वजन कमी करण्यासाठी 'या' पद्धतीने करा तुपाचा वापर
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण तरीसुद्धा वजन कमी होत नाही, झपाट्याने वजन वाढण्यामागे काही महत्वपूर्ण कारणसुद्धा आहेत. तासनतास ऑफिसमध्ये एकजागेवर बसून काम करत बसणे, सतत बाहेरचे पदार्थ खाणे. आरोग्यासंबंधित चुकीच्या गोष्टी फॉलो करणे, सतत डाईट मध्ये बदल इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. एका जागेवर सतत बसून राहिल्यामुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढत जाते. कॅलरीजच्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर आणि इतर वेळी चालणे आवश्यक आहे. चालल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात.
जगभरात 1 कोटी पेक्षा जास्त लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. त्यामध्ये भारत हा देश 19 व्या स्थानी आहे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये लठ्ठपणा झपाट्याने वाढत आहे. महिलांच्या शरीरात सातत्याने होणारे बदल, हार्मोनल असंतुलन इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. चुकीच्या जीवनशैलीचे परिणाम गंभीररीत्या शरीरावर दिसून येतात. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्यामुळे तुमच्या शरीरात वाढलेला लठ्ठपणा कमी होऊन तुम्ही बारीक आणि स्लिम दिसाल.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: नारळ तेलात मिक्स करा ज्युस, दुप्पट वाढतील केस
भारतीय स्वयंपाक घरात तूप हा पदार्थ असतोच. तुपापासून गोडाचे पदार्थ आणि इतर पदार्थ सुद्धा बनवले जातात. तूप पचनास हलके असल्यामुळे तूपासून बनवलेले अन्नपदार्थ सहज पचतात. यामुळे चयापचय सुधारते. मागील अनेक शतकांपासून तुपाचा वापर स्वयंपाक घरातील पदार्थ बनवण्यासाठी केला जात आहे. तुपाचे सेवन करून वजन कमी कसें करावे, जाणून घेऊया.
वजन कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा तुपाचा वापर
हे देखील वाचा: रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित खा १ अंजीर, जाणून घ्या फायदे
वजन कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा तुपाचा वापर