Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Metro झाली मालामाल! केवळ 2 दिवसांमध्ये पुणे मेट्रोला ‘इतक्या’ कोटींचा महसूल प्राप्त

Pune Metro: प्रवाशांची पहिली पसंती स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गाला राहिली. दोन दिवसांत एकट्या याच मार्गावर ४ लाख ९८ हजार ७६२ प्रवाशांनी प्रवास केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 21, 2026 | 09:38 PM
पुणे गणेशोत्सव

पुणे गणेशोत्सव

Follow Us
Follow Us:
  • पुणेकरांनी दिली मेट्रो प्रवासाला मोठी पसंती
  • पुणे मेट्रोला १ कोटी ११ लाख ७४ हजार ५०८ रुपयांचा महसूल
  • शनिवारी मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी
पुणे/Pune Metro: गणेशोत्सवाच्या काळात मध्यवर्ती पुण्यात वाढणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येवर मात करण्यासाठी पुणेकरांनी मेट्रो प्रवासाला मोठी पसंती दिली आहे. शनिवार आणि रविवार या अवघ्या दोन दिवसांत तब्बल ८ लाख ७७ हजार ३७७ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. या प्रवासातून पुणे मेट्रोला (ganeshotsav) १ कोटी ११ लाख ७४ हजार ५०८ रुपयांचा महसूल मिळाला आहे.

शनिवारी मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली. या एकाच दिवशी ४ लाख ७८ हजार ४७७ प्रवाशांनी प्रवास केला, ज्यातून ६० लाख २५ हजार २७१ रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर रविवारी ३ लाख ९८ हजार ९०० नागरिकांनी मेट्रोचा वापर केला असून त्यातून ५१ लाख ४९ हजार २३७ रुपयांचा महसूल जमा झाला.

Pune Metro ला ‘बाप्पा’ पावला! दैनंदिन प्रवासीसंख्येत १.१० लाखांहून अधिक वाढ; ‘इतक्या’ लाखांचा महसूल

स्वारगेट-पिंपरी मार्गावर सर्वाधिक गर्दी

प्रवाशांची पहिली पसंती स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गाला राहिली. दोन दिवसांत एकट्या याच मार्गावर ४ लाख ९८ हजार ७६२ प्रवाशांनी प्रवास केला. गणेशोत्सवानिमित्त मध्यवर्ती पेठांमध्ये गणपती दर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला.

दुसरीकडे, वनाज ते रामवाडी या मार्गावर शनिवारी २ लाख ९ हजार ५३९, तर रविवारी १ लाख ६९ हजार ७६ प्रवाशांनी प्रवास केला. गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेता मेट्रो प्रशासनाने फेऱ्यांची संख्या आणि सेवेची वेळ वाढवली आहे. वाहतूक कोंडी अन् पार्किंगच्या कटकटीपासून वाचण्यासाठी नागरिक खाजगी वाहनांऐवजी मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देत आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पुण्यातील गर्दी वाढत असताना, उपनगरांतून शहराच्या मध्यवर्ती भागात पोहोचण्यासाठी पुणेकरांकडून मेट्रोला मोठी पसंती मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून मेट्रोच्या प्रवासीसंख्येत सातत्याने वाढ होत असून, अवघ्या चार दिवसांत दैनंदिन प्रवासीसंख्येत तब्बल १ लाख १० हजारांहून अधिक वाढ झाली आहे. याचा परिणाम मेट्रोच्या दैनंदिन महसुलावरही झाला आहे.

Pune Metro Line 1 Technical Snag: पुणे मेट्रोचा वीजपुरवठा खंडित; सुरक्षेसाठी ८ मेट्रो ट्रेन्स प्लॅटफॉर्मवर थांबवल्या

वनाज-रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड-स्वारगेट या दोन्ही मार्गांवर १४ सप्टेंबर रोजी एकूण २ लाख ६२ हजार ६७१ प्रवाशांनी प्रवास केला. त्यानंतर प्रवासीसंख्येत सातत्याने वाढ झाली. १५ सप्टेंबरला २ लाख ८७ हजार ९००, १६ सप्टेंबरला ३ लाख १९ हजार ९१५, तर १७ सप्टेंबरला तब्बल ३ लाख ७२ हजार ८३२ प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला.

Web Title: 8 lakh punekar people travel with metro during ganeshotsav get revenue 1 crore 11 lakh rs festival season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 09:38 PM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • pune ganpati
  • Pune Metro

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनानंतर विद्यार्थ्यांनी उचलला स्वच्छतेचा विडा; गिरगाव चौपाटीवर राबवली मोहीम
1

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनानंतर विद्यार्थ्यांनी उचलला स्वच्छतेचा विडा; गिरगाव चौपाटीवर राबवली मोहीम

Ganeshotsav 2026 : 22 वर्षांची श्रद्धा अन् परंपरा! ‘चेंबूरचा सम्राट’ गणेशोत्सवात नवगुंजराचे अद्भुत रूप ठरतेय आकर्षण
2

Ganeshotsav 2026 : 22 वर्षांची श्रद्धा अन् परंपरा! ‘चेंबूरचा सम्राट’ गणेशोत्सवात नवगुंजराचे अद्भुत रूप ठरतेय आकर्षण

Anant Chaturdashi 2026: अनंत चतुर्दशीच्या दिवशी १४ गाठींचा अनंत धागा बांधण्याचे काय आहे महत्त्व
3

Anant Chaturdashi 2026: अनंत चतुर्दशीच्या दिवशी १४ गाठींचा अनंत धागा बांधण्याचे काय आहे महत्त्व

Sangli: 127 वर्षांपूर्वीची 14 फूट उंच महाकाय गणेशमूर्ती! लोकमान्य टिळकांनाही पडली होती भुरळ
4

Sangli: 127 वर्षांपूर्वीची 14 फूट उंच महाकाय गणेशमूर्ती! लोकमान्य टिळकांनाही पडली होती भुरळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.