आपण सुंदर दिसावं असा मुळात कोणाला वाटत नाही. आपले सौंदर्य जपण्यासाठी चेहऱ्याची योग्य काळीजी घेणे फार गरजेचे असते. अनेकदा वयोमानानुसार चेहऱ्यावर काही बदल होऊ लागतात. चेहऱ्याचे सौंदर्य आरोग्यदायी ठेवण्यासाठी काही गोष्टींचा पालन करणे फार गरजेचे असते. यात सकस आहार, व्यायाम, खूप पाणी पिणे आणि चेहरा स्वछ ठेवणे अशा गोष्टींचा समावेश आहे.
अनेकदा घराबाहेर पडताच सूर्यप्रकाशामुळे आपली त्वचा खराब आणि निस्तेज होऊ लागते. उष्णता, आर्द्रता आणि सूर्यप्रकाशामुळे त्वचा खडबडीत, निस्तेज आणि काळी पडते. त्वचेला चमकदार आणि सुंदर बनवण्यासाठी तुम्हाला त्वचेची काळजी घ्यावी लागेल. यात घरातील एक पदार्थ तुमची मदत करेल. या पदार्थाचे नाव आहे ग्रीन टी. ग्रीन टी त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती तर वाढवतातच पण त्वचा निरोगी बनवण्याचे काम करतात. चला तर मग त्वचेवसाठी ग्रीन टी’चा कसा वापर करावा ते जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – तुटणे, गळणे आणि कोरड्या केसांसाठी घरीच तयार करा भृंगराज तेल
असा तयार करा ग्रीन टी फेसपॅक
वृद्धत्व कमी करण्यास करते मदत
ग्रीन टीचा वापर त्वचेला डिटॉक्स करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. यासाठी ग्रीन टीच्या दोन पिशव्या घ्या आणि त्यातील ग्रीन टी एका भांड्यात काढा. आता यात दोन चमचे मध आणि लिंबाचा रस घालून एकत्र करा. तयार मिश्रण त्वचेवर लावा आणि 10 मिनिटे तसेच राहूद्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वछ करा. ग्रीन टीमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आढळतात ज्यामुळे त्वचेला फायदा होतो. वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासही याची मदत होते.
हेदेखील वाचा – या आयड्रॉप्सच्या मदतीने चष्म्याची गरज भासणार नाही? किंमत फक्त 350 रुपये, काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या
डार्क सर्कल्स
जर तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळ आली असतील तर त्यांना दूर करण्यासाठी तुम्ही ग्रीन टी’चा वापर करु शकता. ग्रीन टीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि टॅनिन डोळ्यांभोवतीच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावण्यास मदत करतात, त्यामुळे सूज कमी होते. ग्रीन टी मध्ये व्हिटॅमिन के आढळते जे डार्क सर्कल्स कमी करण्यास मदत करते.
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.