कालसर्प योग (Kalsarp Yog) विषयी अनेक तर्क वितर्क लावले जातात. काल सर्प योगामुळे, एकतर व्यक्ती त्याच्या आयुष्यात मोठी उंची गाठतो आणि त्याला सर्व सुख, कीर्ती, आदर इत्यादी मिळतात अन्यथा हा योग त्याला खालच्या पातळीवर नेतो. यामुळे काही जण हे ऐकून घाबरतात. कालसर्प म्हणजे आपल्या जन्मकुंडलीत,राशी कुंडलीत जेव्हा राहू व केतू हे दोन ग्रह समोरासमोर येतात. इतर सर्व ग्रह ह्या दोघांच्या मध्ये येतात तेव्हा अनिष्टकुल ग्रहांच प्रतिकूल तयार होते ते दूर व्हावं आणि त्या ग्रहांची अनुकलता प्राप्त व्हावी.
कालसर्प योगाचे १२ प्रकार आहेत पुढील प्रमाणे, अनंत कालसर्प योग, कुलिक कालसर्प योग,वासूकी कालसर्प योग, शंखपाल कालसर्प योग,पद्म कालसर्प योग, महापद्म कालसर्प योग, तक्षक कालसर्प योग, कर्कोटक कालसर्प योग, शंखचुड कालसर्प योग, घातक कालसर्प योग , विषधर विषाक्त कालसर्प योग, शेषनाग कालसर्प योग
कालसर्प योगाचे परिणाम
आपल्या जन्मकुंडलीत कालसर्प योग तयार झाल्यानंतर आपल्याला अनेक संकटाना सामोरे जावं लागतं, असं शास्त्र अभ्यासक प्रशांत गायधनी (Prashant Gaydhani) सांगतात. आपल्यावर विविध मार्गांनी संकट येतात. आपली कामे वेळेवर पूर्ण होत नाही. आपली सतत चिडचिड होते नोकरीत मन लागत नाही आणि त्यामुळे आपल्यावर आलेली संकट दूर करण्यासाठी कालसर्प योग शांती करावी लागते. सर्व ग्रहांची पूजा केल्यानंतरच आपण या संकटातून दूर होऊ शकतो,’ असा दावा गायधनी यांनी केला आहे.
कालसर्प योग शांती पूजेची पद्धत
प्रथमतः जे पूजेला बसणार आहेत त्यांना कुशावर्त तीर्थावर स्नान करावे लागते. गणपती पूजनाने विधीची सुरुवात होत असते. नंतर पुण्यवाचन, मातृकापूजन व नंदी श्राद्ध गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली केले जाते नंतर मुख्य देवता पूजन म्हणजेच राहू, केतू, चांदीचे नवनाग पूजन होते. नवग्रह पूजन, रुद्र कलश पूजन संपन्न होते. यानंतर गुरुजी स्थापित देवतांचे हवन करतात. मात्र ते करणे बंधनकारक नाही. बलिप्रदान करून गुरुजींमार्फत पूर्णाहुती दिली जाते.
.