Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करू शकते ‘जवस’ जाणून घ्या कशा प्रकारे

  • By Rashmi Dongre
Updated On: Nov 25, 2022 | 02:29 PM
रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करू शकते ‘जवस’ जाणून घ्या कशा प्रकारे
Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांच्या खाण्याच्या सवयी बिघडत आहेत आणि यामुळे लोक सतत नवीन आजारांना बळी पडत आहेत. सतत खाण्या-पिण्याशी संबंधित चुका करत राहिल्याने उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आणि हृदयविकाराचा धोका वाढतो, तसेच शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढते.

त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. तथापि आपल्या आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देऊन शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण रोखले जाऊ शकते. तुम्ही ताबडतोब तुमची जीवनशैली बदलली पाहिजे. यासाठी आज आपण जवस तुमच्या रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कसे कमी करू शकते, हे जाणून घेणार आहोत.

  • जवसाचा शरीरावर होतेय चांगला प्रभाव
पेरिफेरल आर्टरी डिसीज असलेल्या लोकांमध्ये फ्लेक्ससीड्स म्हणजेच जवसाच्या बिया खराब कोलेस्टेरॉल कमी करतात आणि कोलेस्ट्रॉल-कमी करणार्‍या औषधांसोबत एकत्रित केल्यावर शरीरातील कोलेस्टेरॉलवर परिणाम न होता अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता त्यांच्यात असते. इतकंच नाही तर तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी जवसाच्या बिया खूप चांगल्या आहेत यात शंका नाही. जवसामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाचे अनेक आजार दूर होतात. या कारणास्तव फ्लॅक्ससीड म्हणजे जवस हे पृथ्वीवर आढळणारे सर्वात पौष्टिक अन्न आहे असे म्हटले जाते.
  • जवस ‘असे’ लढते कोलेस्टेरॉलशी
प्राचीन काळापासून लोक आपल्या आहारात जवसाचा वापर करत आहेत. जवस सोबत त्याचे तेल देखील वापरले जाते. ग्रीक, रोमन, इजिप्शियन, चिनी आणि भारतीय संस्कृतींमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. जवसामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फॅटी ॲसिड, विरघळणारे फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. हे सर्व पोषक खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
कोलेस्टेरॉलच्या आजारावर जवस हे जादुई औषध आहे. जवस अल्फा-लिनोलेनिक ऍसिड (एएलए) ने समृद्ध असतात, ज्यामुळे रक्त प्रवाह सुधारतो आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. यासोबतच ते इकोसापेंटायनोइक ॲसिड (ईपीए) आणि डोकोसाहेक्साएनोइक ॲसिड (डीएचए) ने समृद्ध आहे. हे तिन्ही ऍसिड खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ओळखले जातात. म्हणूनच कोलेस्टेरॉलच्या आजारावर जवस हे जादुई औषध आहे.
  • जवस रोज किती खावे ?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रोजच्या आहारात एक-दोन चमचे जवसाचा वापर केला पाहिजे. पण जवस कधीही कच्चे खाऊ नका, नेहमी आधी भाजून घ्या आणि नंतर खा. त्याचे फायदे मिळविण्यासाठी, ते योग्य स्वरूपात, योग्य प्रमाणात खाणे आवश्यक आहे. तुम्ही ते आणखी अनेक ड्रायफ्रूट्स आणि संपूर्ण बियांसोबत भाजून खाऊ शकता.
जवसाच्या बिया भाजून, बारीक करून, स्मूदी, हलवा, लापशी, लाडू आणि दह्यामध्ये मिसळूनही खाता येतात. जवसाची पावडर बनवून ती तिन्ही वेळच्या जेवणासोबत 1-2 चमचेही घेऊ शकता.

Web Title: Know how javas can reduce bad cholesterol in the blood nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2022 | 02:29 PM

Topics:  

  • Cholesterol news
  • Health Tips
  • Health Tips news

संबंधित बातम्या

चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्याला ठरते घातक, पचन बिघडण्यापासून त्वचा खराबहोईपर्यंत अनेक आजरांना देते खुले आमंत्रण
1

चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्याला ठरते घातक, पचन बिघडण्यापासून त्वचा खराबहोईपर्यंत अनेक आजरांना देते खुले आमंत्रण

वय वर्ष 27, 3 वेळा आई होता होता झाले Miscarriage,1 टेस्ट आणि समोर आलं कारण बसला धक्का…
2

वय वर्ष 27, 3 वेळा आई होता होता झाले Miscarriage,1 टेस्ट आणि समोर आलं कारण बसला धक्का…

अरे देवा! पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो ‘हा’ आजार, AIIMS च्या डॉक्टरांनी दिला सल्ला; ‘खाण्यापूर्वी करा एकदा…’
3

अरे देवा! पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो ‘हा’ आजार, AIIMS च्या डॉक्टरांनी दिला सल्ला; ‘खाण्यापूर्वी करा एकदा…’

भारतात वाढत चाललाय कलरफूल आहाराचा ट्रेंड; वेगवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांमुळे शरीराला मिळतात अनेक फायदे
4

भारतात वाढत चाललाय कलरफूल आहाराचा ट्रेंड; वेगवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांमुळे शरीराला मिळतात अनेक फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.