Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: वायुप्रदूषणावरून सदस्य प्रचंड आक्रमक! नेमलेले भरारी पथक कुचकामी ठरत असल्याचा आरोप

Mumbai News: रस्त्यांची नियमित स्वच्छता, पाण्याचे फवारे मारणे तसेच उल्लंघनांवर नजर ठेवण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. परंतु, तरीही शहरातील हवेच्या गुणवत्तेत अपेक्षित सुधारणा का झाली नाही, असे अनेक प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 05, 2026 | 08:43 AM
वायुप्रदूषणावरून सदस्य प्रचंड आक्रमक! नेमलेले भरारी पथक कुचकामी ठरत असल्याचा आरोप

वायुप्रदूषणावरून सदस्य प्रचंड आक्रमक! नेमलेले भरारी पथक कुचकामी ठरत असल्याचा आरोप

Follow Us
Follow Us:

Mumbai News: मुंबईतील बांधकामांच्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या सेन्सर आधारित हवेच्या गुणवत्तेच्या मॉनिटर्सचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या ११.२८ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला बुधवारी महापालिकेच्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. मात्र, या मंजुरीदरम्यान शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने हाती घेतलेल्या उपाययोजनांवर सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. विशेषतः प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने नेमलेली भरारी पथके पूर्णपणे कुचकामी ठरल्याचे बैठकीत उघड झाले. रस्त्यांची नियमित स्वच्छता, पाण्याचे फवारे मारणे तसेच उल्लंघनांवर नजर ठेवण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. परंतु, तरीही शहरातील हवेच्या गुणवत्तेत अपेक्षित सुधारणा का झाली नाही, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला.(फोटो सौजन्य – istock)

Mumbai News: मुंबईत प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा विस्तार! ९ महिन्यांत १.८० लाख नागरिकांची तपासणी; मधुमेह, कर्करोगावर दिले विशेष लक्ष

प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर केले गंभीर आरोप

या बैठकीत शिवसेनेचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत थर्ड पार्टी ऑडिटच्या वेळी प्रत्यक्ष तपासणीत मशिन्स बंद ठेवल्या जातात अथवा सर्व काही सामान्य आहे अशा पद्धतीने मशिन्स सेट केल्या जातात, असा धक्कादायक दावा केला.त्यामुळे या तपासणीच्या पारदर्शकतेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह लावले. तर भाजपच्या नगरसेविका प्रीती सातम यांनी ही भरारी पथके प्रत्यक्षात काय कारवाई करत आहेत, याचा सविस्तर अहवाल सभागृहासमोर ठेवण्याची मागणी केली.

मुंबई शहर बनत आहे क्षयरोगाचे केंद्र

प्रदूषित हवेमुळे मुंबई शहर आता क्षयरोगाचे केंद्र बनत चालले असून गंभीर परिस्थिती ओढवल्यानंतर तब्बल दीड वर्षाने पालिकेला थर्ड पार्टी ऑडिटची जाग आली आहे, अशी टीका काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी केली. बांधकाम साईट्सवर नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याने पालिका यंत्रणेसोबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळासारख्या नियामक संस्थेला प्रत्यक्ष मोहिमेत सहभागी करून घेणे गरजेचे असल्याचे अमेय घोले यांनी सुचवले.

Dombivli Crime News: ‘तुझा अजून संसार नाही झाला…’ म्हणून मृतदेह लपवला; पण मनाच्या भीतीने आरोपीला करावे लागले आत्मसमर्पण…

सेन्सर्सची संख्या टप्प्याटप्याने वाढवली

आरोपांवर खुलासा करताना अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले की, ‘शहरातील ३ हजारांहून अधिक बांधकाम स्थळांवर सेन्सर आधारित हवा गुणवत्ता तपासणी मॉनिटर्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. २०२५ पासून अशा सेन्सर्सची संख्या टप्याटप्प्या

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Members are extremely aggressive over air pollution they allege that the appointed flying squad is proving to be ineffective sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 08:43 AM

Topics:  

  • Air Pollution
  • health issue
  • Mumbai News

संबंधित बातम्या

आमदार नरेंद्र मेहतांच्या मागणीला यश! मिरा-भाईंदरच्या वाहतूक आयुक्तालयांतर्गत स्वतंत्र पोलीस उपायुक्त पदाला शासनाची मंजुरी
1

आमदार नरेंद्र मेहतांच्या मागणीला यश! मिरा-भाईंदरच्या वाहतूक आयुक्तालयांतर्गत स्वतंत्र पोलीस उपायुक्त पदाला शासनाची मंजुरी

Mumbai News :घरगुती पाहुणचारात वाढतोय प्रीमियम फूड डिलिव्हरीचा ट्रेंड; खास प्रसंगांसाठी रेस्टॉरंट्सच्या जेवणाला पसंती
2

Mumbai News :घरगुती पाहुणचारात वाढतोय प्रीमियम फूड डिलिव्हरीचा ट्रेंड; खास प्रसंगांसाठी रेस्टॉरंट्सच्या जेवणाला पसंती

Mumbai News : अंगणवाडी सेविका-मदतनीसांची दिवाळी गोड! मुंबईतील १०,२०० महिलांना भाऊबीज भेट थेट खात्यात
3

Mumbai News : अंगणवाडी सेविका-मदतनीसांची दिवाळी गोड! मुंबईतील १०,२०० महिलांना भाऊबीज भेट थेट खात्यात

Mumbai News: मुंबईत प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा विस्तार! ९ महिन्यांत १.८० लाख नागरिकांची तपासणी; मधुमेह, कर्करोगावर दिले विशेष लक्ष
4

Mumbai News: मुंबईत प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा विस्तार! ९ महिन्यांत १.८० लाख नागरिकांची तपासणी; मधुमेह, कर्करोगावर दिले विशेष लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.