
फक्त १ इंचाचा गणराया! कुर्ल्यात शेषनागाच्या फण्याखाली ‘लिटिल मास्टर’चे दर्शन
अध्यक्ष ईश्वर अहिरे यांचा कोट :
ईश्वर अहिरे, अध्यक्ष, श्री ज्ञानदीप मित्र मंडळ – “यंदा भक्तांसाठी काहीतरी वेगळं आणि अविस्मरणीय साकारण्याचा आमचा प्रयत्न आहे. अवघ्या १ इंचाच्या गणरायाचे हे अनोखे रूप म्हणजे आकाराने छोटे, पण भक्ती आणि श्रद्धेने विशाल असे श्रींचे दर्शन आहे. कुर्लेकरांसह मुंबईतील गणेशभक्तांनी कुटुंबासह या लिटिल मास्टर गणरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा.”
नशीब नाही, ट्रेनमध्ये ‘या’ फॉर्मुल्याने मिळते विंडो सीट! रेल्वेचा हा नियम बहुतेकांना ठाऊकच नाही
कार्याध्यक्ष धनंजय दळवी यांचा कोट :
धनंजय दळवी, कार्याध्यक्ष, श्री ज्ञानदीप मित्र मंडळ – “यंदाच्या गणेशोत्सवात कुर्लेकरांसाठी एक अनोखा आध्यात्मिक अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अवघ्या १ इंचाच्या श्री गणरायाचे शेषनागाच्या फण्याखालील हे रूप भाविकांसाठी निश्चितच आकर्षणाचे ठरणार आहे. मूर्ती लहान असली तरी श्रींचे महत्त्व आणि भक्तीची भावना अनंत आहे. प्रत्येक गणेशभक्ताने कुटुंबासह या लिटिल मास्टर गणरायाचे दर्शन घ्यावे.”
पत्ता – नवी कंपाउंड, हरियाणावाला लेन, स्टेशन रोड, कुर्ला पश्चिम येथे गणेशभक्तांना या विशेष गणरायाचे दर्शन घेता येणार आहे.