विमानतळाच्या जवळ राहणाऱ्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका
जर तुमचे घर विमानतळाजवळ असेल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच धक्कादायक ठरू शकते. विमानतळांजवळ राहणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका इतरांपेक्षा जास्त असल्याचे अलिकडच्या एका संशोधनातून समोर आले आहे. याचे कारण सतत होणारा मोठा आवाज आणि वायू प्रदूषण आहे, ज्याचा हळूहळू हृदयावर वाईट परिणाम होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हा धोका केवळ वृद्ध लोकांपुरता मर्यादित नाही तर तरुण लोकही याला बळी पडू शकतात.
हे संशोधन ऑक्सफर्ड विद्यापीठाने केले होते, ज्यामध्ये असे आढळून आले की विमानतळाजवळ राहणाऱ्या लोकांच्या शरीरावर हानिकारक आवाज आणि प्रदूषणाचा गंभीर परिणाम होतो. विमानांच्या उड्डाण आणि उतरण्याचा आवाज आणि विमानतळाशी संबंधित वाहतुकीमुळे निर्माण होणारे ध्वनी प्रदूषण यासारखे सततचे मोठे आवाज लोकांच्या हृदयावर थेट परिणाम करतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की 24 तास सतत आवाजाच्या संपर्कात राहिल्याने मानवी शरीरावर ताण येतो. यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयावर दबाव येतो. या स्थितीमुळे दीर्घकाळात हृदयविकाराचा झटका येऊ शकतो (फोटो सौजन्य – iStock)
वायू प्रदूषणाचाही धोका
विमानतळाजवळ राहणाऱ्या लोकांना केवळ ध्वनी प्रदूषणच नाही तर वायू प्रदूषणाचाही सामना करावा लागतो. विमानाच्या इंजिनांमधून आणि आजूबाजूच्या वाहतुकीतून निघणारा धूर हवा विषारी बनवतो. ही विषारी हवा फुफ्फुसे आणि हृदय दोघांसाठीही धोकादायक आहे. अशा हवेत जास्त वेळ राहिल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि हृदयरोगांचा धोका वाढतो.
1-2 नाही तर 10 दिवस आधी मिळतात हार्ट अटॅकचे संकेत, 6 लक्षणे माहीत असायलाच हवीत
काय सांगतो रिसर्च
या अभ्यासात, हजारो लोकांच्या आरोग्याचे निरीक्षण करण्यात आले आणि विमानतळाजवळ आणि विमानतळापासून दूर राहणाऱ्या लोकांमध्ये तुलना करण्यात आली. निकालांवरून असे दिसून आले की विमानतळापासून 10 किलोमीटरच्या आत राहणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा धोका 20% जास्त असतो. त्यामुळे तुम्ही एअरपोर्टच्या जर इतक्या जवळ रहात असाल तर नक्कीच तुम्हाला हा अहवाल विचार करायला लावेल.
तज्ज्ञांनी काय सांगितले
“रात्रीच्या वेळी विमानांच्या आवाजात ज्या प्रकारच्या असामान्यता आढळल्या त्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो आणि याबद्दल आम्हाला काळजी वाटते असे युनिव्हर्लिटी ऑफ लेन्सेस्टरमधील प्राध्यापिका अॅना हॅन्सलने सांगितले. रात्रीच्या वेळी विमानांच्या आवाजामुळे झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आणि आरोग्यावर परिणाम करणारा हा एक महत्त्वाचा घटक असू शकतो असेही त्यांनी सांगितले.
हृदयाच्या आरोग्यावर आवाजाची भूमिका सध्या तपासली जात आहे. तथापि, तुमच्या हृदयाची काळजी घेण्याचे अनेक स्थापित मार्ग आहेत. यामध्ये निरोगी आणि संतुलित आहार घेणे, शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे, निरोगी वजन राखणे, धूम्रपान करत असल्यास धूम्रपान सोडणे, मद्यपान कमी करणे, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या परिस्थिती नियंत्रणात ठेवणे आणि डॉक्टरांनी लिहून दिल्यास कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधे घेणे यांचा समावेश आहे.” असेही त्यांनी अभ्यासात म्हटलं आहे.