Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lungs Cancer: फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, कोणत्याही क्षणी ओढवेल मृत्यू

Lungs Cancer: फुफ्फुसांचा कँन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा शरीराला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 10, 2026 | 03:00 PM
Lungs: फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्यानंतर दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कोणत्याही क्षणी ओढवेल मृत्यू

Lungs: फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्यानंतर दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कोणत्याही क्षणी ओढवेल मृत्यू

Follow Us
Follow Us:

Lungs Cancer: भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जीवनशैलीत सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढता तणाव आणि पोषक घटकांच्या कमतरतेमुळे आजार झपाट्याने वाढतात. पॅसिव्ह स्मोकिंग, वायुप्रदूषण आणि कामाच्या ठिकाणी रसायनांच्या संपर्कामुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसून येत नाही, पण कालांतराने लक्षणे अधिक तीव्र होतात आणि शरीराला धोका निर्माण करतात. सतत खोकला, थुंकीतून रक्त पडणे, विनाकारण वजन कमी होणे, छातीत अस्वस्थता किंवा श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे.(फोटो सौजन्य – istock)

Health Update: कोलेस्टेरॉलवरील संशोधनाला मोठा धक्का! हृदयविकाराचा धोका कमी करणाऱ्या औषधाची चाचणी अपयशी

कोणकोणते घटक कर्करोग निर्माण करतात?

बिडी ओढणे, सिगारेटच्या धुरात पॅसिव्ह स्मोकिंग करणे, स्वयंपाकातील धूर आणि हवेतील प्रदूषकांच्या संपर्कात दीर्घकाळ राहिल्यामुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढू लागतो. याशिवाय तंबाखू किंवा कोणतेही व्यसन न करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा फुफ्फुसांच्या कॅन्सरची लागण होऊ शकते. याशिवाय अनुवंशिकता, कौटुंबिक इतिहास आणि पर्यावरणीय घटकांचा विचार करता कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना फुफ्फुसांच्या कॅन्सरची लागण होऊ शकते.

फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणे कोणती?

सततचा खोकला, जुन्या धुम्रपान करणाऱ्यांच्या खोकल्यामध्ये बदल होणे, विनाकारण थकवा किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नये. कोणत्याही आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात अतिशय सामान्य पण शरीरासाठी घातक असलेली लक्षणे दिसू लागतात. पण कामाच्या धावपळीमध्ये या लक्षणांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे लक्षणे अधिक तीव्र होतात आणि शरीराला धोका निर्माण करतात. थुंकीतून रक्त पडणे, विनाकारण वजन कमी होणे, छातीत अस्वस्थता जाणवू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कच्च्या भाज्यांचे सॅलड खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन का वाढते? संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ‘या’ पद्धतीने खा भाज्या

कर्करोग टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत?

धुम्रपान आणि तंबाखूचे सेवन करणे पूर्णपणे टाळावे. यामुळे कॅन्सर आणि इतर आजारांचा धोका कमी होतो.
विषारी हवा आणि प्रदूषणापासून स्वतःचे रक्षण करावे.
वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावे.
संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली असणे फार आवश्यक आहे.
श्वसनाशी संबंधित कोणतीही लक्षणे दिसू लागल्यास अजिबात दुर्लक्ष करू नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: फुफ्फुसाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत?

    Ans: सतत खोकला येणे, खोकल्यामध्ये रक्त पडणे, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, आवाजात बदल होणे आणि विनाकारण वजन कमी होणे ही फुफ्फुसाच्या कर्करोगाची संभाव्य लक्षणे असू शकतात.सतत खोकला येणे, खोकल्यामध्ये रक्त पडणे, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, आवाजात बदल होणे आणि विनाकारण वजन कमी होणे ही फुफ्फुसाच्या कर्करोगाची संभाव्य लक्षणे असू शकतात.

  • Que: फुफ्फुसाचा कर्करोग झाल्यास सतत खोकला येतो का?

    Ans: होय. दीर्घकाळ खोकला राहणे किंवा आधीपासून असलेल्या खोकल्यामध्ये बदल होणे हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे एक संभाव्य लक्षण असू शकते.

  • Que: फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका कोणाला अधिक असतो?

    Ans: धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना धोका अधिक असतो. तसेच अप्रत्यक्ष धूम्रपान, वायुप्रदूषण, रेडॉन वायू आणि काही व्यावसायिक रसायनांच्या संपर्कामुळेही धोका वाढू शकतो.

Web Title: Lungs cancer do not ignore these symptoms that appear after the onset of lung cancer sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • health issue
  • healthy lungs
  • lung cancer

संबंधित बातम्या

Mumbai News: वायुप्रदूषणावरून सदस्य प्रचंड आक्रमक! नेमलेले भरारी पथक कुचकामी ठरत असल्याचा आरोप
1

Mumbai News: वायुप्रदूषणावरून सदस्य प्रचंड आक्रमक! नेमलेले भरारी पथक कुचकामी ठरत असल्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.