Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवघ्या 10 रुपयांत चमकवा वर्षानुवर्षे जुनी तांब्याची भांडी, चिवट डाग होतील क्षणार्धात दूर

तांब्याच्या भांड्यांना हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. पूजेवेळीदेखील तांब्याच्या भांड्यांचा वापर केला जातो. आरोग्यासाठीही तांब्याचा वापर फायदेशीर मानला जातो. मात्र अनेकजण संसमारंभाच्या वेळी किंवा कोणत्या खास क्षणी तांब्याच्या भांड्यांचा वापर करतात. इतर वेळी यांचा वापर न केल्याने यावरील घाण वाढू लागते आणि नंतर ही घाण सहजासहज दूर होत नाही. अशात तुम्ही काही घरगुती पदार्थांचा वापर करून यांवरील चिवट डाग आणि काळा थर अगदी सहज दूर करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 16, 2024 | 06:00 AM
अवघ्या 10 रुपयांत चमकवा वर्षानुवर्षे जुनी तांब्याची भांडी, चिवट डाग होतील क्षणार्धात दूर

अवघ्या 10 रुपयांत चमकवा वर्षानुवर्षे जुनी तांब्याची भांडी, चिवट डाग होतील क्षणार्धात दूर

Follow Us
Close
Follow Us:

कोणत्याही सणसमारंभात आपल्याला तांब्याच्या भांड्यांची गरज भासत असते. आजकाल अनेकजण आपल्या घरात तांब्याच्या भांड्यांचा वापर करत असतात. अनेक रेसिपीच्या व्हिडिओजमध्येही तांब्याच्या भांड्यांचा प्रामुख्याने वापर केलेला दिसून येतो. धार्मिक मान्यतेनुसार, तांब्यांच्या भांड्यांना विशेष महत्त्व आहे. पूजेतदेखील तांब्याची भांडी वापरली जातात. तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

मात्र तांब्याची भांडी वापरणे तितके सोपे आणि यांना नियमित स्वछ न केल्याने यांवर घाण, चिवट काळे डाग पडू लागतात. अनेकजण आपल्या रोजच्या वापरात तांब्याच्या भांड्यांचा वापर करत नाहीत. अशात यांवर कितीतरी दिवसांचा मळ साठू लागतो. तांब्याच्या भांड्यांना व्यवस्थित स्वछ न करता यांचा वापर केल्यास आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती गोष्टींचा वापर करून तुम्ही तांब्याची भांडी कशी स्वछ आणि चमकदार बनवू शकता याविषयी सांगणार आहोत.

हेदेखील वाचा – एका रात्रीत चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील नाहीशा, हा घरगुती पदार्थ करेल तुमची मदत

मीठ आणि व्हिनेगर

वर्षांनुवर्षे जुनी तांब्याची भांडी स्वछ करण्यासाठी तुम्ही मीठ आणि व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत थोडे आणि व्हिनेगर टाकून याचे व्यवस्थित एक मिश्रण तयार करा. आता कापसाचा गोळा घेऊन या द्रावणात मिक्स करा आणि याने चिवट घाण तांब्याची भांडी साफ करा. तुम्ही जास्त द्रावण बनवून यात ही भांडी काहीवेळ बुडवून देखील ठेवू शकता. याच्या मदतीने काही क्षणातच तुमची तांब्याची भांडी नव्यासारखी चमकू लागतील.

हेदेखील वाचा – तुटणे, गळणे आणि कोरड्या केसांसाठी घरीच तयार करा भृंगराज तेल

मीठ आणि लिंबू

तांब्याची भांडी चमकवण्यासाठी तुम्ही मीठ आणि लिंबाचा वापर करू शकता. यासाठी एक चमचा लिंबाच्या रसात अर्धा चमचा मीठ टाका आणि मिक्स करा. ही भांडी गरम पाण्यात धुतल्याने भांडी अधिक चांगली स्वछ होतात.

बेकिंग पावडर आणि डिटर्जंट

तांब्या-पितळेची भांडी साफ करण्यासाठी तुम्ही बेकिंग पावडर आणि डिटर्जंटचा वापर करू शकता. यासाठी दोन्ही साहित्य पाण्यात एकत्र करून एक मिश्रण तयार करा आणि यात भांडी काहीवेळ भिजवून ठेवा. नंतर भांडी स्वछ घासून घ्या. यामुळे तुम्हाला भांड्यांवरील मळ काढण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज भासणार नाही. या उपायाने सहजतेने तांब्याची भांडी चकचकीत साफ होतील.

Web Title: Know the best best homemade copper cleaner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 06:00 AM

Topics:  

  • cleaning tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये ऑटिझमचे प्रमाण कमी का? जाणून घ्या ‘फीमेल प्रोटेक्टिव्ह इफेक्ट’ आणि जनुकीय गुपित
1

मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये ऑटिझमचे प्रमाण कमी का? जाणून घ्या ‘फीमेल प्रोटेक्टिव्ह इफेक्ट’ आणि जनुकीय गुपित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.