Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलांमधील Lactose Intolerance, कसे सुधारेल आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला

लहान मुलांचे आतडे अत्यंत नाजूक असते आणि आरोग्यासाठी त्याची काळजी घेणे गरजेचे असते. दुधामधील लॅक्टोजचे पचन करण्यासाठी नक्की कशाची गरज आहे याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाचा सल्ला दिलाय

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 21, 2025 | 01:06 PM
लॅक्टोज् इनटॉलरन्स ही स्थिती एक ॲलर्जी नसून पचन समस्या आहे

लॅक्टोज् इनटॉलरन्स ही स्थिती एक ॲलर्जी नसून पचन समस्या आहे

Follow Us
Close
Follow Us:

मुलाच्या एकूण आरोग्याच्या बाबतीत आतडे महत्त्वाची भूमिका बजावतात.  दुधामध्ये असलेल्या लॅक्टोजचे पचन करण्यासाठी, लॅक्टेज नावाचे एन्झाइम आवश्यक असते जे लहान आतड्यात तयार होते. जर शरीरात हे एन्झाइम अजिबात तयार न झाल्यास दूध पचत नाही व ते मोठ्या आतड्यात जाते आणि तिथेच कुजू लागते. यामुळेच अतिसार, गॅसेस, पोट फुगणे, पोटदुखी अशा समस्यांना सामोरे जावे लागते. वैद्यकीय भाषेत याला लॅक्टोजन इनटॉलरन्स म्हणतात. 

दुधामध्ये लॅक्टोज नावाची साखर असते, जी शरीर शोषून घेते व त्याचे ग्लूकोजमध्ये रुपांतर करते व शरीराला ताकद मिळते. या प्रकारची शर्करा केवळ दुधामध्येच आढळते. डॉ. अतुल पालवे, बालरोगतज्ज्ञ आणि नवजात शिशु तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, लुल्लानगर, पुणे यांनी महत्त्वाची माहिती दिलीये. 

नक्की काय असते स्थिती

दुग्धशर्करा म्हणजेच दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणारी साखर पूर्णपणे पचवता येत नाही. ही साखर पचण्यास असमर्थता दर्शवणारी एक आरोग्याची स्थिती आहे. जेव्हा लॅक्टोज योग्यरित्या पचत नाही, तेव्हा त्याची विविध लक्षणे शरीरामध्ये दिसू शकतात. लॅक्टोज् इनटॉलरन्सची लक्षणे सामान्यत: लॅक्टोज-युक्त पदार्थ किंवा पेये खाल्ल्यानंतर काही तासांत दिसून येतात. ही स्थिती एक ॲलर्जी नसून पचन समस्या आहे आणि ती अनुवंशिक, वयानुसार बदलणारी किंवा संसर्गजन्य आजारांमुळे लहान आतड्याला झालेल्या नुकसानामुळे प्रभावित होऊ शकते.

129 वर्षांच्या स्वामी शिवानंद यांनी उघड केले दीर्घायुषी आणि हेल्दी आरोग्याचे रहस्य, 3 सोप्या टिप्सने बदलेल आयुष्य

मुलांमध्ये पचनाचे विकार

लॅक्टोजन इनटॉलरन्स ही एक चिंताजनक समस्या आहे जी वेळेवर सोडवली पाहिजे, परंतु मोठ्या संख्येने मुलांना इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS), सेलिआक रोग किंवा फुड ऍलर्जी यासारख्या इतर पचन विकारांना तोंड द्यावे लागते. आयबीएस असलेल्या मुलांना ओटीपोटात दुखणे आणि अनियमित आतड्याची हालचाल होते, तर सेलिआक डिसीज ग्लूटेनच्या रोगप्रतिकारक प्रतिक्रियेमुळे होतो आणि एखाद्याच्या लहान आतड्यावर परिणाम करू शकतो. 

