
Oral cancer risk, Alcohol consumption and cancer
२०१० ते २०२३ या कालावधीत करण्यात आलेल्या या अभ्यासात तोंडाच्या कर्करोगाचे निदान झालेल्या १, ८०३ रुग्णांची आणि तितक्याच संख्येतील निरोगी व्यक्तींची तुलना करण्यात आली. या अभ्यासात आंतरराष्ट्रीय मद्यप्रकारांबरोबरच महुआ, खर्रा, ताडी, देसी दारू आणि हंडी यांसारख्या ३० प्रकारच्या स्थानिक मद्यांचा समावेश करण्यात आला होता.
राज्यनिहाय अभ्यासात अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, तेलंगणा आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये मद्यपानाशी संबंधित तोंडाच्या कर्करोगाचा धोका १५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले.
भारतातील एकूण बक्कल म्युकोसा एकाहून अधिक प्रकरणे मद्यपानाशी संबंधित असल्याचे आमच्या विश्लेषणातून दिसून आले आहे. मद्यपानाचे प्रमाण जास्त असलेल्या राज्यांमध्ये हा धौका तुलनेने अधिक असल्याचेही आढळून आले आहे.
– डॉ. राजेश दीक्षित, संचालक
तंबाखू सेवनासोबत मद्यपान करणाऱ्या ● व्यक्तीमध्ये तोडाच्या कर्करोगाचा धोका चारपट वाढतो. मद्यामुळे तोडाच्या आतील संरक्षक थर कमकुवत होतो आणि त्यामुळे तंबाखूमधील कर्करोगजन्य घटकांचा परिणाम अधिक तीव्र होतो. – डॉ. पंकज चतुर्वेदि, अॅड्रूज सेंटर फॉर ओरल कैन्सर
तोंडात न बरी होणारी जखम किंवा व्रण
तोंडात पांढरे (Leukoplakia) किंवा लाल डाग (Erythroplakia)
चावायला, गिळायला किंवा बोलायला त्रास होणे
तोंडात सतत जळजळ किंवा वेदना
जीभ, हिरड्या, ओठ किंवा गालांवर सूज किंवा गाठ
कारण नसताना तोंडातून रक्त येणे
दात सैल होणे किंवा जबड्यात दुखणे
आवाजात बदल किंवा घसा बसणे
मानेला गाठ येणे
अचानक वजन घटणे
तंबाखू (सिगारेट, गुटखा, पानमसाला)
मद्यपान
तोंडाची स्वच्छता न राखणे
HPV संसर्ग
सतत उन्हात राहणे (ओठांचा कर्करोग)