
Chandrapur News: महापौरपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी कोण घेणार? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बापू धोटे यांचा सवाल
Karjat News : नेरळ रेल्वे स्थानकात विकासकामाला गती; फलाटावरील निवारा शेडचे काम सुरु
नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता प्राप्त करीत जिल्हा काँग्रेसमय केला आहे. मात्र पक्षाला चंद्रपूर महानगर पालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले नाही. पण मतदारांनी कौल देत पक्षाला सर्वाधिक जागा जिंकता आल्या. पक्षाला सत्तेसाठी फक्त तीन नगरसेवकांनी गरज होती. त्यातच महाविकास आघाडीतील उबाठा गटाने ६ जागा जिंकल्या आहे. त्यामुळे पक्षाचा महापौर होणार, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र पक्षातील जबाबदार नेत्यांच्या अहंकारामुळे पक्षाला तोंडघशी पडावे लागले आहे. नेत्यांमधील हेवेदावे आणि वृथा अहंभाव यामुळे नगरसेवकांची पळवापळवी करण्यात आली. त्यानंतर दोन नेत्यांनी वेगवेगळे गटाची नोंदणी केली. (फोटो सौजन्य – Pinterest)
महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव हा मतदारांचा अपमान आहे. त्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसला मतदान केले. पण नेत्यांनी मोठेपणा दाखविण्यात वेळ खर्ची घालविला. त्यांच्या अहंकारी स्वभावगुणांमुळे पक्षाची हानी झाली. मतदारांनी पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी कौल दिला असताना महापौरपदाच्या निवडणुकीत मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. मतदारांनी पक्षाला का म्हणून मतदान करावे, असा सवाल धोटेंनी उपस्थित केला.
आंबा-काजू हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
चंद्रपूरमध्ये बहुमताच्या जवळ आमचा आकडा होता, पण आम्हाला ज्यांच्याकडून अपेक्षा होती, त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. जे सेक्युलर पक्ष होते. बंचित बहुजन आघाडी व एमआयएम होते, त्यांनी कुठेतरी अप्रत्यक्षपणे भाजपला पाठिंबा दिला. ते सभागृहात हजर राहिले नाहीत. त्यामुळे आम्हाला चंद्रपुरात सत्ता गमवावी लागली, अशी प्रतिक्रीया खा. प्रतिभा धानोरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.