फोटो सौजन्य - Social Media
यश आणि मयूर, दोघे मुंबईहून पुण्याकडे अगदी सकाळीच निघाले होते. पुण्याहून त्यांचा मित्र पुष्पा त्यांना येऊन भेटणार होता. सकाळचे अकरा वाजताच ते पुण्याला येऊन थांबले. पुष्पानेही त्या दोघांना गाठले. तिघांचा प्रवास छान नाश्ता करून सुरु झाला. मुंबई-गोवा महामार्गाऐवजी त्यांनी कोल्हापूरहुन गोव्याला जाण्याचे ठरवले. रात्रीचे ९ वाजता, ते कोल्हापुरात येऊन थांबले. त्यांनी जेवण केलं, यशसोडून बाकीचे म्हणणे होते की आजची रात्री येथेच झोपून काढू आणि पहाटेच गोव्याकडे निघू. यशला ते मान्य नव्हते, तो म्हणाला तुम्ही गाडीतच झोपा. वेळ वाया घालवण्यापेक्षा यशने गाडी हातात घेतली आणि त्यांनी प्रवासाला सुरुवात केली.
काळोख आणखीन भयाण होत चालला होता. आंबोली घाटाची वळण पार करून ते लोकं घाट उतरले. आता कलिंगहूड बीच फक्त ५० किमीवर उरला होता. पण आता त्यांच्या कथेला वळण आलं होतं. कारण यशला जोरात लघवी आली होती. त्याने भर रानात गाडी थांबवली आणि एका चिंचेच्या झाडाखाली कार्यक्रम केला. त्याला तिथे काही तरी विचित्रही जाणवलं पण त्याने दुर्लक्ष केलं. हेच दुर्लक्ष त्याला महागात पडलं. कारण गाडी थोड्या किलोमीटर पुढे जात त्याला असे वळण दिसले, जे तिथे नव्हतेच. त्याने शॉर्टकट समजून त्या वळणात गाडी टाकली आणि थरार सुरु झाला. त्याने पहिल्या काही राईडमध्ये लक्षात घेतले नाही पण हळू हळू त्याच्या लक्षात आले की संपूर्ण रस्त्यात त्याचीच गाडी चालत आहे. सगळे मित्र झोपले आहेत आणि ते चिंचेचे झाड पुन्हा पुन्हा समोरून जात आहे. त्यांची गाडी त्याच रस्त्यावर अगदी २० ते २५ वेळा फिरली. पण काही वेळाने त्याला एक नदी दिसली. गेल्या तासाभरात काही तरी वेगळं दिसलं म्हणून त्याने गाडी सरळ नदीवर टाकली. नदी पार करताच त्यांचा चकवा सुटला.
चार दिवसांच्या मज्जे नंतर ते पुन्हा मुंबईकडे रवाना झाले पण आता यशने भीतीने गाडी चालवण्यास नकार दिला.
टीप – ही गोष्ट काल्पनिक आहे की सत्य यावर आमचा कोणताही दावा नाही.






