कर्जत तालुक्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येविरोधात सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी आंदोलन केले होते. तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांच्या अटीच्या कथित उल्लंघनावरून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
रत्नागिरीतील मंडणगड बसस्थानकाच्या पुनर्बांधणीला आता सुरुवात झाली आहे. नव्या आधुनिक इमारतीमुळे प्रवाशांसह महिला आणि विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत.
रेल्वेच्या डब्यातील लाल रंगाची अलार्म चेन ही आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या मदतीसाठी असते. मात्र विनाकारण चेन ओढल्यास कायदेशीर कारवाई आणि दंड होऊ शकतो.
Jodi Marathi Movie: महाराष्ट्रातील शेतकरी आणि बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते, कष्ट आणि मातीशी असलेली नाळ यांना केंद्रस्थानी ठेवत ‘जोडी’ या नव्या मराठी चित्रपटाची पोळ्याच्या मुहूर्तावर घोषणा करण्यात आली आहे.
पालघरमधील रुग्णालय कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणात पोलिसांच्या तपासावर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरोपींच्या अटकेतील दिरंगाई आणि केस डायरी योग्य पद्धतीने न ठेवल्याबद्दल न्यायालयाने पोलिसांना खडेबोल सुनावले.
आदिवासी शेतकऱ्यांना वनहक्क पट्टा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान राज्यस्तरीय वनहक्क मोहीम राबवण्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
टिटवाळा स्थानकातील फलाट विस्ताराच्या कामाचा आज अखेरचा टप्पा पार पडणार आहे. यासाठी रात्री तीन तासांचा पॉवर आणि वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार असून, कसारा मार्गावरील लोकलसह काही एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम…
२ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलात अग्निवीर सैन्य भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी भरतीच्या तयारी संदर्भात आढावा बैठक…
पारडी (ठवरे) ग्रामपंचायतीतील मग्रारोहयोच्या वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरींची कामे २०२५ मध्ये पूर्ण झाली. संबंधित अनुदानाची रक्कम ग्रामपंचायतीला प्राप्त झाली आहे. मात्र अद्याप ही रक्कम लाभार्थ्यांना मिळालेली नाही.
प्रथमच दक्षिण रायगडातील ऐतिहासिक महाड नगरीत रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. १० सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापुरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, या मागणीसाठी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत कोंडी गावा जवळ…
खोपोली नगरपरिषदेत विकासकामांच्या नावाखाली जवळपास १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप भाजपाच्या नगरसेविका सानिया शेख यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे खोपोलीतील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
८० किंवा त्यापेक्षा अधिक प्रदूषण निर्देशांक असलेले उद्योग ‘लाल’ श्रेणीत येतात. कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पांचा अधिकृत निर्देशांक ९७.६ असतानाही त्यांचे ‘निळ्या’ श्रेणीत पुनर्वर्गीकरण केल्याचा आक्षेप अहवालात घेण्यात आला आहे.
चिमूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. इच्छुकांकडून आपल्या गटातील योग्य उमेदवाराचा शोध सुरू झाला असून, काही ठिकाणी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
जवळपास ७० टक्के सोयाबीनचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी ७० टक्क्यांपर्यंत उध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे पुढचे वर्ष अत्यंत संकटात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.…
अलिबाग येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात पत्रकार परिषदेत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी सरकार आणि महावितरणवर टीका केली. स्मार्ट मीटरसह संपूर्ण योजनेसाठी ३९,६०२ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी…
मुंबईत रेल्वे रूळ ओलांडण्याच्या घटनांमध्ये जुलै महिन्यात मोठी वाढ झाली आहे. जानेवारी ते जूनच्या तुलनेत जुलैमध्येच विक्रमी ४,५५० प्रकरणे नोंदवली गेली असून, प्रवाशांचा जीवघेणा शॉर्टकट चिंतेचा विषय ठरत आहे.
आदित्य बिर्ला ग्रुपने ‘अल्ट्राव्होल्ट’ या ब्रँडसह वायर्स अँड केबल्स व्यवसायात प्रवेश केला आहे. तब्बल १,८०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह कंपनीने पुढील पाच वर्षांत या क्षेत्रातील अव्वल दोन कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याचे लक्ष्य…