यामुळे हृदयाशी संबंधित आजाराचा धोका निर्माण होत नाही असे म्हटले जात आहे.
२. गव्हाच्या पोळीचे सेवन करणे हे आपल्या शरीराच्या पचनसंस्थेसाठी फायदेशीर असते. पोळीत फायबर असल्याने पचन चांगले होते. तसेच कफापासून देखील आराम मिळतो, असे म्हणतात. यामुळे पोट खूप वेळ भरल्यासारखे वाटते.
Health Tips: पावसाळ्यात दुधाच्या चहाऐवजी ट्राय करा Pudina Tea; आरोग्याला मिळतील ‘हे’ चमत्कारिक फायदे
दुधाच्या चहाऐवजी ट्राय करा Pudina Tea
आरोग्य तज्ज्ञ डॉ. सतीश गुप्ता यांनी पुदिन्याचा चहाचे सेवन याबाबत माहिती सांगितली आहे. पावसाळ्याच्या काळात पुदिन्याचा चहा प्यायल्याने आपण अनेक अनेक आजारांपासून आपला बचाव करू शकतो. डॉ. सतीश गुप्ता यांनी पुदिन्याचा चहा प्यायल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेऊयात.
पुदिन्याचा चहाचे फायदे
प्रतिकारक शक्ती: डॉ. सतीश गुप्ता यांच्या माहितीनुसार, पावसाळयात पुदिन्याचा चहा प्यायल्याने आपली प्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. पुदिन्यामध्ये अँटीऑक्साइड्स आणि व्हिटॅमिन सी असते. यामुळे सर्दी-खोकला या आजारांपासून आपल्या शरीराचा बचाव करण्यास मदत करते . त्यामुळे पुदिन्याचा चहा पिणे फायदेशीर ठरते.