रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल खेचून काढेल जवसाची चटणी
रोजच्या आहारात सतत तिखट आणि मसालेदार पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे रक्तात वाईट कोलेस्ट्रॉल साचून राहण्याची शक्यता असते. रक्तात जमा झालेला कोलेस्ट्रॉलचा चिकट थर हृदयाचे आरोग्य पूर्णपणे खराब करून टाकतो. त्यामुळे रोजच्या आहारात सहज पचन होणाऱ्या आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये लसूण जवस चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ग्रामीण भागातील सर्वच घरामध्ये जवस चटणी हा पदार्थ कायमच पाहायला मिळेल. जवसामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, फायबर, लिग्नॅन्स आणि अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. रक्तात जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी जवस चटणी खाण्याचा सल्ला दिला जातो. जवस खाल्ल्यामुळे पचनक्रिया मजबूत राहते. पचनाच्या कोणत्याही समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी जवस लसूण चटणी खावी. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Recipe : पश्चिम बंगालमधील फेमस पदार्थ, मसालेदार अन् कुरकुरीत असा ‘आलू चॉप’ तुम्ही कधी खाल्ला आहे का?






