Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: ताडोबाला मोठा धोका? लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्प रद्द करण्यासाठी इको-प्रोचा अन्नत्याग करण्याचा इशारा

व्याघ्न संघर्षांवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारतर्फे गठीत ११ सदस्यीय तांत्रिक समितीच्या अहवालाची त्वरित अंमलबजावणी व्हावी आणि इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे अन्नत्याग सत्याग्रह करणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 10, 2026 | 03:38 PM
Chandrapur News: ताडोबाला मोठा धोका? लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्प रद्द करण्यासाठी इको-प्रोचा अन्नत्याग करण्याचा इशारा

Chandrapur News: ताडोबाला मोठा धोका? लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्प रद्द करण्यासाठी इको-प्रोचा अन्नत्याग करण्याचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • ‘खाण प्रकल्प थांबवा, वाघ वाचवा!’ बंडू धोतरे ३ मार्चपासून उपोषणावर
  • ताडोबा कॉरिडॉरमधील खाण प्रकल्पाविरोधात आंदोलन पेटणार
  • लोहारडोंगरी खाणीविरोधात इको-प्रोचा इशारा
चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अत्यंत महत्त्वाच्या भ्रमणमार्गात प्रस्तावित असलेला ‘लोहारडोंगरी’ लोह खाण प्रकल्प कायमचा रद्द करावा, त्याची वन्यजीव विषयक परवानगी नाकारण्यात यावी आणि जिल्ह्यातील गंभीर मानव-वन्यजीव संघर्ष निवारण्यासाठी इको-प्रोच्या प्रलंबित मागण्या व उपाययोजना कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे ३ मार्च २०२६ पासून ‘अन्नत्याग सत्याग्रह’ सुरू करणार आहेत.

Chandrapur News: काँग्रेसच्या हातून जाणार मनपा? शहरात रंगला चर्चा, सत्तास्थापनेसाठी भाजपच्या हालचाली सुरु

यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, वनमंत्री, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) वनविभागामार्फत निवेदन सादर केले आहे. ब्रह्मपुरी वनविभागातील लोहारडोंगरी कक्ष क्रमांक ४३९ मधील हा प्रस्तावित प्रकल्प ताडोबाच्या पूर्वेकडील महत्त्वाच्या कॉरिडॉरमध्ये आहे. या खाणीमुळे आधीच तीव्र असलेला ‘मानव-वन्यप्राणी संघर्ष’ खाणकाम आणि वाहतुकीमुळे जंगलाचे विखंडन होऊन अधिक तीव्र होईल, ताडोबाच्या पूर्व आणि उत्तर दिशेकडील जंगलांना जोडणारे वन्यप्राणी भ्रमणमार्ग विखंडित होण्याचा धोका, ३५.९५ हेक्टर जंगलाच्या मधोमध असलेल्या समृद्ध वनक्षेत्रातील १८,०२३ मोठ्या वृक्षांची कत्तल होईल.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

या उपाययोजना करण्याची मागणी

व्याघ्न संघर्षांवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारतर्फे गठीत ११ सदस्यीय तांत्रिक समितीच्या अहवालाची त्वरित अंमलबजावणी व्हावी. चंद्रपूर-मूल रोडवरील ओव्हरपास आणि बामणी-आष्टी रोडवरील अंडरपासच्या कामांना मंजुरी देऊन बांधकाम सुरू करावे. कन्हाळगाव व घोडाझरी अभयारण्य वन्यजीव विभागाने ताब्यात घेऊन तेथे कर्मचारी नियुक्ती व गावविकासाची कामे करावीत. जिल्हा परिषदेमार्फत संवेदनशील गावांना ‘बिबट समस्यामुक्त ग्राम योजना’ ला मंजुरी आणि निधी उपलब्ध करून द्यावा. चंद्रपूर जिल्ह्याला अधिकृतपणे ‘व्याघ्र जिल्हा’ घोषित करून उपाययोजनांत एकसूत्रता आणावी.

ताडोबा, कन्हारगाव व घोडाझरी पर्यटनातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा ५० टक्के प्रत्यक्ष लाभ स्थानिक गावांना मिळण्यासाठी धोरण निर्णय घेणे, अभयारण्यालगत स्थानिक लोकांच्या माध्यमातून ‘कम्युनिटी रिसॉर्ट होमस्टे व जिप्सी’ चालवण्यास प्रोत्साहन द्यावे. वनव्याप्त गावांमध्ये पोलीस पाटीलच्या धर्तीवर ‘वनपाटील’ नियुक्त करावेत. चंद्रपूर येथील प्रस्तावित रेस्क्यू सेंटरचे काम वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित करून गती द्यावी.

Mumbai News: नागरिकांसाठी दिलासा! पालिका रुग्णालयांत सुरू होणार डिजिटल पेमेंट सुविधा, लांबच लांब रांगा

वन्यजीवांचा धोका; शेती उद्योग होणार प्रभावित

या क्षेत्रात वाघ, बिबट्या, अस्वल यांसह ६० प्रकारचे वन्यप्राणी आढळतात, ज्यांच्या अधिवासावर गदा येईल. परिसरातील जल, वायू प्रदूषण वाढीसोबत, येथील मुख्य अर्थव्यवस्था असलेली शेती उद्योग प्रभावित होईल. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात यावा. बंडू धोतरे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, वाघ व इतर वन्यप्राण्याचे भ्रमणमार्ग सुरक्षित ठेवण्याच्या, वाघाचा अधिवास सुरक्षित ठेवण्याच्या आणि गेल्या ५ वर्षात २०० ग्रामस्थांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ही गंभीर परिस्थिती आणि प्रस्तावित खाणीचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास ३ मार्चपासून बेमुदत उपोषण करण्यात येईल.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Protest against lohardongri iron ore mine eco pro chief announces hunger strike to save tadoba corridor chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Chandrapur
  • NAVARASHTRA
  • tiger

संबंधित बातम्या

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
1

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश
3

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत
4

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.