Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किचनमध्ये लपला आहे धोका! दारुपेक्षा अधिक घातक आहेत स्वपयंपाकघरातील हे पदार्थ; डॉक्टरांनी दिला इशारा

Food Guide : बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहार सवयींमुळे हृदयविकार, फॅटी लिव्हर आणि मधुमेहासारख्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अनेकदा आपण जे पदार्थ हेल्दी समजून खातो, तेच प्रत्यक्षात शरीरासाठी घातक ठरू शकतात

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 21, 2026 | 08:15 PM
किचनमध्ये लपला आहे धोका! दारुपेक्षा अधिक घातक आहेत स्वपयंपाकघरातील हे पदार्थ; डॉक्टरांनी दिला इशारा

किचनमध्ये लपला आहे धोका! दारुपेक्षा अधिक घातक आहेत स्वपयंपाकघरातील हे पदार्थ; डॉक्टरांनी दिला इशारा

Follow Us
Follow Us:
  • आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो.
  • बऱ्याचदा सामान्य वाटणाऱ्या गोष्टी शरीराला हानी पोहचवत असतात.
  • वेळीच योग्य आहाराविषयी जागृत होऊन आजारांना दूर ठेवू शकता.
आजकाल बदलत्या जीवनशैलीमुेळे शरीरावर वाईट परिणाम होत आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनात लोक चुकीच्या जीवनशैलीचा अवलंब करु लागले आहेत, ज्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असल्याचे दिसून येते. मागील काही काळापासून आजारांचे प्रमाण वाढत असून लोकांचे आयुर्मानही आता हळूहळू कमी होऊ लागले आहे. हे सर्वच परिणाम पाहता अनेकजण हेल्दी लाईफस्टाईलकडे अधिक वळत असले तरी काही घटकांविषयी अजूनही लोकांना योग्य माहिती नाही.

नो ऑइल, फुल टेस्ट! विना तेल काही मिनिटांतच पापड आणि कुरकुरीत स्नॅक्सची मजा घ्या, शेफ पंकजने शेअर केली सोपी ट्रिक

अनेकदा आपण ज्या गोष्टी हेल्दी समजून खातो त्या हेल्दी असतातच असं नाही. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की, मद्यपानाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही पण तुम्हाला माहिती आहे का? याहून अधिक घातक पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात दडलेले आहेत. हे पदार्थ रोजच्या आहारात खाल्ले जातात पण अनेकांना यांचे परिणाम ठाऊक नाहीत. आपल्याला सामान्य वाटणारे हे पदार्थ हळूहळू आपल्या शरीरात समस्येला निर्माण करत असतात ज्यामुळे पुढे जाऊन अनेक आजारांचा सामना करावा लागतो. चला हे कोणते पदार्थ आहेत ते जाणून घेऊया.

साखर

चहापासून काॅफी आणि प्रत्येक गोड पदार्थामध्ये साखरेचा आवर्जून वापर केला जातो. परंतु याचे अतिरिक्त सेवन आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. डाॅक्टरांनी याला सायलंट किलर म्हटले आहे. साखर शरीरात सहज विरघळते आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढवते. ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका आणि फॅटी लिव्हरचा धोका देखील वाढतो. अनेकांच्या आहारात साखरेचे दररोज सेवन केले जाते अशात तुम्ही आजपासूनच याचे सेवन कमी करायला हवे.

फक्त साखरंच नाही तर रोजच्या वापरात समाविष्ट होणारे असे अनेक पदार्थ आहेत ज्याच कोणतेही पौष्टिक मूल्य नसते आणि ते फक्त साखरेने भरलेले असतात. तुम्ही आजपासूनच यांचे सेवन कमी करायला हवे अन्यथा तुमच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

टोमॅटो सॉस

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच टोमॅटो साॅसचे सेवन आवडते. भजी, पिझ्झा, बर्गर, पराठा यासोबत याचे सेवन केले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? टोमॅटो साॅसमध्ये साखरेचा मोठा अंश आढळला जातो. अनेक सॉसवर “साखर नाही” असे लेबल लावले जाते, पण हे एक घोटाळा आहे. सर्व सॉसमध्ये साखर जास्त असते. जर तुम्ही एक चमचा सॉस खाल्ले तर समजून जा की, तुम्ही तुमच्या शरीराला एक चमचे साखर देत आहात.

सॉफ्ट ड्रिंक्स

आवडीने पिले जाणारे सॉफ्ट ड्रिंक्स देखील आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहचवत असतात. यात साखरेचे प्रमाण सर्वाधिक असते. लक्षात घ्या, कोणतेच साॅफ्ट ड्रिंक हे साखरमुक्त नसते, त्या सर्वांमध्ये साखर मुबलक प्रमाणात मिसळली जाते, ज्यामुळे इन्सुलिन वाढते. याचा आपल्या हृदयावर परिणाम होतो. यामध्ये फळांचे रस देखील समाविष्ट आहेत, जेव्हा तुम्ही फळे खाता तेव्हा तुम्हाला सर्व पोषण मिळते. परंतु जर तुम्ही त्यांच्यापासून रस बनवला तर ते तितकेसे आरोग्यदायी नसतात. जसे आजकाल बाजारात फळांचे रस उपलब्ध आहेत आणि लोक त्यांना निरोगी समजून ते पितात. फ्रुक्टोजने समृद्ध असलेले हे फळांचे रस फॅटी लिव्हरची समस्या वाढवतात.

अचानक उभं राहताच चक्कर येते? ‘ऑर्थोस्टेटिक हायपोटेन्शन’चा असू शकतो इशारा

ग्रीक योगर्ट

जर तुम्ही सामान्य दही खात असाल तर त्याचा तुमच्या शरीराला फायदा होईल पण जर तुम्ही बाजारातील फ्लेवर्ड दही खात असाल तर सावधान होण्याची गरज आहे. यात साखरेचे प्रमाण अधिक असते जे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवत आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These foods are more dangerous than alcohol lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Food Poison
  • Health Tips
  • Healthy life
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Monsoon Hacks: पावसाळ्यात कपड्यांमधून येतोय कुबट वास? फक्त ५ रुपयांच्या उपायाने मिळेल फ्रेश सुगंध
1

Monsoon Hacks: पावसाळ्यात कपड्यांमधून येतोय कुबट वास? फक्त ५ रुपयांच्या उपायाने मिळेल फ्रेश सुगंध

ॲलर्जी की इन्फेक्शन? शिंक, खोकला आणि नाक बंद होणं यात फरक कसा ओळखायचा, जाणून घ्या तज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
2

ॲलर्जी की इन्फेक्शन? शिंक, खोकला आणि नाक बंद होणं यात फरक कसा ओळखायचा, जाणून घ्या तज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

पावसाळ्यात नकळत करता का या 5 चुका? पायांपासून वाढू शकतो संसर्गाचा धोका; वेळीच व्हा सावध
3

पावसाळ्यात नकळत करता का या 5 चुका? पायांपासून वाढू शकतो संसर्गाचा धोका; वेळीच व्हा सावध

Mosoon Tips : कीटकांपासून नैसर्गिक संरक्षण हवंय? पावसाळ्यात घरात लावा हे 4 इंडोर प्लांट्स; डास-माश्यांचा त्रास होईल छुमंतर
4

Mosoon Tips : कीटकांपासून नैसर्गिक संरक्षण हवंय? पावसाळ्यात घरात लावा हे 4 इंडोर प्लांट्स; डास-माश्यांचा त्रास होईल छुमंतर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.