फूड अ‍ॅलर्जीमुळे अन्नातील विशिष्ट प्रथिनांना रोगप्रतिकारक शक्ती प्रतिक्रिया करते ज्यामुळे पुरळ उठण्यासारख्या लक्षणे आढळून येतात. या विकारांची लक्षणांमध्ये ओटीपोटात दुखणे, अतिसार आणि पोटफुगी अशी असतात ज्यामुळे निदान आव्हानात्मक आणि गुंतागुंतीचे ठरते. म्हणूनच, वेळेवर उपचार करण्यासाठी मुलांना डॉक्टरांकडून योग्य मूल्यांकनाची आवश्यकता भासते. मुलांमध्ये आतड्याच्या समस्या वेळेवर सोडवल्या पाहिजेत.

मुलांमध्ये आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी टिप्स

  • आतड्यांशी संबंधित कोणत्याही समस्यांना तोंड देण्यासाठी, विलंब न करता त्यांचे निदान करणे अत्यावश्यक आहे
  • लॅक्टोज इनटॅालरन्ससाठी, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लॅक्टोज इनटॅालरन्स चाचणी करणे गरजेचे आहे 
  • स्वतःहून कोणतीही औषधे घेऊ नका. इतर पचन विकारांसाठी, अचूक निदान करण्यासाठी तज्ञांकडून स्टूल चाचण्या, रक्त तपासणी किंवा एंडोस्कोपीचा सल्ला दिला जाईल 
  • शिवाय तज्ज्ञ पालकांना त्यांच्या मुलांच्या आहाराकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला जाईल. ज्या मुलांना लॅक्टोज इनटॅालरन्स आढळून आला त्यांना पुरेसे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी घेण्याचा सल्ला दिला जाईल
  • इतर पचन विकारांचे व्यवस्थापन करण्यासाठी, एलिमिनेशन डाएटमुळे जळजळ निर्माण करणारे पदार्थ ओळखण्यास मदत होऊ शकते, तर प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्स आतड्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात
  • जंक फूड, तेलकट, हवाबंद डब्यातील आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन मर्यादित करा आणि तज्ञांनी दिलेल्या आहारातील बदलांचे पालन करा

रात्रभर पाण्यात भिजवा मेथी-धण्याच्या बिया, 21 दिवसात कोलेस्ट्रॉल नसांतून खेचून काढेल आयुर्वेदिक उपाय

संतुलित आहाराची गरज 

प्रतिबंधात्मक उपायांमध्ये निरोगी आतड्याच्या सूक्ष्मजीवांना प्रोत्साहन देण्यासाठी फळे, भाज्या आणि तृणधान्य समृद्ध संतुलित आहाराची निवड करा. पचन समस्यांचा धोका असलेल्या मुलांसाठी, नियमित तपासणी वेळीच निदान आणि उपचारास मदत करू शकते. पालकांनी त्यांच्या मुलांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणताही विलंब न करता त्यांच्या आतड्याच्या आरोग्याला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे.

Web Title: Lactose intolerance in children advice from health experts on how to improve it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 01:06 PM

Topics:  

  • Health News

संबंधित बातम्या

Khan Sir दान करणार मेंदू? असं करता येतं का? स्वतःच केला खुलासा, Video Viral
1

Khan Sir दान करणार मेंदू? असं करता येतं का? स्वतःच केला खुलासा, Video Viral

कुटुंबाला ठेवा सुरक्षित! जगभरात वाढतोय न्युमोकॉक्कल आजार, आरोग्यतज्ज्ञांनी दिला इशारा
2

कुटुंबाला ठेवा सुरक्षित! जगभरात वाढतोय न्युमोकॉक्कल आजार, आरोग्यतज्ज्ञांनी दिला इशारा

Brush केल्या-केल्या चहा पिताय? मग जरा थांबाच! अजिबात करू नका ‘ही’ चूक होईल, मोठे नुकसान
3

Brush केल्या-केल्या चहा पिताय? मग जरा थांबाच! अजिबात करू नका ‘ही’ चूक होईल, मोठे नुकसान

Bladder Stone Removal: सतत टपकतेय लघवी, धार मात्र कमकुवत; म्हणजेच ब्लॅडरमध्ये अडकलाय कचरा, ‘असा’ करा स्वच्छ
4

Bladder Stone Removal: सतत टपकतेय लघवी, धार मात्र कमकुवत; म्हणजेच ब्लॅडरमध्ये अडकलाय कचरा, ‘असा’ करा स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.