पायावरील काळेपणा घालवण्यासाठी अशा पद्धतीने करा बेकिंग सोड्याचा वापर
पावसाळ्यासह इतर सर्वच दिवसांमध्ये जशी चेहऱ्याची काळजी घेतली जाते, तशीच काळजी पायांच्या त्वचेचीसुद्धा घेतली पाहिजे. सर्वच ऋतूंमध्ये वातावरणातील बदलांमुळे त्वचा काळी आणि टॅन होऊन जाते. टॅन झालेल्या त्वचेचा रंग सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण पायांच्या त्वचेचे लक्ष दिले जात नाही. पायांच्या त्वचेकडे लक्ष न दिल्यामुळे काही दिवसांनंतर पायांची त्वचा हळूहळू खराब होण्यास सुरुवात होते. पायांचे टॅनिंग घालवण्यासाठी अनेक महिला पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. या ट्रीटमेंट केल्यामुळे काही दिवसांसाठी त्वचा उजळलेली दिसते, मात्र काही दिवस झाल्यानंतर पुन्हा एकदा पायांची त्वचा होती तशीच होऊन जाते.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चिखल आणि मातीमुळे चेहरा काळवंडून जातो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नख सुद्धा मोठ्या प्रमाणावर खराब होतात. नखांमध्ये घाण किंवा कचरा साचून राहिल्यानंतर हळूहळू पायांची नख तुटून खराब होतात. तसेच नखांच्या आजूबाजूची त्वचा जाड आणि काळी होते. काळवंडलेले पाय घेऊन बाहेर गेल्यानंतर अनेकदा लाजिरवण्यासारखे वाटते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बेकिंग सोड्याचा वापर करून पायांवरील काळेपणा कसा घालवायचा, याची पद्धत सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: हेवी मेकअप करायला आवडत नाही? मग ‘हे’ प्रॉडक्ट वापरून रक्षाबंधनला करा नो मेकअप लुक
हे देखील वाचा: पायाच्या नखांमध्ये दुखतंय का? या उपायांनी बरं वाटेल