रक्षाबंधनला करा नो मेकअप लुक
रक्षाबंधन सणाची सर्वच बहिणींना मोठी उत्सुकता असते. या दिवशी बहीण भावाच्या हातामध्ये राखी बांधते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी देतो. सणाच्या दिवशी सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. नवीन कपडे घालून सगळीकडे रक्षाबंधन साजरा केले जाते. सर्वच मुलींना सणाच्या दिवशी नवीन कपडे घालायला खूप आवडतात. नवीन कपडे घालत्यानंतर मुली मेकअप करून छान तयार होतात. पण काहींना जास्त मेकअप करायला आवडत नाही. तसेच मेकअप केल्यानंतर त्वचेचेसुद्धा नुकसान होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी कमीत कमी प्रॉडक्ट वापरून नो मेकअप लुक कसा तयार करायचा, याबद्दल सांगणार आहोत. मेकअप नो मेकअप लुक हल्ली सगळीकडे ट्रेंडिंगला आहे.(फोटो सौजन्य-istock)
मेकअप करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहऱ्यावर असलेली घाण किंवा धूळ निघून जाण्यास मदत होईल. चेहऱ्यावर फेसवॉश वापरून स्वच्छ धुतल्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्या. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर असलेले तेलकट आणि चिकटपणा निघून जाण्यास मदत होईल. त्यानंतर चेहरा कोरडा पडू नये म्हणून मॉइश्चरायझर लावा. यामुळे चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी होऊन मेकअप जास्त वेळ टिकून राहील.
हे देखील वाचा: रक्षाबंधनला दिसायचंय अधिक सुंदर? मग नक्की स्टाईल करून पहा ‘हे’ अनारकली ड्रेस
मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर सनस्क्रीन लावावे. कारण सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून नियमित सनस्क्रीन लावावे जाते. सर्वच ऋतूंमध्ये चेहऱ्यावर सनस्क्रीन लावले पाहिजे. यामुळे चेहऱ्यावरील मेकअप टिकून राहतो. मेकअप करताना फ़ाऊंडेशन लावण्याऐवजी बीबी किंवा सीसी क्रीम लावावी. बीबी क्रीम लावताना ती जास्त लावू नये. त्यानंतर त्याच्यावर ब्लश आणि हायलाइटल लावावे. ब्लश आणि हायलाइटल लावताना जास्त प्रमाणात लावू नये. यामुळे जास्त मेकअप केल्यासारखा लुक दिसेल.
सगळ्यात शेवटी तुमचा लुक पूर्ण करण्यासाठी लिपस्टिक लावावी. लिपस्टिक लावल्यामुळे मेकअप पूर्ण होतो. तसेच चेहरा सुद्धा अधिक उठावदार आणि सुंदर दिसतो. तुम्हाला जर लिपस्टिक लावायला आवडत नसेल तर तुम्ही लिप बाम किंवा लिप लायनर लावू शकते. अशापद्धतीने मेकअप केल्यास तुमचा लुक सुंदर दिसेल.